जेवणाची चव वाढवायची असेल तर पानात जरासं लोणचं वाढलं तरी देखील बोअरींग जेवणाला चांगलीच चव येते. लोणच्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात. आंब्याचे, कैरीचे, हळदीचे, लिंबूचे, गोड लोणचे, तिखट लोणचे असे वेगवेगळे प्रकार खूप जणांकडे केले जातात. तुम्ही कधी लसणीचे लोणचे खाल्ले आहे का? आरोग्यासाठी लसणीचे लोणचे फारच फायद्याचे असते. जर तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला तर तुम्हाला त्याचे आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. लसूण खाण्याचे फायदे आहेतच पण लसणीच्या लोणच्याचे फायदे जाणून घेऊया म्हणजे तुम्हाला लसणीचे लोणचं आहारात समाविष्ट करता येईल.
घरी तयार केलेलं लोणचं ‘या’साठी असायला हवं तुमच्या आहारात
लसणीच्या लोणच्याचे फायदे
लसणीचे लोणचं खाण्याचा विचार करत असाल तर या चविष्ट लोणच्याचे फायदे काय आहेत ते देखील जाणून घेऊया.
- लसूणमध्ये बिटा केरेटीन नावाचा एक घटक असतो. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.
- पचनक्रिया सुधारण्यासाठी लसूण हे चांगले असते. लसूण खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते.
- थंडीच्या दिवसात ब्लड सर्क्युलेशन चांगले राहण्यासाठी लसूणचे लोणचे फारच फायद्याचे असते.
- ह्रदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठीही लसणीचे लोणचे फायद्याचे ठरते.
- जर तुम्ही फॅटी लिव्हरच्या आजाराने त्रस्त असाल तर तुम्हाला लसणाचे लोणचे फारच फायद्याचे आहे. लसूणचे लोणचे खाल्ल्यामुळे तुम्हाला फारच फायदा मिळतो.
- डाएबिटीझच्या रुग्णांसाठीही हे लोणचं फारच फायद्याचे ठरते.
असे तयार करा लसणीचे लोणचे

लसणीचे लोणचं वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. तुम्ही घरीच लसूण सोलून याचे लोणचे तुमच्या आवडीच्या चवीप्रमाणे करु शकता. लसणीचे लोणचं करण्यासाठीची साहित्य- कृती
साहित्य: अर्धा किलो लसूण, मोहरी डाळ, लाल तिखट, गूळ, मीठ, बडीशेप, काळीमिरी, लवंग आणि तेल , हळद
कृती :
- लसूण चांगले स्वच्छ करुन त्याच्या साली काढून घ्या. लसूण शक्यतो अख्खी असू द्या. जर तुम्ही चिरणार असाल तर ती बारीक चिरली तरी चालू शकेल.
- मसाल्यासाठी मोहरी डाळ, बडीशेप, काळीमिरी, लवंग भाजून घ्या. त्याची जाडसर पूड करुन त्यामध्ये हळद, लाल तिखट घालून एकजीव करा.
- लसूण हळद आणि मीठात बुडवून ठेवा.त्यातले पाणी निथळून ठेवा.
- तेल गरम करुन ते थंड करा. बारीक केलेल्या लसूणमध्ये लोणच्याचा तयार मसाला घाला आणि त्यामध्ये थंड केलेले तेल घाला आणि लोणचं तसंच ठेवून द्या.
- लोणचं चांगलं मुरलं की, ते लोणचं तुम्हाला खाण्यास काहीच हरकत नाही.
आता असेच करा लसणीच्या लोणचे आणि त्याचा आहारात असा करा समावेश!