ADVERTISEMENT
home / आरोग्य
पावसाळ्यात पोट बिघडलं असेल तर हे पदार्थ खा, मिळेल आराम

पावसाळ्यात पोट बिघडलं असेल तर हे पदार्थ खा, मिळेल आराम

पावसाळ्यात वातावरणात झालेले बदल शरीरावर परिणाम करू लागतात. कारण या काळात तुमची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते. पचनशक्ती मंदावल्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही. सहाजिकच या काळात अपचन, गॅस होणे, पोट बिघडणे, जुलाब असे त्रास जास्त जाणवतात. पावसाळा हा फिरण्यासाठी उत्तम असल्यामुळे या काळात अनेक पावसाळी पिकनिक काढल्या जातात. अशा ठिकाणी तेलकट, मसालेदार आणि उघड्यावरचे पदार्थ खाण्यात खूप मौज वाटते. मात्र मुळातच तुमची प्रतिकार शक्ती आणि पचनशक्ती कमी झालेली असल्यामुळे या पदार्थांमुळे बऱ्याचदा पोट बिघडते. अशा वेळी म्हणजेच पोट बिघडल्यावर नेमकं काय खावं हे अनेकांना समजत नाही. चुकीचे पदार्थ खाण्यामुळे पोटाची समस्या अधिकच वाढू शकते. यासाठीच जाणून घ्या असे पदार्थ जे तुम्ही पावसाळ्यात पोट बिघडल्यावर आवर्जून खायला हवेत.

पावसाळ्यात पोट बिघडल्यावर काय खावं 

पावसाळ्यात तुमचं पोट बिघडलं की नेमकं काय खावं हे प्रत्येकाला माहीत असायला हवं.

दही

दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. पावसाळ्यात दही खाण्यामुळे तुमची पचनशक्ती मजबूत होते. जर तुमचं पोट बिघडलं असेल तर जुलाब थांबण्यासाठी, पोट स्वच्छ होण्यासाठी आणि पोटाला आराम मिळण्यासाठी तुम्ही दही खायला हवं. कारण दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. चांगले बॅक्टेरिआ पोटात गेल्यामुळे आतड्यांना आराम मिळतो. पचनशक्ती पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होते. फक्त लक्षात ठेवा नेहमी दुपारी दही खा रात्रीच्या जेवणात दही खाऊ नका. 

केळं

पोट बिघडल्यानंतर सतत जुलाब अथवा उलटीमुळे तुमचे शरीर अशक्त होते. अशा वेळी असा पदार्थ खायला हवा जो पचायला हलका आणि त्वरित शक्ती देईल. म्हणूनच पोट बिघडल्यावर केळं खावं. कारण केळं सूपरफूड म्हणून ओळखलं जातं. पोटाच्या समस्या यामुळे कमी होतात शिवाय तुम्हाला त्वरीत उत्साही वाटू लागतं. पोट बिघडू नये आणि पोट नियमित स्वच्छ व्हावं यासाठी दररोज एक केळं खाण्यास काहीच हरकत नाही. 

ADVERTISEMENT

लिंबू पाणी

पोट बिघडलं तर जुलाब अथवा उलटीमुळे तुमच्या पोटातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशा वेळी जलयुक्त पदार्थ घेल्यामुळे तुम्ही डिहायड्रेट होत नाही. जर पोट बिघडल्यावर तुम्ही लिंबू पाणी घेतलं तर त्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती पुन्हा मजबूत होते. कारण लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं. ज्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते शिवाय तुमची पचनशक्तीही सुधारते. यासाठीच पावसाळ्यात पोट बिघडल्यावर लिंबू पाणी प्यावे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

26 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT