त्वचेला योग्य पोषण आणि मऊपणा मिळावा यासाठी फेस क्रीम वापरणं खूप गरजेचं असतं. हिवाळ्यात त्वचा जास्त कोरडी होते यासाठी फेस क्रीम, कोल्ड क्रीम, मॉईस्चराईझर, बॉडी लोशन, फेस सीरम, फेस मास्क वापरले जातात. बऱ्याचदा फेस क्रीम जास्त आकर्षक करण्यासाठी त्यामध्ये विविध प्रकारचे सुगंध मिसळले जातात. मात्र असं सुगंधित क्रीम वापरणं त्वचेसाठी मुळीच योग्य नाही. कारण अशा सुगंधित क्रीममुळे तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकतं.
का वापरू नये सुगंधित क्रीम
त्वचेचं पोषण करण्यासाठी त्वचेला पोषण आणि मऊपणा देणाऱ्या क्रीमची गरज असते. सुगंधित क्रीम वापरणं मजेशीर असलं तरी ते त्वचेसाठी योग्य असेलच असं नाही. बऱ्याचदा ब्युटी एक्सपर्ट अशा क्रीम न वापरण्याचा सल्ला देतात. कारण क्रीम सुगंधित करण्यासाठी क्रीममध्ये विविध प्रकारचे केमिकल्स मिसळले जातात. ज्याची तुम्हाला अॅलर्जी असेल तर त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता असते. अशा केमिकलयुक्त क्रीममुळे त्वचेचे आजार, त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
चेहऱ्यावरील खड्डे कमी करण्यासाठी बेस्ट क्रीम (Best Cream For Acne Scar In Marathi)
सुगंधित सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात घातक
फेस क्रीम प्रमाणेच फेस वॉश, शॅम्पू, बॉडी लोशन, बॉडी वॉशमध्येही विविध प्रकारचे सुगंध मिसळले जातात. मात्र अशा प्रकारचे कोणतेही ब्युटी प्रॉडक्ट वापरणे नक्कीच घातक ठरू शकते. क्रीम अथवा उत्पादनाला येणारा वास लपवण्यासाठी अशा प्रॉडक्टमध्ये एखादा आर्टिफिशिअल गंध मिसळतात. आकर्षक सुगंधामुळे प्रॉडक्टला चांगली मागणी मिळते. मात्र या सुंगधामुळे उत्पादनाची गुणवत्ता कमी होते कधी कधीतर अशा सुगंधित उत्पादनाची तुम्हाला अॅलर्जीदेखील असू शकते.
अंगावरील नको असलेले केस काढण्यासाठी बेस्ट क्रीम (Best Hair Removal Cream In Marathi)
सुगंधित उत्पादने खरेदी करण्यापूर्वी घ्या काळजी
सौदर्य प्रसाधनांमध्ये सुगंध मिसळण्याचे ठराविक प्रमाण असते. प्रत्येक ब्युटी कंपनीला या नियमांचे पालन करणे गरजेचे असते. शिवाय तुम्हाला कोणत्या घटकाची अॅलर्जी आहे हे फक्त तुम्हालाच माहीत असू शकते. यासाठी कोणतेही नवे उत्पादन वापरण्यापूर्वी त्याची पॅच टेस्ट घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही चेहऱ्यावर लावण्यासारखे एखादे उत्पादन खरेदी केले असेल तर ते आधी हात अथवा कानाच्या मागे लावून त्याची पॅचटेस्ट घ्या. जर त्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास झाला नाही तरच अशी उत्पादने चेहऱ्यावर लावा. शिवाय अती प्रमाणात सुगंधित उत्पादने वापरणे टाळा ज्यामुळे तुमच्या त्वचेचं संरक्षण होईल.
फेस सीरम आणि मॉईस्चराईझर यात काय आहे फरक (Facial Serum Vs Face Moisturizer)