ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
मुलांकडून बनवून घ्या किल्ला

दिवाळीत मुलांकडून बनवून घ्या किल्ला, होईल अभ्यासाला मदत

दिवाळीची खरी मजा ही हल्लीच्या मुलांना तेवढीशी घेता येत नाही. मुळातच दिवाळीचे रुप बदलल्यामुळे अनेक पारंपरिक गोष्टी होत नाहीत. दिवाळी म्हणजे खरेदी,पाहुण्यांचे येणे, गिफ्ट देणे, फटाके फोडणे अशाच गोष्टी हल्लीच्या पिढीला माहीत असतात. त्यातच एक बदल म्हणजे दिवाळी अभ्यास पण त्यालाही आता म्हणावे तितके महत्व राहिले नाही. पूर्वी वह्या सजवणे, सुंदर अक्षर काढणे यामध्ये मुलांची दिवाळीची सुट्टी निघून जायची. मुलांना दिवाळीत चांगल्या गोष्टींची माहिती मिळावी यासाठी यंदा त्यांच्याकडून किल्ले बनवून घ्या. मुलांना किल्ले बनवण्यासाठी सांगण्यामागे अनेक फायदे मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे दिवाळीत तुम्ही मुलांकडून कसा अभ्यास करुन घ्यायला हवा ते जाणून घेऊया.

मातीसोबत अभ्यास

 मुलांना मातीत खेळण्याचे अनेक फायदे असतात. मातीत खेळल्यामुळे मुलांचे लक्ष केंद्रित होण्यास मदत मिळते. मातीमध्ये असे अनेक घटक असतात जे त्वचेसाठी फारच फायद्याचे असतात. मुलांना अँटीऑक्सिंडट घटक मिळाल्यामुळे शरीराची क्रिया सुरळीत सुरु राहते. मुलांना आवश्यक असलेली उर्जा ही खेळण्यातून मिळते. शिवाय हल्ली मोबाईलमध्ये गुंतलेल्या मुलांना मातीत खेळल्यामुळे काहीतरी बनवण्याची म्हणजे नवनिर्मितीची इच्छा जागृत करते.

किल्ला का बनवावा?

मुलांकडून किल्ला बनवून घ्या

हल्ली इंग्रजी माध्यमांच्या मुलांना किल्ला काय? फराळ काय? यामधील फरक अजिबात कळत नाही. सोसायटीमध्ये फिरताना मुलांना किल्ली किंवा फराळ काय असतो असा प्रश्न विचारा. त्यामधील अर्ध्या मुलांना तरी या गोष्टी माहीत नसतात. मुलांना अभ्यास यायला हवा असेल तर तुम्ही त्यांच्याकडून मातीचा किल्ला बनवून घ्या. कारण पहिली ते चौथी मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास हा अगदी हमखास असतो. किल्ला म्हणजे काय ? त्याची बांधणी काय असते? स्वराज्य आणि मावळे यांच्याशी निगडीत सगळ्या गोष्टींची कुतुहलता त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी त्यांना किल्ला बनवायला द्या. महाराष्ट्रात अनेक असे किल्ले आहेत. ज्यांची घटण ही इतर किल्ल्यांपेक्षा वेगळी आहे. पन्हाळगड, विशाळगड, शिवनेरी या किल्ल्यांचा अभ्यास करताना आपसुकच मुलांना वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. त्यामुळे तुम्ही मुलांकडून मातीपासून हे वेगवेगळे किल्ले बनवून घ्या.

फोनपासून हटते लक्ष

ऑनलाईन स्कुलच्या नावाखाली मुलांच्या हातात आयता मोबाईल आला आहे. मोबाईलमधून त्यांना बाहेर काढण्यासाठी तुम्ही सुट्टीच्या या दिवसात त्यांना वेगवेगल्या अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हायला सांगायला हवे. मुलांना रांगोळी काढायला आवडत असेल तर त्यांना ते करायला सांगा. कारण त्यामुळे चित्रकला सुधारण्यास मदत होते. फोनपासून या सणांच्या दिवसातही मुलांना बाहेर काढायचे असेल आणि अभ्यासात त्यांना गुंतवायचे असेल तर हे काही प्रयत्न तुम्ही केले तर त्या निमित्ताने मुलांना काही परंपरा आणि काही गोष्टी कळतात. ज्याचा फायदा त्यांना नक्की होतो. 

ADVERTISEMENT

आता दिवाळीत मुलांकडून तुम्ही किल्ला नक्की बनवून घ्या.

अधिक वाचा

50+ Bhaubeej Wishes, Quotes, Msg And Status In Marathi | भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

सुकामेवा खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

ADVERTISEMENT

लहान मुलांसमोर असं कधीच वागू अथवा बोलू नका, होईल चुकीचा परिणाम

03 Nov 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT