चेहऱ्याची त्वचा चांगली ठेवायची असेल तर त्वचेवर योग्य प्रॉडक्ट लावणे गरजेचे असते. मेकअप करायला आवडत असेल तर त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. मेकअप करायचा म्हणजे खूप जण त्वचेला आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी लावणे टाळतात. उदा. मॉश्चरायझर आणि सनस्क्रिन लावण्याचा खूप जणांना कंटाळा असतो. पण सनस्क्रिन हे त्वचेला अगदी मस्ट आहे ते लावले नाही तर त्वचा काळवंडण्याची शक्यता असते. अशावेळी एसपीएफ आणि फाऊंडेशन एकत्र करुन लावता आले तर त्याचे अधिक फायदे मिळू शकतात. सनस्क्रिन आणि एसपीएफ एकत्र कसे करायचे आणि त्याचा वापर कसा करायचा चला घेऊया जाणून
खूप जणांना फाऊंडेशन त्वचेला थेट लावू नये हे माहीत असते. पण तरीही घाई घाईत खूप जण पटकन चेहऱ्याला फाऊंडेशन लावतात. त्यामुळे त्वचेच्या पोअर्सच्या आत मेकअप तर जातोच पण इतकेच नाही तर सूर्याची अतिनील किरणं ही देखील त्वचेला डॅमेज करु शकतात. त्वचेवर कितीही फाऊंडेशनचा थर असला तरी देखील त्वचा खराब कऱण्यास ते कारणीभूत ठरु शकतात. म्हणूनच नुसते फाऊंडेशन अजिबात लावू नका.
फाऊंडेशन आणि एसपीएफ एकत्र लावले तर त्याचा अधिक फायदा त्वचेला होऊ शकतो. हल्ली बाजारात एसपीएफ असलेले फाऊंडेशन मिळते. पण घरी असलेलेच फाऊंडेशन तुम्ही एसपीएफयुक्त करुन लावू शकता.
सनस्क्रिन हे जरी त्वचेसाठी चांगले असले तरी देखील त्वचेवरुन या दोन्ही काढणेही गरजेचे असते. मेकअप काढताना तो नुसता धुवू नका. तर तो मेकअप योग्य पद्धतीने काढणे नेहमी चांगले. त्यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते.
आता एसपीएफसोबत फाऊंडेशन लावून बघा तुम्हाला नक्कीच बदल झालेला जाणवेल.