बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या बहुचर्चित पृथ्वीराज या चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात भारतभूमीत जन्म घेतलेल्या या महान शासकाचे यापूर्वी न ऐकलेले आणि न पाहिलेले वैभव पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आतुर असलेल्या चाहत्यांसाठी निर्मात्यांनी या चित्रपटाची एक झलक प्रसिद्ध केली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले आहे. चित्रपटातील हे गाणे अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.
सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जादू मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार
चित्रपटातील या गाण्यात खऱ्या सम्राटाची ताकद आणि पृथ्वीराज चौहान यांची जादू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमारच्या पृथ्वीराज या चित्रपटातील हरी हर या गाण्यात सम्राट पृथ्वीराज चौहान या भारतातील महान राजाची गाथा दाखवण्यात आली आहे. हे गाणे आदर्श शिंदे यांनी गायले आहे तर संगीत शंकर एहसान लॉय यांचे आहे. या गाण्याचे गीतकार वरुण ग्रोव्हर आहेत. या गाण्याला आदर्श शिंदे यांच्या व्यतिरिक्त अनेक गायकांनी आपला आवाज दिला आहे.
अक्षय कुमारने शेअर केले गाणे
अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्रामवर या गाण्याचे पोस्टर शेअर केले आहे. पृथ्वीराजच्या या गाण्याच्या रिलीजची माहिती असलेली पोस्ट शेअर करताना अक्षयने लिहिले की, “शौर्य आणि शौर्याची गाथा. हरी हर गीत मध्ये सम्राट पृथ्वीराज चौहान यांची शक्ती अनुभवा. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत रिलीज होत आहे. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात 3 जून रोजी सम्राट पृथ्वीराज चौहान नक्की बघा.” पृथ्वीराज हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माण करण्यात आला आहे आणि डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिग्दर्शित केला आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच 3 जून रोजी पृथ्वीराज चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर व्यतिरिक्त सोनू सूद, संजय दत्त, आशुतोष राणा, मानव विज, साक्षी तन्वर, ललित तिवारी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अक्षयने म्हटले की नुकतेच रिलीज झालेलं हरी हर हे गाणे त्याने त्याच्या संपूर्ण अभिनय कारकिर्दीत ऐकलेले सर्वात देशभक्तीपर गाणे आहे.
या गाण्याबद्दल बोलताना अक्षय म्हणाला की, “माझ्या मते, हरी हर’ हा चित्रपटाचा आत्मा आहे आणि हे गाणे सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या शौर्याला दिलेली मानवंदना आहे. सम्राट पृथ्वीराज चौहान यांनी आपल्या मातृभूमीचे निर्दयी आक्रमक, महम्मद घोरीपासून संरक्षण करण्यासाठी सर्वस्व अर्पण केले. या गाण्यात सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनाचे सार आहे. रिलीज झाल्यावर या गाण्याला चाहत्यांकडून आश्चर्यकारक प्रतिसाद मिळत आहे आणि काही वेळातच या गाण्याचे व्ह्यूज वाढत आहेत.गाण्याच्या व्हिज्युअलमध्ये अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, संजय दत्त, मानव विज, आशुतोष राणा आणि इतर कलाकार युद्ध करताना दिसत आहेत.
विश्वसुंदरी मानुषी छिल्लरचा पहिला चित्रपट
पृथ्वीराजचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी टेलिव्हिजन महाकाव्य ‘चाणक्य’ आणि समीक्षकांनी प्रशंसित केलेला चित्रपट ‘पिंजर’ दिग्दर्शित केले आहेत. या चित्रपटात नवोदित मानुषी छिल्लरने सम्राट पृथ्वीराज यांच्या प्रिय पत्नीची म्हणजेच सम्राज्ञी संयोगिताची भूमिका साकारली आहे आणि तिचा लाँच हा नक्कीच 2022 मधील बहुप्रतिक्षित पदार्पणापैकी एक आहे.
Photo Credit – Prithviraj Movie Social Media
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक