सध्या महाराष्ट्रात कोरोना वाढत आहे. अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात येत आहे. पण काही सेलिब्रिटींवर मात्र निर्बंध दिसत नाहीत. अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) हे नाव मनोरंजन क्षेत्रात नक्कीच नवे नाही. काही दिवसांपूर्वीच गौहरचे वडील वारले. त्यानंतर आता पुन्हा एकदा गौहर चर्चेत आली आहे. गौहरच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेने (BMC) कोविड – 19 चे नियम उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तिच्याविरोधात गुन्ह्याचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. कोरोनाग्रस्त असूनही (Corona Positive) गौहर बाहेर होती आणि चित्रीकरणात तिने सहभाग नोंदवला असा तिच्यावर आरोप करण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेने केले आरोप
I condemn the illegal act committed by actress @Gauahar_Khan by attending the shoot even though she was COVID positive thus putting other crew members lives to danger.
I thank @mybmc & @MumbaiPolice for their swift action. pic.twitter.com/R7kx18MxaF— Ashoke Pandit (@ashokepandit) March 15, 2021
मुंबई महानगरपालिकेने गौहर खान विरोधात तक्रार नोंदवली असून तिच्यावर नियमावली भंग केल्याचा आरोप लावला आहे. कोरोना हा सगळ्यांसाठी सारखाच आहे आणि त्यामुळे सर्वांना समसमान नियम लावण्यात येतील असे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. कोरोना ही महामारी असून आम्हाला सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती सतत महानगरपालिका करत आहे. असं असतानाही अभिनेत्री गौहर खान कोरोना पॉझिटिव्ह असूनही चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये सहभागी झाली आणि त्यामुळे अनेक जण संक्रंमित झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने तिच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे.
अभिनेत्री मृणाल ठाकूरचा पार्टी मेकअप तुम्हाला करेल ‘बोल्ड’
गौहरची दोन वेळा झाली कोरोना चाचणी
मिळालेल्या माहितीनुसार, गौहर खानने 11 मार्च रोजी मुंबईमध्ये कोविड टेस्ट (Covid Test) केली होती. चाचणी केल्यानंतर ती दिल्लीला गेली आणि तिथेदेखील 12 मार्च रोजी गौहरने चाचणी करून घेतली होती. मुंबईतील रिपोर्टमध्ये गौहरला कोरोना आहे हे सिद्ध झाले होते, पण दिल्लीतील रिपोर्ट मात्र नेगेटिव्ह आली होते. मुंबई महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार संक्रमण आहे हे माहीत झाल्यानंतर गौहरला अनेक फोन आणि मेसेजही करण्यात आले. मात्र गौहरकडून कोणतेही उत्तर आले नाही. मेसेज करून गौहरला 14 दिवस घरात क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले होते.
परिणीतीकडे बॅक टू बॅक चित्रपटांच्या ऑफर्स ‘सनकी’मध्ये दिसणार वरूणसोबत
या कलमांअन्वये करण्यात आली तक्रार
मुंबई महानगरपालिकेने आरोप केले आहेत की, जेव्हा त्यांचे कर्मचारी तिच्या घराजवळ पोहचले तेव्हा दरवाजा बंद होता. त्यानंतर अभिनेत्री घरात नाही असे कळले. यानंतर मुंबई महानगरपालिकेने ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अभिनेत्रीविरोधात IPC च्या कलम 188, 269, 270 आणि NDMA अधिनियम 51B अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने ट्विट करून याची माहीत देत कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याबद्दल गौहर खान विरोधात गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. याबाबत गौहर खानकडून अजून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. गौहर खान नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. मात्र ही तक्रार दाखल झाल्यानंतर अजूनही कोणतेही स्पष्टीकरण गौहर खानकडून मिळालेले नाही. त्यामुळे याबाबत गौहरची नक्की बाजू काय आहे हे तिच्या चाहत्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच गौहरचे वडील वारले. तर काही महिन्यांपूर्वीच तिने झेद दरबारशी लग्न केले आहे. गेले दोन महिने गौहर चर्चेत होती. आता पुन्हा एकदा गौहर चर्चेत आली आहे. याबाबात आता तिचे पुढचे पाऊल काय असेल आणि स्पष्टीकरण काय असेल हेच चाहत्यांना पुढे जाणून घ्यायचे आहे.
लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला अटक
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक