लॉकडाऊनमध्ये अनेकांनी मिस केले असतील ते बेस्ट चित्रपट आणि आवडते कलाकार. पण नव्या वर्षात नव्या नियमांसह शूटिंगला सुरुवात झाली असून अनेक नवे चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाले आहेत. गेल्या वर्षभरात जर तुम्ही आलिया भटला स्क्रिनवर मिस केले असेल तर आता तिचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात आलिया प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्याचा दमदार टीझर आलियाने शेअर केले आहे. आलियाचे अभिनय कौशल्य पाहता याही चित्रपटात तिने दमदार अशी कामगिरी केली आहे असे दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आलियाची जादू चालणार हे नक्की!
अदिती मलिकचं झालं डोहाळजेवण, मोहित मलिकने आनंद केला व्यक्त
दिसून येत आहे मेहनत
गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाची चर्चा ही गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. हा चित्रपट बिग बजेट असून या चित्रपटाची खूप चर्चा आधीपासूनच रंगली होती. या चित्रपटात आलिया ही प्रमुख भूमिकेत असणार हे देखील आधीच माहीत झाले होते. पण आता या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर आलियाने या भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतलेली दिसत आहे. एका नाजूक सुंदर हिरोईनमधून बाहेर पडत तिने या रोलसाठी भारदस्त आवाज आणि चाल यामध्ये चांगलाच दबदबा तयार केला आहे. कामाठिपुरात दबदबा असलेल्या या गंगुबाई काठियावाडीचा अभिनय करण्यात आलिया भट यशस्वी झाली असे म्हणायला काहीच हरकत नाही.
अंगावर येतो टीझर
गेल्या काही वर्षांपासून रिअललाईफ हिरोवर अनेक चित्रपट बनवले जात आहे. विशेष म्हणजे त्याला प्रेक्षकांची पसंतीही चांगलीच मिळत आहे. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या बाबतीतही असेच होईल असा अंदाज हा टीझर आल्यापासून होत आहे. आलियाची गंगूबाई म्हणून झालेली दमदार एन्ट्री अनेकांना आवडलेली दिसत आहे. तिच्या तोंडी असलेले संवाद, तिची साडी नेसण्याची पद्धत आणि तिने गंगूबाई या कॅरेक्टरची करुन दिलेली ओळख कोणालाही आवडेल अशीच आहे. त्यामुळे हा टीझर सुरु झाल्यानंतर तो सुरुच राहावा असे वाटते. दीड मिनिटाच्या या टेलरमध्ये आलिया आणि फक्त आलियाच दिसत आहे. तिची मेहनत यामध्ये स्पष्ट दिसत आहे.
आर्चीच्या परशाचा मेकओव्हर पाहून व्हाल थक्क, दिसतोय खूपच हँडसम
जुलैला रिलीज होणार चित्रपट
गंगूबाईचा टीझर आला असला तरी चित्रपट रिलीज होण्याला अजून अवकाश आहे. हा चित्रपट 30 जुलै रोजी रिलीज होणार आहे. सध्या देशातील कोरोना परिस्थिती पाहता हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित केला जाईल. पण तो पर्यंत देशात कोरोनाची स्थिती काय असेल आणि कशा पद्धतीने, कोणत्या नियमावलीसह हा चित्रपट प्रदर्शित होईल याची अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
अग्गंबाई सासूबाई’ चा नवा सीझन, तेजश्री प्रधानच्या जागी येतेय नवी सूनबाई
कोण आहे गंगूबाई काठियावाडी?
हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारीत हा चित्रपट असून गंगूबाई काठियावाडी हे नाव कामाठिपुरामध्ये फारच प्रसिद्ध होतं. कामाठिपूरातील वैश्यांनाही त्यांचा हक्क आहे. मनाविरोधात त्या कोणतंही काम करणार नाहीत, या कडे त्या सतत लक्ष देऊन असायच्या. कामाठिपूरातील महिलांच्या हितासाठी त्याने बरेच काही केले आहे. ज्याची माहिती असणे प्रत्येकासाठी गरजेचे आहे.
आता या चित्रपटाचा टीझर आल्यानंतर ट्रेलरही इतकाच दमदार असेल अशी अपेक्षा आहे.