बेडरुममध्ये बेड हा सगळ्यात महत्वाचा आहे. ही आपली अशी जागा जिथे आपण निवांत झोपतो. बेडसाठी बेडशीट निवडताना आपण अनेक गोष्टींची काळजी घेतो. त्यांचा रंग आणि त्यावरील डिझाईन या आपल्याला निवडक आणि सुंदरच हव्या असतात. बेडशीट घालणे हे एक टास्क असते. बेड जितका मोठा तितक्या अडचणी या जास्त असतात. त्यासाठीच हल्ली फिटेट बेडशीटचा पर्याय आला आहे. ज्या घालायला खूपच सोप्या असतात. फिटेट बेडशीट म्हणजे नेमके काय? त्यांचा वापर आणि त्यांची स्वच्छता कशी असायला हवी ते आज आपण जाणून घेऊया. चला करुया सुरुवात
फिटेट बेडशीट म्हणजे काय?
फिटेट बेडशीटमध्ये इलास्टिक लावलेले असते. त्यामुळे या बेडशीट मॅटरसला अगदी चांगल्या घट्ट बसतात. अनेकदा घरात लहान मुलं असली की, बेडशीट कितीही नीट घातली की, त्याचा चोळामोळा करुन टाकतात. बेडशीट नीट करता करता नाकी नऊ येते. अशावेळी या फिटेट बेडशीट खूप जवळच्या वाटतात. कारण इलास्टिकमुळे त्या चांगल्या धरुन राहतात. तुमच्याकडे एकजरी अशी बेडशीट असेल तर तुम्हाला ती बेडशीट घालताना पहिल्यांदा जड जाईल पण सरावाने ही बेडशीट तुम्हाला अधिक सोयीस्कर वाटेल.
फिटेट बेडशीटची अशी करा स्वच्छता
आता बेडशीट घेतल्यानंतर ती इतर बेडशीटप्रमाणे नाही म्हटल्यावर त्याची स्वच्छता करतानाही तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल असे वाटत असेल पण त्याची स्वच्छता नेमकी कशी करायची चला घेऊया जाणून
- बेडशीटची स्वच्छता करण्यासाभी वेगळे असे काही करावे लागत नाही. तुम्हाला ही बेडशीट डिटर्जंटमध्ये अगदी सहज धुता येते. त्यामुळे काळजी करण्याचे काहीही कारण नाही.
- बेडशीट चांगली बसल्यामुळे ती पटकन खराबही होत नाही. त्यामुळे ती आठवडाभर घातली तरी चालू शकते.
- बेडशीट या अगदी टाईट झाल्या असतील तर ती काढताना थोडी काळजी घ्या. कारण ती फाटण्याची शक्यता असू शकते.
- बेडशीट धुताना तुम्ही थोडी वेगळी धुतली तर अधिक चांगले. कारण मशीनमध्ये इतर कपड्यांसोबत धुताना त्याच्या इलास्टिकमध्ये इतर कपडे अडकण्याचीही तितकीच भीती असते. त्यामळे ही काळजी घ्यायला विसरु नका.
- बेडशीटमध्ये तुम्हाला वेगवेगळे रंग आणि डिझाईन्सचे पर्याय मिळतात. हे सगळे पर्याय देखील तुम्ही नक्की ट्राय करायला हवेत.
फिटेट बेडशीटची समस्या
आता फिटेट बेडशीट जितक्या चांगल्या तितकेच त्याच्या काही समस्या देखील आहेत. चांगल्या कंपनीचे निवडा. याचे इलास्टिक चांगले असणे गरजेचे आहे. ते चांगले असेल तर ती बेडशीट चांगली टिकते. नाहीतर या फिटेट बेडशीटचा काहीही उपयोग होत नाही. यामध्ये हलली वेगवेगळ्या डिझाईन्सचे पर्याय आहेत. ते देखील ट्राय करायला काहीच हरकत नाही.
आता तुमच्या बेडला द्या फिटेट बेडशीटचा लुक