ADVERTISEMENT
home / आरोग्य
Find-out-why-there-is-excess-water-in-the-eye

डोळ्यातून जास्त पाणी हा आहे का आजार, नक्की काय आहे कारण घ्या जाणून

अश्रू हे डोळ्यांसाठी काही प्रमाणात लाभदायी असतात कारण डोळे ल्युब्रिकेटेड ठेवण्यासाठी आणि डोळ्यात गेलेले बाहेरील कण काढून टाकण्यासाठी ते उपयुक्त असतात. मुंबईतील डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलच्या क्लिनिकल सेवा विभागाच्या प्रमुख डॉ. निता शाह यांनी डोळ्यातून पाणी येण्यामागचे कारण आम्हाला विस्तृतपणे सांगितले. वैद्यकीय शास्त्रात रडण्याव्यतिरिक्त चेहऱ्यावर अश्रू येण्याला एपिफोरा असे म्हणतात. हे एका आजाराचे लक्षण आहे, ज्यात डोळ्यात अपुऱ्या टिअर फिल्म ड्रेनेज तयार होतात. या परिस्थितीत अश्रू नॅसोलाक्रिमल सिस्टिमच्या माध्यमातून जाण्याऐवजी चेहऱ्यावर ओघळतात. याबाबत त्यांनी अधिक माहिती POPxo मराठीला दिली आहे.

याचे नक्की काय आहे कारण

cause of water in eye

डॉ. निता शाह म्हणतात, “अश्रूंची प्रमाणापेक्षा अधिक निर्मिती आणि कोंडलेल्या वाहिन्या यामुळे डोळ्यातून पाणी येते. बाळांमध्ये, कोंडलेल्या वाहिन्या हे सर्वसाधारण आढळणारे कारण आहे. काही बालकांमध्ये जन्मजात अविकसित वाहिन्या असतात, काही आठवड्यांनी या पूर्ण विकसित झाल्यावर त्या रिकाम्या होतात. अश्रूवाहिनी निमुळती झाली असेल किंवा कोंडली असेल तर संसर्ग होण्याचा धोका असतो. परिणामी, अश्रूंच्या पिशवीत अश्रू साचून राहू शकतात. प्रौढांमध्ये आणि मोठ्या मुलांमध्ये अश्रूंची अतिनिर्मिती हे सामान्यपणे आढळणारे कारण असते.”बाहेरचे काही डोळ्यात गेले तर सामान्य तापमान असलेल्या स्वच्छ पाण्याने डोळे धुवावे आणि रुग्णाने डोळे चोळू नये. हे केल्यानंतरही डोळ्यात गेलेले बाहेरचे काही डोळ्यातच असल्याची जाणीव कायम असेल तर रुग्णाने नेत्रविकारतज्ञाचा सल्ला घ्यावा. ल्युब्रिकेशनसाठी कृत्रिम अश्रू, अँटिबायोटिक ड्रॉप्स वापरून ते कण बाहेर काढावेत. रासायनिक घटकांमुळे इजा झाली असेल तर भरपूर स्वच्छ पाणी घेऊन डोळा धुवावा आणि रुग्णाने नेत्रविकार तज्ज्ञांची भेट ताबडतोब घ्यावी.

अधिक वाचा – पावसाळ्यात वाढतात डोळ्यांच्या समस्या, असे करा उपचार

पाणी येण्याच्या काही समस्या  

डोळ्यातून पाणी येण्याच्या संबंधित काही सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या समस्या डॉ. निता शाह यांनी सांगितल्या :

ADVERTISEMENT

अलर्जिक कंजंक्टिव्हायटिस म्हणजेच डोळे येणे ही स्थिती एका अॅलर्जनमुळे उद्भवते जी शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेच्या प्रमाणापेक्षा अधिक दिल्या गेलेल्या प्रतिसादामुळे निर्माण होते.  त्यामुळे डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यात खाज येणे, डोळे लाल होणे, आणि पाहताना त्रास होणे हे परिणाम होतात. रुग्णांनी ॲलर्जेन टाळावेत, डोळे चोळू नये आणि कॉन्टॅक्ट लेन्स वापरू नयेत. संसर्गजन्य कंजन्क्टिव्हायटिसमध्ये डोळे लाल होणे, वेदना होणे, प्रकाशाकडे बघण्यास त्रास होणे, चिकटपणा जाणवणे,  चिकट द्रव बाहेर येणे ही लक्षणे दिसू शकतात. हा संसर्ग कोणत्याही उपचाराविना एका आठवड्यात बरा होऊ शकतो.

 डोळ्यात शुष्कपणा येणे : डोळ्यात शुष्कपणा येण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असू शकतात.  यात शरीराकडून अश्रूंची पुरेशी निर्मिती न होणे,  अश्रू पटकन सुकणे, पाणी आणि म्यूकस यांचे योग्य संतुलन नसणे, वाहता वारा थेट डोळ्यात जाणे, वाढलेले वय आणि काही आजार (थायरॉईड आय आजार, गंभीर स्वरूपाचा सायनस, ऱ्ह्युमेटॉइड आर्थरायटिस, जॉग्रेन्स सिण्ड्रोम, एसएलई इत्यादी) यांचा समावेश आहे.  या परिस्थितीमध्ये डोळे अधिक अश्रू निर्माण करून प्रतिसाद देतात.

डोळ्यात पाणी येण्यासाठी पापण्यांच्या समस्याही कारणीभूत असू शकतात. यात पापण्यांच्या कडेचा भाग वळणे किंवा पापण्यांच्या कडा बाहेरच्या बाजूस वळणे किंवा पापण्या अपुऱ्या बंद होणे इत्यादींचा समावेश आहे. धूळ, रेती, कीटक, कॉन्टॅक्ट लेन्स यामुळे कॉर्नियाला (नेत्रपटल) चरा पडू शकतो. अशा परिस्थितीत संसर्ग वाढू नये यासाठी रुग्णाने नेत्रविकारतज्ञाची ताबडतोब भेट घ्यावी

पापण्यांच्या कडांजवळ असलेल्या ग्रंथी कोंडल्यास किंवा त्यांना संसर्ग झाल्यास ब्लेफरायटिस होऊ शकतो.  अशा परिस्थितीत रुग्णांच्या डोळ्यातून पाणी येऊ शकते, डोळे लाल होऊ शकतात, डोळ्यांमध्ये कंड येऊ शकते आणि पापण्यांच्या वर कोंडा जमा होऊ शकतो.

ADVERTISEMENT

ब्लेफरायटिसशी संबंधित रांजणवाडी ही लाल रंगाची सुजलेली पुळी असते जी पापण्यांच्या कडेला तयार होते आणि बाहेरील पापण्यांच्या जवळ असते किंवा आत असते किंवा पापण्यांच्या खाली असते (अंतर्गत) आणि तैल ग्रंथींना सूज आल्यामुळे किंवा संसर्ग झाल्यामुळे निर्माण होते.

नेत्रच्छदपुटिका ही संज्ञा अशा रांजणवाडीला दिली आहे जी वेदना न देता गंभीर स्वरुप धारण करते. जर ती उबदार कॉम्प्रेसने बरी झाली नाही तर वैद्यकीय व्यवस्थापन शस्त्रक्रिया करता येऊ शकते, ज्यात एक लहानसा छेद देऊन आतील कण बाहेर काढले जातात.

अधिक वाचा – उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स

स्क्रीन टाईम कमी करण्याची गरज  

डॉ. निता शाह पुढे म्हणतात, “ या लक्षणांपासून दिलासा मिळण्यासाठी रुग्णाने स्क्रीन टाइम कमी करणे आवश्यक आहे, अँटि रिफ्लेक्टिव्ह कॉटिंग असलेले चष्मे वापरावे,  ब्ल्यू लाईट फिल्टर वापरला जाऊ शकतो आणि 20- 20- 20 या नियमाचा अवलंब करावा.  या नियमांमध्ये वीस मिनिटे स्क्रीन वापरल्यानंतर वीस सेकंदांसाठी वीस फूट लांबपर्यंत दूर पाहावे.  त्याचप्रमाणे उबदार कपड्याने डोळ्याला लावणेही हितकारक असेल.  डोळ्यांमध्ये शुष्कपणा किती आहे यानुसार कृत्रिम अश्रू आणि जेल यांचा वापर केला जाऊ शकतो.  शुष्कपणा गंभीर स्वरूपाचा असेल तर कोंडलेल्या ग्रंथी मोकळ्या करण्यासाठी आयआरपीएलचा (इंटेन्स रेग्युलेटेड पल्स लाइट थेरपी) वापर केला जाऊ शकतो.”

ADVERTISEMENT

शेवटी त्यांनी सांगितले की, “निचरा मार्गाला झालेली इजा व अडथळा यामुळे डोळ्यातून पाणी येण्याचे प्रमाण वाढू शकते. ज्यासाठी उपचार करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सौम्य वा कर्करोगयुक्त ट्युमर्स म्हणजेच लॅक्रिमल ग्लँड ट्युमर्स किंवा पॅरानेझल सायनसेसचे ट्युमर यामुळे गंभीर स्वरुपाचा शुष्कपणा येऊ शकतो. यासाठी शस्त्रक्रिया करावी लागू शकते.”

अधिक वाचा – डोळ्यांचे आजार व उपचार जाणून घ्या (Eye Problems In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

04 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT