माझ्या एका अनुभवानंतर आजचा विषय तुमच्यासोबत शेअर करायचा मी निर्णय घेतला आहे. मला अचानक अंगावर खाज आली आणि मला पित्ताचा त्रास झाला हे कळले. काही खास कार्यक्रम घरी असल्यामुळे मला त्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नव्हते.म्हणूनच मी लगेचच डॉक्टरा गाठले. त्यांनी मला काय खाल्ले याची यादी विचारली. त्यानंतर मी रात्री झोपताना असे काही प्यायले होते की,त्याचा परिणाम पित्ताचे चट्टे येण्यावर झाला होता.अनेकदा आपल्याला काहीही खाण्याचा मोह आवरत नाही.दिवसाच्या कोणत्या प्रहरी आपण हा पदार्थ खायला हवा ते कळत नाही. सकाळी, दुपार संध्याकाळच्या वेळी काहीही खाल्लं तरी ते पचवता येतं. पण कधी कधी खूप रात्री खाल्लेले पदार्थ पचत नाही. त्याचा परिणाम हा ॲसिडिटीमध्ये होतो. तुम्हालाही सतत ॲसिडिटी होत असेल आणि त्यामुळे अंगावर पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्हाला काही पदार्थ रात्रीचे खाणे बंद करायला हवे.
कॉफी
मी कॉफीची चाहती आहे. अगदी कोणत्याही वेळी मला कॉफी प्यायला आवडते. पण त्याच कॉफीचे रुपांतर ॲसिडिटीमध्ये होऊ शकते. विशेषत: काळी कॉफी ही कॉफी तुम्ही दिवसभरात ॲक्टिव्ह असताना प्यायली तर चालू शकते. पण तीच तुम्ही रात्री प्यायली तर त्याचा त्रास तुम्हाला होतो. या कॉफीमध्ये तुम्ही लिंबू पिळून पित असाल तर ही ॲसिडिटी आणखी वाढते. शिवाय कॉफी जेवणानंतर घेतल्यामुळे झोप देखील उडते जे अजिबात चांगले नाही. जागरण आणि ॲसिडिटीवर्धक पदार्थांमुळे पित्ताचा त्रास होतो. त्यामुळे तुम्ही हे पिणं नक्कीच टाळायला हवं.
काळा आणि पिवळा गुळ काय आहे दोघांमधील फरक, फायदे-तोटे
स्ट्रॉबेरी
खूप जणांना सीझनल फळ खायला खूप आवडतात. स्ट्रॉबेरी हे अनेक चांगल्या गुणांनी युक्त असे आहे. पण तरीदेखील त्याचे उपाशी पोटी किंवा रात्रीचे सेवन हे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. त्यामुळे तुम्ही स्ट्रॉबेरीचे चाहते असाल तरीसुद्धा थोडे जपून कारण त्याचा तुम्हाला नाहक त्रास होऊ शकतो. स्ट्रॉबेरीचे सेवन करु नका असे नाही पण त्याचे सेवन करताना थोडे थोडे करा. म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही.
लिंबूवर्गातील फळे
लिंबू शरीरातील फॅट कमी करण्यासाठी फायद्याचे असले तरी देखील त्याचे सेवन उशीरा रात्री करणे अजिबात चांगले नाही. त्यामुळे तुम्ही चहामध्ये लिंबू पिळून किंवा पाण्यात लिंबू पिळून पित असाल तर त्यामुळेही तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते. त्यामुळे शक्यतो तुम्ही रात्री याचे सेवन करणे टाळा.त्यामुळेही तुम्हाला पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रात्री आंबट असे कोणतेही पदार्थ खाऊ नका.
मोड आलेले गहू खा आणि मिळवा फायदेच फायदे
दूध
खूप जणांना दूध रात्री झोपताना प्यायची सवय असते. पण काही जणांच्या शरीराला दूध हे अजिबात चालत नाही. काही जणांना दुधामधील लॅक्टोसची ॲलर्जी असते. त्यांना दूध पचत नाही. दूध ज्यांना पचत नसेल तर अशांनी अजिबात दूधाचे सेवन रात्री करु नका. कारण ते बाधण्याची शक्यता असते. दूधामुळे तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते. इतकेच नाही. तर तुम्हाला पित्ताचा त्रास देखील होऊ शकतो.
आता तुम्ही रात्री या गोष्टी चुकून घेत असाल तर तुम्ही त्या टाळलेल्याच बऱ्या