ADVERTISEMENT
home / Fitness
पायाच्या पोटऱ्या दुखतात घरगुती उपाय

पायाच्या पोटऱ्या दुखतात घरगुती उपाय (Pay Dukhane Upay In Marathi)

आपल्याकडून आजकालच्या बदलेल्या जीवनशैलीत अनेकांना कमी वयातच पाय दुखण्याची समस्या जाणवू लागते. कधी हे पायाचं दुखणं अचानक उद्भवतं तर कधी थांबून थांबून जाणवतं. पूर्वीच्या काळी आपल्या आजीआजोबांना पाय दुखण्याचा किंवा सांधेदुखीचा त्रास हा म्हातारपणी जाणवायचा. पण आजकालच्या पिढीला हा त्रास तरूणपणीच जाणवू लागला आहे. याचं कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि बदलेल्या खाण्याच्या सवयी यामध्येही दडलेले आहे. तसंच आजकाल दगदग टाळण्यासाठी अनेकजण शक्य असेल तेव्हा लिफ्टचा वापर करतात किंवा रिक्षाने प्रवास करणे. तासंतास कामामुळे एका ठिकाणी बसून राहणे, एसीमध्ये जास्त वेळ असणे यासारख्या गोष्टींमुळे ही पायाचं दुखणं जाणवू लागलं आहे. चला जाणून घेऊया पायाचे तळवे दुखणे उपाय (pay dukhane upay in marathi), करणे आणि लक्षणे.

पायाचं दुखणं म्हणजे काय? (What Is Foot Pain)

what is foot pain

आपले पाय हे हाडं, लिगामेंट्स, टेंडन्स (ligament, tendons) आणि स्नायूपासून बनलेले असतात. या चारही घटकांनी योग्य रितीने काम न केल्यास पाय दुखू शकतात. जेव्हा आपण उभे राहतो किंवा चालतो तेव्हा आपल्या पायांवर दबाव पडतो. ज्यामुळे पाय दुखणंही कॉमन गोष्ट आहे.

पाय दुखण्याची लक्षणं (Symptoms Of Foot Pain)

पायाच्या एक किंवा अधिक भागात दुखू लागल्यास किंवा त्रास होऊ लागल्यास पायाचं दुखणं असं म्हटलं जातं. पायाच्या दुखण्यात खालील गोष्टींचाही समावेश होतो.

ADVERTISEMENT

– पायाची बोट दुखणं.
– टाचा दुखणं
– तळव्याचं हाड किंवा पायाच्या पंज्याचं हाड दुखणं
– तळवे दुखणं इ.

हे पायाचं दुखणं कमी किंवा अधिक असू शकतं. एखाद्या दिवशी जास्त वेळ उभं राहिल्यानेही पाय दुखू शकतात. जास्तकरून पायाचं दुखणं हे लवकर बरं होतं. पण कधी-कधी जास्त काळासाठीही हा त्रास जाणवू शकतो.

जर तुमचा पाय खूप काळापासून दुखत असेल आणि कोणत्याही उपायाने आराम मिळत नसेल तर वेळीच डॉक्टरांकडून चेकअप करून घ्या. खासकरून जेव्हा हे दुखणं एखाद्या जखमेमुळे असेल. अनेक वेळा जखमेचा परिणाम आपल्याला वरवर दिसत नाही. पण अंतर्गत स्नायूंवर याचा परिणाम झालेला असतो. त्यामुळेही पाय दुखू शकतो.

पाय दुखण्याची कारणे (Causes Of Foot Pain)

पाय दुखण्याची अनेक कारण असू शकतात. स्नायू आखडणे, स्नायूंचा थकवा, जास्त चालणे, जास्त व्यायाम, स्ट्रेस, ब्लड क्लॉटींगमुळे गाठी होणं, गुडघे,हिप्स आणि पायांमध्ये योग्यरीतीने रक्तप्रवाह न होणं, पाणी कमी पिणं, एकाच जागी जास्त उभे राहणे, आहारात कॅल्शिअम आणि पॉटेशिअमसारख्या व्हिटॅमीन्सची कमतरता, गंभीर जखम होणं किंवा कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन किंवा आजार इ. अनेक वेळा शरीरातील हाडं कमकुवत झाल्यानेही पाय दुखण्याची तक्रार जाणवते.

ADVERTISEMENT

पायाची पोटरी दुखणे उपाय (Home Remedies For Foot Pain In Marathi) 

Home Remedies For Foot Pain In Marathi

असं म्हणतात की, माणसाच्या पायांमध्ये एकूण 26 हाडं असतात. यामध्ये टाच किंवा पावलाचं हाड म्हणजेच कॅलकेनियस सर्वात मोठं असतं. माणसाच्या टाचेच्या हाडात नैसर्गिकरित्या शरीराच वजन पेलण्याची आणि संतुलित ठेवण्याच्या उद्देश्याने तयार करण्यात आलं आहे. आपण चालतो किंवा धावतो तेव्हा त्याच्या दबाव हे हाड झेलंत जो जमिनीवर पाय ठेवल्याने उत्पन्न होतो आणि नंतरच आपण पुढचं पाऊल ठेवतो. चला जाणून घेऊया पायाची शिर दुखणेवर उपाय

हॉट अँड कोल्ड थेरपी (Hot And Cold Water Therapy)

हॉट अँड कोल्‍ड वॉटर थेरेपी पाय दुखण्यावर उपाय आहे. गरम पाण्याची ट्रीटमेंट ब्लड फ्लोला प्रोत्साहन देते आणि थंड पाण्याची ट्रीटमेंट सूज कमी करण्यास मदत करते. दोन पाण्याच्या बादल्या घ्या एकामध्ये थंड तर दुसऱ्यामध्ये सहन होईल एवढं गरम पाणी घाला. तुमचे पाय तीन मिनिटं गरम पाण्यात घाला आणि त्यानंतर तीन मिनिटं पाय बाहेर ठेवून 10 सेकंड पुन्हा थंड पाण्याच्या बादलीत घाला. असं 2-3 वेळा करा. पण लक्षात घ्या की, सुरूवात गरम पाण्याने करा आणि शेवट थंड पाण्याने करा. तुमच्या पायाचं दुखणं कमी करण्यासाठी तुम्ही आळीपाळीने 10 मिनिटं गरम आणि थंड पाण्याच्या पॅकचा शेकही घेऊ शकता.

सैंधव मीठ (Use Natural Salt)

सैंधव मीठ हा एक प्रभावी घरगुती उपाय आहे. जो पायाच्या दुखण्यावर तुम्हाला तत्काळ आराम मिळवून देतो. गरम पाणी एका टबमध्ये घ्या आणि त्यात 2-3 चमचे सैंधव मीठ घाला. या पाण्यात तुमचे पाय 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवा. हा उपाय केल्यानंतर पाय कोरडे पडू नयेत म्हणून मॉईश्चराईजर नक्की लावा.

लवंग तेल (Use Clove Oil)

लवंगाच तेल हे डोकेदुखी, सांधेदुखी, अॅथलीट फीट, नेल फंगस आणि पायाचं दुखणं दूर करणार एक अद्भूत तेल आहे. त्वरित आराम मिळण्याकरिता तुम्ही लवंगाच्या तेलाने हळूवार मालीश करू शकता. मसाज केल्याने रक्तप्रवाह प्रोत्साहीत होतो आणि मांसपेशींना आराम मिळतो. पायाच्या दुखण्यावर त्वरित आराम मिळवण्यासाठी एका दिवसात अनेकवेळा मालीश करा.

ADVERTISEMENT

मोहरीच्या बिया (Use Mustard Seeds)

मोहरीच्या बियांचा वापर केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. तसंच रक्ताभिसरण सुधारणे आणि सूज कमी करण्यासाठी या बियांचा वापर केला जातो. मोहरीच्या बिया घ्या, त्या वाटून घ्या आणि त्या एक बादली गरम पाण्यात घाला. तुमचे पाय यामध्ये 10 ते 15 मिनिटं बुडवून ठेवा.

हळद (Use Turmeric)

पायाच्या दुखण्यापासून सुटका मिळवण्यासाठी हळदीचा वापरही फायदेशीर ठरतो. हळदींमध्ये अँटी-ऑक्सीडंट आणि अँटी-इंफ्लेमेट्री गुण आढळतात. हळदीमध्ये आढळणारा करक्यूमिन नावाचा घटक दुखणं कमी करण्यात फायदेशीर ठरतो. तुम्ही आवश्यक असल्यास पाय ज्या ठिकाणी दुखतो तिथे हळदीचा लेप लावू शकता किंवा हळद-दूधही घेऊ शकता.

फिश ऑईल (Fish Oil)

तुम्ही जरी शाकाहारी असलात तरी एक गोष्ट मान्य करावी लागेल की, ओमेगा- 3 ऑईल्स (Omega-3 oils) हे नेहमीच आपल्या पाय दुखण्यावर जलद आणि जास्त गुणकारी ठरतात. तुमच्या रोजच्या आहारात फिश ऑईल सप्लीमेंट्सचा समावेश केल्यास तुमचं पायाचं दुखणं लवकर भरेल. तसंच तुम्ही आहारात सीफूडचा समावेश केल्यासही चांगले रिझल्ट्स मिळतील.

मसाज (Massages)

जर तुमच्या स्नायूंमध्ये कोणत्याही प्रकारचं दुखणं असेल किंवा त्रास होत असेल तर मसाज करणं उत्तम उपाय आहे. तुम्ही मसाज करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल किंवा नारळाच्या तेलाचा वापरही करू शकता. दिवसातूून दोन ते तीन वेळा मसाज केल्यास नक्कीच फायदा होईल किंवा तुम्ही मसाज सेंटरमध्ये जाऊनही फूटमसाज घेऊ शकता.

ADVERTISEMENT

वर्कआऊट फॉर फीट (Workout For Feet)

आधीच सांगितल्याप्रमाणे तुमच्या पायाचा 25% भाग हा स्नायूंचा बनलेला आहे. त्यामुळे तुमच्या स्नायूंची काळजी घेणं अत्यतं महत्त्वाचं आहे. योग्य वर्कआऊट केल्यास तुमच्या स्नायूंची क्षमता वाढते. ज्यामुळे तुमच्या संपूर्ण बॉडीचा बॅलन्स चांगला राहतो आणि पायाचं दुखणंही कमी होतं. तुम्ही रोजच्या रूटीनमध्ये एक सोपा व्यायाम अॅड करू शकता. एक टॉवेल घ्या तो जमिनीवर पसरा आणि तुमच्या पायाच्या बोटांच्या मदतीने तो टॉवेल गोळा करा. असं किमान चार ते पाच वेळा दिवसाच्या सुरूवातीला करा.

स्ट्रेचिंग (Streching)

स्ट्रेचिंग हा तुमच्या स्नायूंमधील तणाव आणि दुखणं कमी करण्याचा सोपा उपाय आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर स्ट्रेचिंग केल्यास तुम्हाला चांगलाच फरक जाणवेल. स्ट्रेचिंगही खरंतर प्रत्येक व्यायामाआधी करण्याची पहिली आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. तुम्ही अनेक क्रिडापटूंना एखाद्या खेळाआधी स्ट्रेचिंग करताना पाहिलं असेल. तसंच काहीसं आपल्या दैनंदिन आयुष्यातही महत्त्वाचं आहे. कारण एखाद्या क्रिडापटूप्रमाणे आपण दिवसभराच्या शर्यतीत धावतच असतो.

तुमचे चपला-शूज बदलून पाहा (Change Your Footwear)

कधी कधी आपण वापरत असलेल्या चपला किंवा शूजमुळेही आपल्याला पाय दुखण्याचा त्रास होऊ शकतो. जसं जास्त उंचीच्या हिल्स वापरणे किंवा जुन्या चपला-शूज वापरणे. चांगल्या फुटवेअरमध्ये समावेश होतो तो चांगल्या सपोर्ट देणाऱ्या, योग्य मापाच्या आणि कुशन असलेल्या चपला-शूजचा. दर सहा महिन्यानंतर तुमचं फुटवेअर बदलणं आवश्यक आहे. खासकरून वर्कआऊट शूज. आजकाल बाजारात पायाच्या दुखण्यासाठी काही खास ब्रँड्सच्या चपलाही मिळतात. त्या नक्की वापरून पाहा. तुमच्या पाय दुखण्यावर नक्कीच फरक पडेल.

पाय दुखणे कसं टाळालं (How To Prevent Foot Pain)

How To Prevent Foot Pain

ADVERTISEMENT

वर आपण पाहिले ते काही सोपे घरगुती आणि दैनंदिन जीवनातील आवश्यक बदल. आता पाहूया पायांची काळजी कशी घ्यावी ते.

  • तुमच्या टाचेला आराम द्या आणि जास्त वजन टाकू नका.
    कोणतीही एथलीट अॅक्टीव्हिटी करण्याआधी पहिल्यांदा स्ट्रेचिंगचे व्यायाम नक्की करा. कारण तुमच्या पायाचं संतुलन कायम ठेवण्यासाठी व्यायामामुळे तुम्हाला मदत मिळेल.
  • चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या ब्रँडच्या चपला किंवा शूज वापरा जे तुमच्या खेळासाठी किंवा दैनंदिन वापरासाठी अनुकूल असतील.
  • काही वेळा लोक टाच दुखू लागल्यावरसुद्धा जास्त वेगाने चालतात किंवा धावतात. अशावेळी अचानक वेगाने वळू नये. अन्यथा स्थिती गंभीर होऊ शकते.
  • धावणं, सायकलिंग, स्वीमिंग इ. असे पायांना मजबूती देणारे व्यायाम करा. असं करताना पाय घासले जाऊ नये म्हणून फूट पॅडचा वापर करा.
  • जेव्हा तुमचा एखादा पाय दुखत असेल तेव्हा तो थोडा वेळ एखाद्या उशीवर किंवा थोडा वर उचलून पडून राहा. एकाच पोझिशनमध्ये जास्त वेळ उभं किंवा बसून राहू नका. त्यामुळेही बरेचदा पाय दुखू लागतात.
  • जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तुमच्या पायांना आराम द्या. कारण कितीही म्हटलं तरी तोही एक महत्त्वाचा अवयव आहे.
  • महिन्यातून एकदा तरी शक्य असल्यास फूट मसाज घ्या किंवा पेडीक्युअर करून घ्या.
  • पायाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक टेस्ट्स करून घ्या.

पायाचं दुखणं टाळण्यासाठी करा मसाज (Massage To Avoid Feet Pain) 

मसाज हा पायांच्या दुखण्यावरील रामबाण उपाय आहे, हे आपण वर पाहिलंच. पण काही सोप्या मसाजमुळे तुमच्या पायांच्या दुखण्यावर लगेच आराम मिळू शकतो. ऑलिव्ह किंवा नारळाचं तेल घेऊन पावलाच्या भागावर हळूवार बोटांनी मसाज करा. तर कधी टाचेच्या भागावर गोलाकार स्ट्रोक्स देत मसाज करा. तुमच्या पावलावर हळूवार गुद्दे देत मसाज करू शकता. जर तुम्हाला घरच्याघरी सुरूवातीला मसाज करणं शक्य नसल्यास फिजिओथेरपीस्टची मदत घेऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला योग्य प्रकारे आणि योग्य वेळेत मसाज करण्याबाबत माहिती मिळेल.

पाय दुखण्याबाबत विचारण्यात येणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे (FAQ’s)

1. घरच्या घरी पायांना आराम कसा देता येईल?

तुम्ही खाली दिलेले व्यायाम आणि रिलॅक्सेशन मेजर्स तुमच्या पायांना आराम देण्यासाठी करून पाहू शकता.

– तुमच्या पायाच्या बोटांची हालचाल करा.
– टाचा जमिनीपासून वर उचला पुन्हा खाली टेकवा.
– पायाखाली बॉल घेऊन तो रोल करा.
– स्ट्रेचिंग करा
– खुर्चीत बसून स्ट्रेचिंग करा

ADVERTISEMENT

2. दुखऱ्या पायापासून सुटका कशी मिळवावी?

जर तुमचा पाय खूपच दुखत असेल तर लगेच आराम मिळावा यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता.

– पायाला गरम आणि थंड पाण्याचा शेक द्या. (वर सांगितल्याप्रमाणे)
– फूट मसाज घ्या.
– तुमचं फूटवेअर बदला
– बर्फाचा शेक द्या.
– एकदमच असह्य असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पेन रिलीव्हर घ्या.

3. फूट मसाजनेही त्रास होऊ शकतो का?

फूटमसाजमुळे तुमच्या पायांचे स्नायू मोकळे होतात आणि पाय दुखत असल्यास वेदनाही कमी होतात. पण काही वेळा जास्त वेळ मसाज झाल्यास किंवा योग्य रितीने मसाज न केल्यास तुमच्या पाय दुखू शकतो.

4. मसाज करणं तुमच्या पायासाठी चांगलं आहे का?

जसं तुमच्या मानेला, पाठीला आणि खांद्यांना मसाज केल्यावर बरं वाटतं तसंच काहीसं आहे पायांबद्दल. त्यामुळे पायाच्या स्नायूंना उर्जा देण्यासाठी, रक्तप्रवाह सुधारण्यासाठी आणि स्नायूंचा तणाव कमी करण्यासाठी पायालाही मसाज आवश्यक आहे.

ADVERTISEMENT
12 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT