ADVERTISEMENT
home / मनोरंजन
gajendra-ahire-s-webseries-sajinde-to-release-in-marathi

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘साजिंदे’ वेबसिरीज घेणार रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव

दिग्दर्शक गजेंद्र अहिरेंच्या प्रत्येक सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच असतो. बाईतल बाईपण प्रभावीपणे मांडणार संवेदनशील मन हे फार कमी पुरुषांकडे असत त्यापैकी एक म्हणजे गजेंद्र अहिरे (Gajendra Ahire) होय. दर्जेदार चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर गजेंद्र अहिरेंनी मोर्चा वळवला आहे तो वेबसिरीजकडे.  चित्रपटाच्या कथेला प्राधान्य मिळवून देण्यासाठी जी धडपड त्यांची असते तीच धडपड एक कथानक वेबसिरीजमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यास गजेंद्र अहिरेंनी प्रयत्न केले आणि ‘साजिंदे’ (Sajinde) ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आणली. ‘व्हीमास मराठी’ प्रस्तुत दिदर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘साजिंदे’ ही रोमँटिक वेबसिरीज ‘व्हीमास मराठी’ या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘व्हीमास मराठी’च्या ‘राडा राडा’ (Rada Rada) या टॉक शो मधून प्राजक्ता माळी (Prajakta Shinde) आणि पूर्वा शिंदे (Purva Shinde) झळकली त्यांच्या या टॉक शो ला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. आता त्यांची रोमँटिक वेबसिरीज रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला येत आहे. 

‘साजिंदे’ या वेबसिरीज OTT वर

अभिनेत्री कश्मिरा ताकटे (Kashmira Takate), अभिनेता ऋषिकेश वांबूरकर (Rishikesh Vamburkar), अमित रेखी (Amit Rekhi), अभिजित दळवी (Abhjieet Dalvi), ऋषिकेश पाठारे (Rishikesh Pathare) या कलाकारांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने साजिंदे या वेबसिरीज मधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. तर या वेबसिरीजमधून कश्मिरा हिने सिनेविश्वात पदार्पण केले आहे. तर या वेबसिरीजची कथा, पटकथा, संवाद, गीत, संगीत याची जबाबदारी गजेंद्र अहिरे यांनी स्वतः पेलवली आहे. तर या वेबसिरीजच्या संकलनाची बाजू ओंकार परदेशी याने सांभाळली आहे. याबद्दल बोलताना गजेंद्र अहिरे असे म्हणाले की, एक फिल्म संपली की पुन्हा नवीन प्रयोग करायचा, ही अस्वस्थता कायम मला सतावत असते आणि म्हणूनच मी ‘साजिंदे’ या वेबसिरीजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली, कथा माझ्याकडे तयार होती, शिवाय स्टारकास्टच्या सोबतीने ही आगळीवेगळी कथानक असलेली वेबसिरीज (Webseries) दिग्दर्शित केली. कथा, दिग्दर्शनासह या वेबसिरीजच्या संगीताची बाजूही मी सांभाळली, एकूणच संपूर्ण चित्रीकरणाचा अनुभव विलक्षणीय होता. ‘साजिंदे’ या वेबसिरीजला ओटीटीवर आणण्यासाठी ‘व्हीमास मराठी’ या प्लॅटफॉर्मने (Vimas OTT Platform) उत्तम साथ दिली. त्यामुळेच ही वेबसिरीज आज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

गजेंद्र अहिरेचे ओटीटीसाठी दिग्दर्शन

आजपर्यंत गजेंद्र अहिरेने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर आता ओटीटीवरही दिग्दर्शन करताना गजेंद्र अहिरे दिसून येणार आहे. आजपर्यंत अनेक चित्रपटांचे वेगवेगळे कथानक गजेंद्र अहिरेने हाताळले आहेत. दरम्यान साजिंदे या वेबची कथाही वेगळी असल्याचे सांगण्यात येत आहे. आजकाल मराठी भाषेतही अनेक वेगवेगळे विषय हाताळले जात असल्याचे दिसून येत आहे. तर अनेक नवनव्या कलाकारांनाही वेबमध्ये वाव देण्यात येत आहे. यामुळे अनेक नव्या कलाकारांनाही काम मिळत आहे आणि नव्या कलाकारांना आपली प्रतिभा दाखविण्याची संधीही मिळत आहे. दरम्यान रसिक प्रेक्षकांना नव्या नव्या वेबसिरीज (New Webseries) पाहायला मिळत आहेत. तर यापुढे कोणते नवे प्रोजेक्ट येणार आहेत याकडेही सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
02 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT