ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
fashion-hacks-for-slim-look-in-marathi

बारीक दिसण्यासाठी सोप्या फॅशन हॅक्स, या टिप्स वापरून पाहाच

प्रत्येक मुलीला अथवा महिलेला आपण बारीक दिसावं असं वाटतं. पण प्रत्येकाची शरीरयष्टी ही नक्कीच वेगळी असते. काही जणांना बारीक होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. पण तुम्ही थोड्या हेल्दी असाल आणि तुम्हाला बारीक दिसण्यासाठी काही सोप्या फॅशन हॅक्स हव्या असतील तर तुम्ही काही टिप्स नक्कीच वापरू शकता. फॅशन स्टायलिंगचे हे स्मार्ट हॅक्स वापरून तुम्ही बारीक दिसू शकता. तुमची फिगर अधिक बारीक दर्शविण्यासाठी तुम्ही या सोप्या टिप्स वापरा. 

प्रिंट पॅटर्न वापरू नका 

तुम्ही जर हेल्दी असाल अथवा तुम्ही प्लस साईज असाल तर तुम्ही पोलका डॉट, फ्लोरल ड्रेस अथवा प्रिंट पॅटर्न असणारे कपडे तुम्ही वापरू नका. या कपड्यांमध्ये तुम्ही अधिक जाड दिसू शकता. त्यामुळे सहसा असे प्रिंट्स असणारे कपडे घालणे तुम्ही टाळा. जेणेकरून अन्य कपड्यांमध्ये तुम्ही बारीक दिसू शकता. 

व्हर्टिकल स्ट्राईप ड्रेस तुम्हाला अधिक बारीक दर्शवितो 

तुमची उंची कमी असेल आणि जाडी जास्त असेल तर तुम्ही व्हर्टिकल स्ट्राईप ड्रेस घालणे अधिक सोयीस्कर ठरते. व्हर्टिकल स्ट्राईप ड्रेस घातल्यामुळे तुमची जाडी लपली जाते आणि व्हर्टिकल लाईन्सचे कपडे तुम्हाला अधिक उंच दाखवतात आणि बारीक दिसायलाही मदत करतात. तुमचं पोट अधिक मोठं नसेल तर तुम्ही ही स्टाईल नक्की कॅरी करू शकता.

बेली फॅट असल्यास, वापरा होरिझोंटल स्ट्राईप्स 

पोट खूप मोठं असेल अर्थात बेली फॅट असेल तर तुम्ही होरिझोंटल स्ट्राईप्सचे ड्रेस घाला. यामुळे पोटावरील अधिक जमा झालेली चरबी लपविण्यास मदत मिळते. तसंच तुमच्या पोटावरील जाडी दिसून येत नाही. लक्ष तुमच्या ड्रेसवरील स्ट्राईप्सकडे जाते आणि त्यामुळे तुम्ही अधिक बारीक दिसता. 

ADVERTISEMENT

काळा रंग घाला 

काळा रंग हा तुमची जाडी लपविण्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरतो. काळा रंग तुमची जाडी लपवून तुम्ही बारीक असल्याचा भ्रम समोरच्याला निर्माण करून देतो. त्यामुळे तुम्हाला एखाद्या ठिकाणी पार्टीला जायचे असेल तेव्हा तुम्ही काळ्या रंगाच्या कपड्याचा वापर करा. काळ्या रंगाच्या कपड्यांची स्टाईल करून तुम्ही अधिक बारीक दिसू शकता. काळ्या रंगाने इल्युजन अधिक चांगल्या पद्धतीने निर्माण होते. काळ्या रंगासह तुम्ही गडद रंगही वापरू शकता. गडद रंगामुळे तुमची जाडी लपली जाते आणि तुम्ही अधिक बारीक दिसता. याशिवाय तुमच्याकडे जर मोनोक्रोम आऊटफिट्स असतील तर त्याचाही तुम्हाला फायदा करून घेता येतो. 

टाईट इंडियन आऊटफिट्स वापरू नका 

साधारणतः पारंपरिक आणि भारतीय कपड्यांमध्ये आपल्या शरीराचा आकार दिसून येतो. त्यामुळे तुम्ही पंजाबी ड्रेस, कुरते अथवा कुरती वापरणार असाल तर हे कपडे अधिक घट्ट नाहीत याची तुम्ही खात्री करून घ्या. टाईट इंडियन आऊटफिट्स तुम्ही वापरू नका. टाईट कपड्यांमुळे तुम्ही अधिक जाड दिसता. बारीक दिसण्यासाठी तुम्ही योग्य फिटिंगचे कपडे घाला. तर तुम्ही जे कपडे घालणार आहात त्यावर आकर्षक अशा अॅक्सेसरीज अर्थात बेल्ट अथवा अन्य गोष्टींचा आधार घ्या आणि ते परिधान करा. यामुळे तुमच्या जाडीकडे लक्ष जात नाही 

या कपड्यांचा करा वापर

तुम्हाला बारीक दिसायचे असेल तर तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये काही विशिष्ट कपड्यांचा समावेश करून घ्यायला हवा. कॉटन, डेनिम, सिल्क, जर्सी अथवा लोकरीचे कपडे तुमच्याकडे असायला हवेत. जास्तीत जास्त आपल्या कपड्यांमध्ये कॉटनचा समावेश करून घ्या. कारण या कपड्यांचे फिटिंग अंगाला योग्य बसते आणि तुम्हाला बारीक दाखविण्यासाठी याचा उपयोग होतो. तर वेलवेट, लेदर, ब्रोकेड, सॅटिन, टिश्यूसारखे कपडे तुम्ही घालणे टाळा. 

तर तुमच्या कमरेचा खालचा भाग मोठा असेल तर बारीक दिसण्यासाठी ए लाईन ड्रेसेससह ब्लॅक टाईट्स घाला. या सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही बारीक दिसू शकता. तुम्हाला बाहेर जाताना या टिप्स उपयोगी ठरतील. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

12 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT