Advertisement

मनोरंजन

ही अभिनेत्री प्रेग्नंसीमध्येही ठेवतेय स्वत:ला फिट

Leenal GawadeLeenal Gawade  |  Apr 6, 2021
ही अभिनेत्री प्रेग्नंसीमध्येही ठेवतेय स्वत:ला फिट

फिटनेस हा सगळ्याच अभिनेत्रींसाठी फार महत्वाचा आहे. वय, वर्ष काहीही असो आता सेलिब्रिटी त्यांचा फिटनेस राखण्यासाठी फारच आग्रही असतात.सध्या एका अभिनेत्रीचे फोटो चांगलेच व्हायरल होतायत. ही अभिनेत्री गरोदर असून स्वत:ची आणि बाळाची काळजी घेण्यासाठी ती योगसाधनेची मदत घेत आहे. ही अभिनेत्री अन्य कोणी नसून हरभजन सिंहची बायको आणि अभिनेत्री गीता बासरा आहे. ते दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असून गीता बासरा आरोग्याची काळजी घेताना दिसत आहे. तिने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत ज्यामध्ये ती योगा करताना दिसत आहे. जाणून घेऊया गीता बासराचे हे प्रेग्नंसीमधील फिटनेस रुटीन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ‘रॉकेट्री’चं कौतुक,आर माधवनसोबत पाहिली झलक

योगाची घेतेय मदत

योग साधना ही कोणत्याही वर्षी आणि कोणाहीसाठी फार महत्वाची आहे. जर तुम्ही योगा करत असाल तर त्याचे महत्व तुम्ही जाणताच. प्रसुती सुलभ होण्यासाठीही योगा हा फार महत्वाचा असतो. म्हणूनच अनेकदा सेलिब्रिटी मन:शांतीसाठी आणि बाळाच्या वाढीसाठी अगदी आवर्जून योगा करतात. गीता बासराही योगाची मदत घेताना दिसत आहे. तिने तिच्या वेगवेगळ्या पोझ देत आरोग्य निरोगी राखण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहे. तिच्या या योग प्रेमामुळे अनेकांनी तिला कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर काहींनी तिला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. प्रेग्नंसीदरम्यान अनुष्का शर्माने शीर्षासन केले होते. असे आसन केल्यामुळे ती ट्रोल झाली होती.  पण आता गीताच्या योगा पोझ तिच्या चाहत्यांना आवडलेल्या दिसत आहेत. त्यामुळेच तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होताना दिसत आहे. 

गीता बासराने अशी दिली गोड बातमी

कोव्हिडच्या काळात अनेक सेलिब्रिटींनी गोड बातमी दिली आहे. अनेकांना या काळात बाळही झाले आहे. गीता बासरानेही तिच्या आयुष्यात दुसऱ्यांदा आलेली ही आनंदाची बातमी अत्यंत साध्यापद्धतीने दिली आहे. तिने एक कुटुंबासोबतचा फोटो शेअर केला आहे.ज्यामध्ये तिच्या मुलीच्या हातामध्ये एक लहानसा टिशर्ट दिसत आहे. याचाच अर्थ त्यांच्या घरात एक नवा पाहुणा येणार आहे हे स्पष्ट होते. त्याची ही साधी पोस्ट सगळ्यांना इतकी आवडली की,त्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. 

लंडनमध्ये चमचमीत वडापाव आणि पावभाजीवर अमृता-पुष्करने मारला ताव

फिल्मी करिअर फारसे नाही चालले

गीता बासरा हे नाव जरी आता हरभजन सिंहमुळे सगळ्यांना माहीत असले री करिअरचा विचार करता हे नाव फारसे चाललेले नाही. गीताने फार मोठ्या चित्रपटांमधून कामं केलेली नाहीत.  2006 साली ‘दिल दिया है’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले. त्यानंतर ती दोन ते तीन चित्रपटांत दिसली पण या चित्रपटातून तिला फारशी ओळख मिळाली नाही. पण हरभजन सिंहसोबत लग्न केल्यानंतर ती अधिक प्रकाशझोतात आली. 2016 साली तिने हरभजन सिंहसोबत विवाह केला. त्यांना 5 वर्षांची मुलगी असून तिचे नाव इनाया असे आहे. 

आता त्यांच्या कुटुंबात आणखी एक नवा पाहुणा येणार असून गीताने फिटनेसला महत्व दिले आहे. ती येत्या काळात तिचे अनेक फोटो पोस्ट करेल अशी अपेक्षा आहे.

सोनाली कुलकर्णी नव्या भूमिकेत, ‘क्राइम पेट्रोल सतर्क: जस्टिस रिलोडेड’चे करणार निवेदन