ADVERTISEMENT
home / आरोग्य
वात असलेल्यांनी टाळावा हा आहार

वात वाढवणारा आहार कोणता,तो आताच टाळा

अनेकांची शरीरप्रवृत्ती ही वाताची असते. खूप जणांना काही ठराविक वयानंतर वाताचा त्रास जाणवू लागतो. सांधे दुखणे, चालण्यास अडथळा होणे, गुडघे कमजोर झाल्यासारखे वाटणे अशी काही वाताची लक्षणे असतात. वात झालेल्यांना अनेक गोष्टी टाळाव्या लागतात. त्यांना उत्तम असा आहार घेणे फारच बंधनकारक असते. वाताचा त्रास हा अगदी कोणालाही होऊ शकतो. शरीरात वात वाढला की, या सगळ्या गोष्टींचा त्रास आपल्याला होऊ लागतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर वात म्हणजे शरीरावर येणारा अतिरिक्त ‘ताण’ हा ताण मानसिक असत नाही तर हा ताण आतून आलेला असतो. त्यामुळेच चालणे, उठणे, बसणे असा त्रास होऊ लागतो. 

     साधारण 4oशी उलटली की, अनेकांना संधिवाताचा हा त्रास होतो. तर काही जणांना अगदी जन्मजातच या त्रासाने ग्रासलेले असते. त्यामुळे या आजाराबद्दल माहिती घेऊ तितकी कमीच आहे. वाताचा त्रास होत असेल तर आहार हा योग्य असावा लागतो. या आहारामध्ये कोणत्या गोष्टी टाळलेल्या बऱ्या असतात या देखील माहीत असायला हव्यात.  यासाठी आयुर्वेदाचार्य डॉ. अश्विन सावंत यांनी दिलेली ही महत्वाची माहिती 

वात वाढायला आहाराच्या या चुकीच्या सवयी कारणीभूत ठरतात. चला जाणून घेऊया या नेमक्या सवयी कोणत्या

  1.  शरीरामध्ये थंडावा निर्माण करणाऱ्या गोष्टी वात असणाऱ्यांनी खाऊ नये. कोरडेपणा, पोकळपणा वाढणारा आहार कमी करायला हवा. त्यामुळे वात विकोपाला जाऊ शकतो. 
  2. जर तुम्ही भाज्या खात असालत तर त्या ओल्या म्हणजे रसभाजी असलेल्या असायला हव्यात याचे कारण असे की, ज्या भाज्या कोरड्या असतात त्या भाज्यांमुळे तुमच्या शरीराला आवश्यक घटक मिळत नाही. 
  3. सुकलेल्या भाज्या जास्त काळासाठी खाणे हे देखील घातक असते ते टाळायला हवे. 
  4. सुके मासे हे खूप जणांच्या आवडीच्या भाग आहे. खारवलेले सुके मासे चवीला खूप चांगले लागले तरी देखील हा कोरडा आहार आणि मिठाचे अतिरिक्त प्रमाण यामुळे शरीराला वात होण्याची शक्यता जास्त असते. 
सुक्या माशांचे सेवन टाळा
  1. शरीराची एक रचना आहे या रचनेनुसार आहार घेणे हे तुमच्यासाठी फार गरजेचे असते असे असताना जर तुम्ही दूध मासे, आंबट फळे- दूध अशा वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करुन खात असाल तर त्याचा परिणाम देखील तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. 
  2. खूप अति खाणे देखील आरोग्यासाठी हानिकारक असते. पुरेशा प्रमाणात आहार घेतला नाही तरी देखील वात वाढू  शकतो. 
  3. मूग, मसूर, तूर, वाटाणे, मटार, पावटे हे चवीला आणि आरोग्यासाठी कितीही पोषक असले तरी देखील ते वात असणाऱ्यांसाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे याचे सेवन कमी प्रमाणात करायला हवे. 
  4. खूप जणांना अति उपवास आणि अनशन म्हणजेच जेवण न करण्याची सवय असते ही सवय ही आरोग्यास हानिकारक ठरु शकते. त्यामुळे जेवण हे व्यवस्थितच असायला हवे. 
  5.  तुरट-तिखट- कडू अशा चवी आपल्याला कितीही आवडल्या तरी देखील वात असणाऱ्यांनी या गोष्टी टाळलेल्या बऱ्या असतात. कारण त्यामुळेही वात विकोपाला जातो. 
  6. शरीरात मॉईश्चर टिकून राहणे फार जास्त गरजेेचे असते. जर शरीरात मॉईश्चर टिकून ठेवायचे असेल तर तुम्ही बुळबुळीतपणा आणि ओलावा कमी करणारे पदार्थ टाळायला हवेत. त्यामुळे सांधे दुखी जास्त प्रमाणात होते. 

आता  वात प्रवृत्तीच्या लोकांनी आहार घेताना या गोष्टींचा नक्की विचार करावा. 

ADVERTISEMENT
21 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT