ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Ganpati Bappa Visarjan Quotes In Marathi

गणपती विसर्जन स्टेटस | Ganpati Bappa Visarjan Quotes, Status And Caption In Marathi

भारतीय संस्कृतीत सणसमारंभांना खूप महत्त्व आहे. श्रावण महिना सुरू होताच वेध लागतात ते गणपती बाप्पाच्या आगमनाचे. महाराष्ट्रात दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवस गणपती बाप्पा घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी विराजमान होतात. बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत आणि पूजाअर्चनेमध्ये भक्तगण इतके तल्लीन होतात की बाप्पाला निरोप द्यायचा क्षण कधी जवळ आला हे त्यांना समजतही नाही. दहा दिवसानंतर म्हणजेच अनंत चतुर्दशी दिवशी सार्वजनिक गणपतीचे विसर्जन केले जाते. त्याआधी दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होते. गणपती विसर्जनाच्या या भावूक क्षणी सोशल मीडियावर ठेवा हे खास स्टेटस (Ganpati Visarjan Sad Status In Marathi), विसर्जन कोट्स (Ganpati Bappa Visarjan Quotes In Marathi), अनंत चतुर्दशी कोटस (Anant Chaturdashi Quotes In Marathi) आणि प्रियजनांना पाठवा  गणपती विसर्जन मेसेज (Ganpati Visarjan Message In Marathi).

गणपती बाप्पा विसर्जन कोट्स (Ganpati Bappa Visarjan Quotes In Marathi)

Ganpati Visarjan Quotes In Marathi
Ganpati Bappa Visarjan Quotes In Marathi

अकरा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यावर अतिशय जड अंत:करणाने बाप्पाला निरोप दिला जातो. यासाठीच सोशल मीडियावर ठेवा हे गणपती विसर्जन कोट्स आणि साजरी करा अनंत चतुर्दशी. शेअर करा गणपती विसर्जन सुविचार (Ganpati Visarjan Thought In Marathi).

 • गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी  लवकर या 
 • वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्न कुरू मे देव सर्व कार्येशू सर्वदा… गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
 • वंदितो तूज चरण आर्जव करतो गणराया, वरदहस्त असूद्या माथी, राहू द्या सदैव तुमची छत्रछाया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…
 • कोरोनाचं संकट दूर कर, दाखव तुझी किमया, मग पुढच्या वर्षी तोच जल्लोष पाहायला लवकर ये मोरया…
 • निरोप देतो देवा आज्ञा असावी, चुकले आमचे काही देवा क्षमा असावी… गणपती बाप्पा मोरया
 • अनंत चतुर्दशीच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा…
 • अडचणी खूप आहेत जीवनात, पण त्यांना सामोरं जाण्याची ताकद फक्त तुझ्यामुळे येते… निरोप घेताना एकच आर्शीवाद दे या संकटातून सर्वांची सुखरूप सुटका होऊ दे…
 • डोळ्यात आले अश्रू, बाप्पा आम्हाला नका विसरू, आनंदमय करून चालला तुम्ही, पुढच्या वर्षी पुन्हा वाट पाहू आम्ही…. गणपती बाप्पा मोरया
 • रिकामे झाले घर, रिकामा झाला मखर,  पुढच्या वर्षी पुन्हा घरी येण्या थाटामाटात निघाला माझा लंबोदर
 • आभाळ भरलं होतं तू येताना, आता डोळे भरून आलेत तुला निरोप देताना… गणपती बाप्पा मोरया

वाचा – ष्टविनायक दर्शन कसे करावे

गणपती बाप्पा विसर्जन स्टेटस (Ganpati Visarjan Status In Marathi)

Ganpati Visarjan Status In Marathi

बाप्पाचं विसर्जन करताना मन अतिशय निराश होतं, पण परंपरेनुसार दरवर्षी बाप्पाला थाटामाटात निरोप देऊन पुढच्या वर्षी परत येण्याची विनंती केली जाते. यासाठीच हे खास गणेश विसर्जन स्टेटस (Ganpati Visarjan Sad Status In Marathi).

ADVERTISEMENT
 • ढोल ताशांच्या गजरात, माझा बाप्पा निघाला  थाटामाटात.. गणपती बाप्पा मोरया
 • तुझा चमत्कार दाखवण्यासाठी, पुढच्या वर्षी आर्शीवाद देण्यासाठी… बाप्पा लवकर ये…
 • ही संमदराची लाट, देवा पाहते आहे तुझी वाट… गणपती  बाप्पा मोरया
 • बाप्पा चालला त्याच्या घरी, तुझा आर्शीवाद असाच राहो सर्व भक्तांच्या माथ्यावरी… गणपती बाप्पा मोरया
 • गणेश विसर्जनाच्या  दिवशी सर्व भक्तांच्या आयुष्यातील वेदना, दु:ख कमी होवो… हिच बाप्पा चरणी प्रार्थना
 • स्वर्गात जे सुख नाही, ते तुझ्या चरणाशी आहे, कितीही मोठी समस्या असू दे, तुझ्या नावातच समाधान आहे
 • बाप्पाचं आणि माझं एक छान नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही आणि बाप्पा मला काहीच कमी पडू  देत नाही… गणपती बाप्पा मोरया
 • अपराध भक्तांचे उदरात, साठवते लंब उदर तुझे,
  प्रार्थना मी इथे करतो पण त्रिभुवनात आहे गुणगाण तुझे… गणपती बाप्पा मोरया
 • सुखकर्ता, दु:खहर्ता… गणपती बाप्पा मोरया
 • जीव जडला चरणी तुझिया.. आधी वंदू तुज मोरया… गणपती बाप्पा मोरया

गणेश विसर्जन कॅप्शन (Ganpati Visarjan Caption In Marathi)

Ganpati Visarjan Caption In Marathi
Ganpati Visarjan Caption In Marathi

लाडक्या बाप्पाला धूमधडाक्यात निरोप देण्याची तयारी सुरू झाली असेल तर हे गणेश विसर्जन कॅप्शन (Ganpati Visarjan Caption In Marathi) तुमच्या स्टेटसवर असायलाच हवेत. 

 • तू निघालास पुन्हा परतीच्या वाटेवर, तुझ्या  निरोपाचा क्षण येतास मन झाले अनावर… गणपती बाप्पा मोरया
 • निरोप देऊ आज आनंदानं, सेवा करण्याचा प्रयत्न केला लेकरानं, काही चुकलं असेल तर देवा माफ कर आम्हाला मोठ्या अंत:करणानं 
 • बाप्पा आज तू जात आहेस, माझं मनच नाही बघ आभाळपण रडत आहे
 • तुझं येणं धुमधडाक्यात, तुझं जाणं धुमधडाक्यात, एवढीच इच्छा कायम राहा तुमच्या आमच्या मनात
 • एक दोन तीन चार… गणपतीचा जयजयकार, पाच सहा आणि सात… बाप्पा आहे आमच्या मनात
 • तुम्ही कोणालाही त्रास देऊ नका, बाप्पा तुमचे सदैव रक्षण करेल.. गणपती बाप्पा मोरया
 • भक्ति गणपति, शक्ति गणपति, सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती, महा गणपती सर्वांचे रक्षण कर…
 • वंदन करतो  गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला, प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना
 • सागराचे  पाणी कधीच आटणार नाही. बाप्पा तुझी आठवण कधीच मिटणार नाही… हाच जन्म काय, हजार जन्म तरी तुझी साथ कधीच सुटणार नाही
 • कोणतीही आली समस्या, तरी तो सोडणार नाही आमची  साथ, अशा आमच्या लाडक्या बाप्पा माझा साष्टांग नमस्कार

गणेश चतुर्थीची माहिती मराठीत (Ganesh Chaturthi Information In Marathi)

गणपती विसर्जन मेसेज (Ganpati Visarjan Message In Marathi)

Ganpati Visarjan Message In Marathi
Ganpati Visarjan Message In Marathi

गणपती बाप्पाचे विसर्जन करण्याचा क्षण कितीही भावूक असला तरी या निमित्ताने तुमचे नातेवाईक मित्रमंडळी घरी येतात. शिवाय पुढच्या वर्षी बाप्पा परत आपल्या घरी येणारच असतात तेव्हा बाप्पाला आनंदाने निरोप देण्यासाठी प्रियजनांना पाठवा हे गणपती विसर्जन मेसेज (Ganpati Visarjan Message In Marathi)

 • प्रेमाने  जे काही मागाल ते आज मिळेल, कारण गणपती बाप्पाला त्याचा प्रत्येक भक्त प्रिय आहे… गणपती बाप्पा मोरया
 • बाप्पा तुझा हात सदैव आमच्या माथी असू दे, तुझी साथ जन्मोजन्म असू दे, आनंद येऊ दे घरी, प्रत्येक कामात मिळू दे ऐश्वर्य समृद्धी… गणपती बाप्पा मोरया
 • पुन्हा  लागेल आस तुझ्या आगमनाची, तुला पुन्हा डोळे भरून पाहण्याची, कधी उजाडेल तो सोनेरी दिवस, गणराया पुन्हा लागेल वेड तुझ्या आगमनाचे… गणपती बाप्पा मोरया
 • देव आला माझ्या घरी, हौस भागवली दर्शनाची, पुन्हा आला तो क्षण, बाप्पा वेळ झाली तुझी परत तुझ्या घरी जाण्याची…गणपती बाप्पा मोरया
 • जाण्यास निघाला गणपती बाप्पा, सारगतीरी जमला गोपाळांचा मेळा, खिन्न मनाने सारे  म्हणतील गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
 • तू तर ठेवा, सकल कलांचा, सुगंध तू तर शब्दफुलांचा, निराकार तू कलाकार तू, बाप्पा माझी चुकभूल सावरा
 • तुच सुखकर्ता, तुच दु:खहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा
  बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा, गणपती बाप्पा मोरया…
 • सेवा जाणुनी, गोड मानुनी, द्यावा आर्शीवाद आता, 
  निरोप घेतो देवा आता पुढच्या वर्षी लवकर या…
 • गजानना गजानना करीत तुजसि प्रार्थना
  कृपा सदैव ठेव तू मनात हीच कामना.. गणपती बाप्पा मोरया
 • तुच कर्ता आणि करविता, शरण तुला भगवंता, मी शरण तुला भगवंता

दिवसाची सुरूवात करा या पहाटेच्या भक्ती गीतांनी – Morning Devotional Songs In Marathi

ADVERTISEMENT

अनंत चतुर्दशी कोट्स (Anant Chaturdashi Quotes In Marathi)

Anant Chaturdashi Quotes In Marathi
Anant Chaturdashi Quotes In Marathi

गणेशोत्सवाचा दहा दिवस आनंद साजरा केल्यानंतर अनंत चतुर्दशी साजरी करण्यासाठी हे खास कोट्स (Anant Chaturdashi Quotes In Marathi) फक्त तुमच्यासाठी.

 • घातली रांगोळी दारी, नैवेद्य मोदकाचा केला, अनंत चतुर्दशीला गणराज माझा पुन्हा घरी निघाला… गणपती बाप्पा मोरया
 • गणराया तुजविन विनवू कोणाला, तुच कृपाळा दैवत माझे.. पुन्हा ये भक्ता या ताराया… गणपती बाप्पा मोरया
 • आद्य ज्याची पूजा, तोचि गणपती गणराजा, टेकवितो माथा तुज चरणी बाप्पा मोरया…
 • जडलाय तुझ्या रूपाचा ध्यास, पूर्ण कर भक्ताची आस, आर्शीवादासह घेतोय निरोप, पुढच्या वर्षी  करीन आणखी सुंदर करायची आहे आरास.. गणपती बाप्पा मोरया
 • जमले सारे भक्तकरी, कुणी घेतले ताल करी, कुणी घेतले ढोल करी, ढोल तालासंगे ताल धरी, बाप्पा माझा परत चालला घरी… गणपती बाप्पा मोरया
 • कर सर्वांच्या दु:खाचा नाश, चिंतामणी कर सर्वांच्या जीवनात आनंदाची बरसात… हॅप्पी अनंत चतुर्दशी
 • आमच्या मनी फक्त तुझीच भक्ती, निरोप देतो आता पुढच्या वर्षी लवकर या मंगलमूर्ती!!!
 • गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या…
 • मोदकाने प्रसाद केला, लाल फुलाने हार सजवला, मखरात बसून तयार झाले, बाप्पा आमचे गावाला निघाले… गणपती बाप्पा मोरया
 • सर्वांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा… तुमच्या मनातील सर्व मनोकामना बाप्पा पूर्ण करो… गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!!!

लाडक्या बाप्पासाठी लावायलाच हवी ही evergreen गाणी (Best Ganpati Songs In Marathi)

बाप्पा विसर्जन शायरी (Ganpati Visarjan Shayari Marathi)

Ganpati Visarjan Shayari Marathi

बाप्पाच्या भक्तीत 10 दिवस व्यतीत केल्यावर त्याचा निरोप घेणं आपल्याला जड जातं. मग अशावेळी शेअर करण्यासाठी खास बाप्पा विसर्जन शायरी (Ganpati Visarjan Shayari Marathi). 

 • जे मनापासून मागाल ते मिळेल
  हा बाप्पाचा दरबार आहे 
  देवांचा देव वक्रतुंड महाकाय हा 
  ज्याचं आपल्या भक्तांवर प्रेम आहे 
  गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
 • बाप्पाचं रूपच निराळं 
  त्याचा चेहरा किती भोळा
  जेव्हा येतं काही संकट 
  तेव्हा त्यानेच सांभाळलं आपल्याला 
  गणपती बाप्पा मोरया 
 • येतोस तू वाजत गाजत बाप्पा
  जातोस ही मोठ्या धूमधडाक्यात 
  सर्वांचा बाप्पा लाडका 
  आमच्या मनामनात वसलेला 
  हॅपी गणेश विसर्जन 
 • चला आनंदाने नाचू गाऊ
  बाप्पाचं नाव घेऊन चांगल काम करू 
  आनंदाचे करून वाटप 
  आजचा दिवस बाप्पाच्या नावे करू
  गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा 
 • बाप्पा गणपतीची कृपा आपल्यावर कायम राहो
  प्रत्येक कार्यात आपल्याला बाप्पामुळे यश मिळो
  आयुष्यात न येवो कोणतेही दुःख 
  पुढच्या वर्षी बाप्पा लवकर या हेच आहे ब्रीद वाक्य 
 • एक दोन तीन चार
  गणपतीचा जयजयकार 
  पाच सहा सात आठ
  गणपती बाप्पा आहे आपल्यासोबत 
  हॅपी गणेश विसर्जन

गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला 
बाप्पा बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.

ADVERTISEMENT

या गजरासोबतच बाप्पाला निरोप देण्यासाठी वरील हे खास गणपती बाप्पा विसर्जन स्टेटस (Ganpati Visarjan Sad Status In Marathi), विसर्जन कोट्स (Ganpati Bappa Visarjan Quotes In Marathi), अनंत चतुर्दशी कोटस (Anant Chaturdashi Quotes In Marathi) आणि प्रियजनांना पाठवा  गणपती विसर्जन मेसेज (Ganpati Visarjan Message In Marathi), बाप्पा विसर्जन शायरी (Ganpati Visarjan Shayari Marathi) नक्की शेअर करा आणि बाप्पा पुढच्या वर्षी येणारच आहेत.

05 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT