नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे महिलांसाठी खास असतात. देवीची आराधना करताना नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालणे, नवरात्रीचा उपवास करणे आणि सजून धजून देवीची पूजा करणे या सर्वांचं नऊ दिवसांच्या नवरात्रीचे महत्व आपल्याला पाहायला मिळते. मागच्या वर्षी कोरोनामुळे ऑनलाईन नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या गेल्या. पण यंदा चित्र बदलतंय. त्यामुळे यंदा नवरात्रीच्या या सणासाठी आता खास दागिन्यांचा लुकही केला जाईल. महिला केवळ स्वतःसाठीच नाही तर अगदी आपल्या घरी बसणाऱ्या घटस्थापनेसाठीही अथवा देवीसाठीही खास दागिने तयार करून घेताना दिसतात. तर या नऊ दिवसात खास लुकसाठीही अनेक महिला तयारी करताना दिसतात. केवळ कपडेच नाही तर यासाठी खास दागिन्यांचीही निवड केली जाते आणि या नवरात्रीसाठी नक्की कसा लुक करू शकता ते पाहूया. सध्या बाजारात दागिन्यांचे अनेक ट्रेंड आले आहेत. पण नवरात्रीसाठी ऑक्सिडाईज्ड दागिन्यांचा जास्त वापर करण्यात आलेला दिसून येतो. पण काही ठिकाणी सोन्याच्या दागिन्यांनाही मागणी असते.
दागिन्यांमधील नवे ट्रेंड
दरवर्षी दागिन्यांमध्ये नवे ट्रेंड येत असतात. कोणत्याही कपड्यांवर दागिने नक्कीच एक वेगळी शोभा आणि वेगळा लुक आपल्याला मिळवून देतात. कमीत कमी दागिन्यांमध्ये जास्तीत जास्त शोभा अशी संकल्पना यावर्षी टायटन घेऊन आले आहे. टायटनच्या मुख्य डिझाईनर रेवथी कांत यांनी हा लुक डिझाईन करताना सांगितले की, पारंपरिक आणि आधुनिक याचे फ्युजन सध्या जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि याचा विचार करूनच आता अनेक ठिकाणी दागिन्यांची डिझाईन तयार करण्यात येते. टायटनचे दागिनेदेखील अशाच स्वरूपाचे डिझाईन करण्यात आले आहेत.
लेअरिंग नेकलेस
आजकाल साडी अथवा अन्य कपड्यांवर केवळ एखादा नेकलेसचा घातला जातो. मग तीन चार नेकलेस घालण्यापेक्षा एक लेअरिंग नेकलेस अधिक शोभा वाढवतो. गळाभर दिसणारा असा हा नेकलेस नक्कीच कपड्यांसह समोरच्याचे लक्ष वेधून घेतो. चोकर आणि नेकलेस अशा स्वरूपाचे लेअरिंग असणारा हा नेकलेस साडी, लेहंगा अथवा कोणत्याही आधुनिक कपड्यांवर शोभून दिसतो.
पारंपरिक लुकसाठी झुमके
तुम्हाला जर नेकलेसचा लुक नको असेल तर केवळ लांब झुमके घालूनही तुम्ही तुमचा पारंपरिक आणि फ्युजन लुक पूर्ण करू शकता. आपण या नवरात्रीसाठी कोणते कपडे निवडले आहेत त्यानुसार झुमक्यांची निवड करून तुम्ही तुमची स्टाईल आणि लुक पूर्ण करू शकता. तसंच या लुकसह तुम्ही POPxo मिनी लिप किट्स कलेक्शनचाही वापर करू शकता.
वेगळी डिझाईन्स
तुम्हाला नेहमीची डिझाईन्स नको असतील आणि वेगळ्या डिझाईन्सची आवड असेल तर तुम्ही टायटनच्या जिओमॅट्रिकचादेखील नक्कीच विचार करू शकता. हे तुम्हाला अति जड अथवा बोजड न वाटणारे डिझाईन आहे. ज्यांना हलकेफुलके आणि सोबर असे दागिने आवडतात. त्यांच्यासाठी हे डिझाईन नक्कीच उपयुक्त ठरेल. या नवरात्रीसाठी तुम्ही याचा वापर नक्की करू शकता. तसंच तुमचा लुक अधिक आकर्षक आणि वेगळा बनविण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग करून घेता येईल.
नवरात्री म्हणजे गरबा खेळणे आलेच. यावेळी कपड्यांसह दागिन्यांचेही तितकेच महत्त्व आहे. पण कपड्यांच्या वजनासह दागिन्यांचे वजन झेपवणे कठीण जाते. मग अशावेळी तुम्ही अशा हलक्याफुलक्या दागिन्यांची निवड करून तुमची हौस भागवणे सहज सोपे आहे. तसंच तुम्हाला पारंपरिक आणि आधुनिकतेचा योग्य मेळ घालण्यासाठी हे दागिने वापरता येतील असं म्हणायला नक्कीच हरकत नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक