ADVERTISEMENT
home / आरोग्य
या न्यूट्रास्यूटिकल इम्युनिटी बूस्टर्सने करा कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना

या न्यूट्रास्यूटिकल इम्युनिटी बूस्टर्सने करा कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना

कोरोनाची पहिल्या लाटेसोबत सुरू असलेली लढाई संपून सर्व काही पुन्हा सुरळीत होतं ना होतं तोच कोरोनाची दुसरी लाट देशात धडकली. या दुसऱ्या लाटेचा परिणाम पाहून लोकांच्या मनात कोरोनाविषयी अधिक भीती निर्माण  झाली. पण कोरोनापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर न घाबरता काही गोष्टींचे काटोकोरपणे पालन करायला हवे. यासाठी स्वतःची रोगप्रतिकाशक्ती वाढवणे आणि त्याबद्दल जागरुकता निर्माण करणे ही आज गरज झाली आहे. या दुसऱ्या लाटेपासून आणि भविष्टात येणाऱ्या कोरोनाच्या पुढील लाटेपासून वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोरोना लसीकरण करून स्वतःला सुरक्षित करणं. त्याचसोबत जीवनशैलीत असे काही बदल करणं ज्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती नक्कीच मजबूत होईल. कारण तुमची प्रतिकार शक्ती जर कमजोर असेल तर कोरोनाच्या लाटेचा सामना करणं नक्कीच कठीण होऊन बसेल.

सध्या यासाठी कोरोना लसीकरणाची मोहिम जोरदार सुरू असली तरी संपूर्ण देशाला कोरोनाामुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांना लस मिळण्यासाठी काही वेळ नक्कीच लागणार आहे. त्यामुळे निसर्गाचे संकेत ओळखत आला प्रत्येकाने आपली जीवनशैली बदलून स्वतःला या संकटापासून वाचण्यासाठी तयार करायला  हवं. यासाठी स्ट्रॅटेजिक मेडिकलचे संचालक डॉ. अनीश देसाई( एमडी, एफसीपी, पीजीडीएचईपी) आणि अड्रॉइट बायोमेड लिमिटेडचे सह संचालक सुशांत रावराणे यांचा हा महत्त्वाचा सल्ला तुमच्या नक्कीच फायद्याचा ठरू शकतो. 

कशी वाढवाल तुमची प्रतिकार शक्ती

कोणत्याही आजारपणाचा सामना करण्यासाठी न्यूट्रास्यूटिकल नेहमीच सर्वात प्रभावी प्रतिकारशक्ती बूस्टर्स मानले जातात. कारण त्यांच्यामुळे तुमच्या आहारात पोषक पदार्थ समाविष्ठ केले जातात ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. यासाठी जाणून घ्या हे सर्वात प्रभावी न्यूट्रास्यूटिकल इम्युनिटी बूस्टर्स

ग्लुटॅथिऑन

ग्लुटॅथिऑन हे जागतिक स्तरावरील एक असे मास्टर अॅंटि ऑक्सिडंट आहे ज्याचा वापर प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आजवर प्रभावी ठरलेला आहे. पण दुर्देवाने याबाबत आज जगात खूप अज्ञान आहे. ग्लुटॅथिऑनमुळे ऑक्सिडेटिव्ह ताण आणि पेशींवर आघात झाल्यामुळे होणारा दाह कमी होतो. रिअॅक्टिव्ह ऑक्सिजन प्रजाती कमी करण्यासाठी ते प्रभावी आहेच शिवाय त्यामुळे इनफेक्शन रोखण्यास मदत होते. कोविड संक्रमणात ऑक्सिडंट आणि अॅंटि ऑक्सिडंट यांच्यामध्ये असंतुलन निर्माण होते. ज्यामुळे जीवघेण्या श्वासोच्छवासाच्या संसर्गाचा धोका निर्माण होतो.  मात्र ग्लुटॅथिऑन या रोगजनकांना ओळखते आणि दीर्घकालीन संरक्षणासाठी अॅंटि बॉडीज तयार करते. याच्या शक्तीशाली गुणधर्मांमुळे फुफ्फुसांची जळजळ कमी होते आणि इनफेक्शननंतरही त्यांचे कार्य सुरळीत सुरू राहते. 

ADVERTISEMENT

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवणारं एक प्रभावी घटक मानलं जातं. काही संशोधनात असं आढळलं आहे की व्हिटॅमिन सी रक्तात इतर घटकांपेक्षा शंभर पट अधिक मिसळले जाते आणि संक्रमणास मदत करते. व्हिटॅमिन सी हे  एक असं प्रभावी अॅंटि ऑक्सिडंट आहे ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पेशींच्या निर्मितीची  गती वाढते. व्हिटॅमिन सी मुळे शरीरावर येणारी सूज नियंत्रित राहण्यास मदत होते. शिवाय यामुळे प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पेशींना वेळीच धोक्याचा सिग्नल मिळतो. 

यासाठीच  आहारात या दोन्ही घटकांचा समावेश योग्य प्रमाणात असायला हवा. ज्यामुळे तुमचे आजारपणापासून संरक्षण होईल आणि प्रतिकारशक्ती मजबूत राहील. कारण प्रतिकार शक्ती वाढवण्यात जर तडजोड केली गेली तर कोरोना संक्रमणाचा धोका कायम तुमच्यासमोर उभा राहिल. या काळात वृद्ध, मधुमेही, प्रतिकारशक्तीचे आजार असलेले आणि चुकीचा आहार घेणारे यांना कोरोना संक्रमण होण्याची शक्यता अधिक आहे. यासाठी या लोकांना कोरोनापासून वाचण्यासाठी स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवणं हा एकमेक उपाय आहे. कोरोना संक्रमण टाळणे जरी तुमच्या हातात नसले तरी या काळात योग्य आणि संतुलित आहार घेणे तुमच्या हातात नक्कीच  आहे. यासाठी आहारात पुरेशी जीवनसत्व, अॅंटि ऑक्सिडंट, मिनरल्स, व्हिटॅमिन्स असतील याची काळजी घ्या. त्यासोबतच व्हिटॅमिन सी, ग्लुटॉन 1000, ग्लुटॉन सी अशी  न्यूट्रास्यूटिकल इम्युनिटी बूस्टर्स घ्या ज्यामुळे तुमच्या प्रतिकारशक्तीवर त्याचा थेट सकारात्मक परिणाम होईल.

फोटोसौजन्य – pixels

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

कोरोना झाल्यावर किती दिवस असतात शरीरात अॅंटि बॉडीज

काय आहे कोविड सोमनिया, कशी कराल यातून स्वतःची सुटका

कोरोनातून बरं झाल्यावर का बदलावा टूथब्रश आणि टंग क्लिनर

04 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT