उलाला उलाला…तू है मेरी फँटसी….. वेगळा आवाज, गोड व्यक्तिमत्व आणि सोन्याची आवड असलेले बप्पी लहरी आज आपल्यात नाहीत. पण तरीही त्यांची गाणी आजही आपल्यासोबत आहेत.बप्पी लहरी यांना सोन्याची किती आवड होती हे आता सगळ्यांनाच माहीत आहे. बप्पी लहरी यांची सोन्याची आवड पाहता त्यांना गोल्डमॅन असे देखील म्हटले जात होते. आता त्यांच्या सोन्याचा विषय आलाच आहे तर त्यांच्या सोन्याचे नक्की झाले काय? याची चर्चा सध्या सगळीकडे होताना दिसत आहे. याशिवाय त्यांच्यावर एक बायोपिकही लवकरच येणार आहे. या चित्रपटासाठी एका अभिनेत्याची निवड देखील करण्यात आली आहे. जाणून घेऊया याविषयी त्यांच्या मुलाने काय सांगितले ते
बप्पी लहरींच्या सोन्याचे काय झाले?
बप्पी लहरी यांच्या सोन्याविषयी त्यांच्या मुलाला खुलासा केला आहे. त्यांच्या मुलाने त्यांचे सगळे सोने म्युझिअमसाठी राखून ठेवले आहे. बप्पी लहरींच्या फॅन्सना हे सगळे सोनं बघता यावं यासाठी त्यांचे सोन्याचे सगळे कलेक्शन तसेच ठेवून दिले जाणार आहे. सोनं हे बप्पी दांसाठी खूपच लकी होते. असे त्यांचे मानने होणे. सोने हे केवळ त्यांच्यासाठी फॅशन स्टेटमेंट नव्हते. त्यांच्यासाठी सोने हे त्यांच्या आयुष्याचा असा भाग होते की, त्यामुळे ते कुठेही बाहेर जाताना सोने घातल्याशिवाय जात नव्हते. त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार रात्र असो किंवा पहाट अगदी कोणत्याही वेळी त्यांना कुठेही जायचे असेल तर ते सोनं घातल्याशिवाय ते कुठेही जात नव्हते.
अमेरिकन सिंगरपासून घेतली प्रेरणा
बप्पी दा अमेरिकन सिंगर एल्विस प्रेसलीचे चाहते होते. एल्विस गाताना सोनं घालायचा ते त्यांना फार आवडायचे. त्याची स्टाईल त्यांना आवडायची. त्याला पाहिल्यानंतर ते सारखे म्हणायचे की, ज्यावेळी मी प्रसिद्ध होईन किंवा यशस्वी होईन. त्यावेळी मी असेच सोने घालीन. यशस्वी झाल्यानंतर बप्पी दांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी सोने घालूनच सगळे कार्यक्रम केले. इतकेच नाही तर ते कुठेही जाताना आपलं सोनं घालूनच जायचं. सोन्याचे कलेक्शन त्यांनी एक एक करुन वाढवले होते.
लवकरच येणार आहे बायोपिक
बप्पी लहरी यांच्यावर एक बायोपिक येणार असल्याचे देखील त्यांच्या मुलाने सांगितले आहे. सध्या बायोपिक म्हटला की, त्या बायोपिकमध्ये काय असेल? कोण काम करेल? अशा चर्चा होऊ लागतात. आता बायोपिकचा विषय त्यांच्या मुलानेच काढला म्हटल्यावर त्याच्यावर काम सुरु झाले असणार यात काहीही शंका नाही. बप्पी दाचे कॅरेक्टर रणवीर सिंह करणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. या प्रोजेक्टला सुरुवात झाल्याचे देखील चर्चेत आहे. बप्पी दा जिंवत असताना त्यांनी त्यांच्या बायोपिकमध्ये रणवीर सिंहने काम करावे अशी इच्छा व्यक्त केली होती. आपले पात्र हा रणवीरच साकारु शकतो असा विश्वास व्यक्त केला होता. बायोपिकबद्दल सांगायचे तर अद्याप चित्रपटाची स्क्रिप्ट तयार नाही. त्यावर अजूनही काम सुरु आहे. येत्या काही काळात हा चित्रपट तयार होईल. त्याची सगळी माहिती लवकरच दिली जाईल.
बप्पी लहरी यांचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी अपेक्षा आहे. इतकेच नाही तर रणवीरला या रुपात पाहणे देखील उत्सुकतावर्धक ठरणार आहे.