ख्रिसमस आणि नववर्षाची चाहुल म्हणजे वेकेशन टाईम सुरू… कारण अनेकांना नाताळची सुट्टी मिळते, शाळेला सुट्टी असते. त्यामुळे या काळात वेकेशनवर जाण्याचं प्रमाण जास्त असतं. वेकेशन म्हणजे धकाधकीच्या काळात स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काढलेला खास वेळ. वेकेशनवर असताना अनेक जण मात्र कानात वारं भरलेल्या प्राण्यांप्रमाणे वागतात. काहिही खाणं, कसंही राहाणं म्हणजे वेकेशन नाही. कारण खाण्या-पिण्याचे नियम पाळले नाही तर वेकेशनवरून आल्यावर आजारपणाचा सामना करावा लागतो. यासाठी वेकेशनवर असताना पाळा या फूड सेफ्टी टिप्स
वेकेशन पाळण्यासाठी फूड सेफ्टी नियम
तुम्ही वेकेशनवर असताना जर आहाराबाबत काही नियम पाळले तर तुम्हाला वेकेशनचा आनंद खऱ्या अर्थाने घेता येतो.
वेळेचे भान ठेवा
वेकेशनवर अथवा प्रवासात असताना तुम्ही आहाराबाबत वेळेचे भान नक्कीच ठेवायला हवं. कारण जर तुमची नेहमीची खाण्याची वेळ चुकली तर तुम्हाला पित्त, अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. यासाठी प्रवासात तुमच्यासोबत सुकामेवा, फळं, ब्रेड बटर असे काही पौष्टिक पदार्थ नक्कीच ठेवा. ज्यामुळे तुमचं पोटही भरेल आणि ज्याचा तुम्हाला त्रासही होणार नाही.
फिरायला जायचं आहे तर उत्तम पर्याय आहेत कोकणातील पर्यटन स्थळे – Places To Visit In Konkan
कच्चे पदार्थ खाऊ नका
वेकेशनवर असताना तुम्ही ज्या ठिकाणी जाता त्यानुसार तुमचा आहार बदलत असतो. तुम्ही ज्या भागात आहात त्यानुसार तिथे मिळणारे पदार्थ जरूर खा. मात्र एक लक्षात ठेवा कोणताही पदार्थ खाताना तो नीट शिजला आहे याची काळजी घ्या. कारण तुमच्या पोटाला जर कच्चे पदार्थ खाण्याची सवय नसेल तर अर्धवट शिजलेले अन्न तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. यासाठी अंडी, मांस, चिकन नेहमी शिजवूनच खा. कारण अर्धवट शिजलेले मांस खाण्यामुळे पोट बिघडू शकते.
पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळं (Places To Visit In Pune In Marathi)
उघड्यावरील पाणी पिऊ नका
वेकेशनवर असताना तुम्हाला बाहेरील खाद्यपदार्थ खाण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र बाहेरचे पाणी मात्र नक्कीच पिऊ नका. उघड्यावरील पाणी पिण्यामुळे तुमच्या पोटाला त्रास होऊ शकतो. यासाठी प्रवासात नेहमी मिनरल वॉटर प्या. शक्य असेल तर तुम्ही जिथे राहाणार आहात तिथे पाणी गरम करण्याची सोय असेल तर उकळलेले पाणी प्या.
गर्दीच्या ठिकाणापासून दूर राहा
कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंगचे महत्त्व सर्वांना पटलो आहे. आता पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत झाले आहे. प्रवासाला परवानगी मिळाल्यामुळे वेकेशनवर लोक जात आहेक. मात्र वेकेशनवर असताना शक्य असेल तर गर्दीच्या ठिकाणी फिरणे टाळा. कारण अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही.