बिग बॉस फेम गौहर खान नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. मॉडेल आणि अभिनेत्री अशी ओळख मिळवलेली गौहर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे तिच्यावर नाहक काहीतरी धार्मिक कमेंट करणाऱ्याला तिने चांगलीच चपराक दिली आहे. इस्लाम धर्मामध्ये स्त्रीचे अस्तित्व हे पुरुषाच्या पायाखालीच असते अशी कमेंट करणाऱ्या एका युजर तिने चांगलेच सडेतोड उत्तर दिले आहे. गौहर खान हिने नेमकं असं काय पोस्ट केलं होतं की, अशाप्रकारची कमेंट देऊन तिला हे उत्तर देण्यासाठी भाग पाडण्यात आलं ते जाणून घेऊया.
व्हिडिओत होतो काय
गौहर खान हिचं नुकतच लग्न झालं आहे. तिने या आधीही तिचा नवरा झैद खानसोबतचे व्हिडिओ आणि फोटोज शेअर केले आहेत. तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ती झैदच्या पायाजवळ बसलेली दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून तिला एका युजरने कमेंट केली आहे की,इस्लाममध्ये स्त्रियांवर नेहमीच पुरुषांचे वर्चस्व असते आणि स्त्रियांचे अस्तित्व हे पुरुषांच्या पायाखाली असते. अशी कमेंट करणाऱ्याला गौहरने देखील चांगलेच उत्तर दिले. तिने या कमेंटवर म्हटले आहे की, नाही मूर्ख माणसा, याला प्रेम आणि मैत्री म्हणतात. इस्लाम धर्मामध्ये स्त्रियांचे वर्णन हे पुरुषांच्या वरही नाही आणि खालीही नाही. तर त्यांच्यासोबत आणि बरोबरीने आहे. त्यामुळे अशा कमेंट मुळीच करु नका.आधी इस्लाम धर्माची योग्य माहिती घ्या. या आधीही वयावरुन काहीतरी बोलणाऱ्यांना तिने चांगलेच फटकारले होते. झैद हा तिचा नवरा वयाने तिच्यापेक्षा लहान असल्यामुळेही लोकांनी तिला ट्रोल केले होते.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अडकली विवाहबंधनात, 15 मिनिटांत पार पडला सोहळा
गौहरचा शाही लग्नसोहळा
गौहर खानने नुकतेच लग्न केले आहे. 25 डिसेंबर रोजी तिचा विवाहसोहळा पार पडला. तिच्या लग्नातील तिचा लुक हा चांगला प्रसिद्ध झाला होता. तिने तिच्या लग्नासाठी गोल्डन रंगाचा लेहंगा घातला होता. अस्सल मुस्लिम पद्धतीने तिचा विवाहसोहळा पार पडला. तिने तिच्या लग्नाचे अनेक फोटो शेअर केले होते. तिच्या फोटोजना मीडियानेही चांगले उचलून धरले होते. त्यामुळे तिच्या लग्नातील फोटोला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.
अभिनेत्री पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्रींचा कोव्हिड-19 पीडित मुलांना दत्तक घेण्यास पुढाकार
झैदची पोस्ट पडली महागात
खरंतरं गौहर प्रेग्नंट आहे असे वाटायला गौहरचा नवरा झैदची पोस्टच जबाबदार आहे, जैदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत ‘शू….. कोई आ रहा है’, अशा आशयाचा एक व्हिडिओ शेअर केला. प्रेक्षकांनी ही एक ओळ ऐकतच शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. त्याच्या या व्हिडिओ खाली गौहर प्रेग्नंट आहे अशाच कमेंट पडू लागल्या. घरी येणारा नवा पाहुणा म्हणजे तान्हुले बाळच असणार असे म्हणत तो व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होऊ लागला. त्याच्या या व्हिडिओनंतरच एका मीडिया हाऊसने लग्नाच्या तीन महिन्यानंतर गौहर आई होणार असल्याची बातमी केली आणि एकच गोंधळ उडाला. दरम्यान, हा व्हिडिओ झैदने त्याच्या नव्या गाण्यासाठी केला आहे. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर कळते.
कोरिओग्राफर गीता कपूरने गुपचूप केलं का लग्न, काय आहे फोटोमागचं सत्य