home / मनोरंजन
genelia-deshmukh

जेनिलिया देशमुखचा मराठमोळा लुक करतोय चाहत्यांना घायाळ

जेनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) ही केवळ रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) बायकोच नाही तर तिची एक वेगळी ओळखही आहे. जेनिलिया मोठ्या पडद्यापासून दूर असली तरीही ती सोशल मीडियावर मात्र कायम अॅक्टिव्ह असते. कधी रितेश बरोबर व्हिडिओ तर कधी रिल्स आणि कधी आपले सुंदर फोटो पोस्ट करत जेनिलिया सर्वांचेच लक्ष वेधून घेते. इतकी वर्ष झाल्यानंतर आणि दोन मुलं झाल्यानंतही जेनेलियाचा फॅन फोलॉईंग मात्र घटला नाहीये. दाक्षिणात्या चित्रपटांमध्येही आजही तिची तितकीची क्रेझ आहे आणि महाराष्ट्रात तर ‘वहिनी’ म्हणून एक वेगळाच मान जेनिलियाला मिळाला आहे. जेनिलियाने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे सध्या तुफान व्हायरल होत आहेत. आपल्या ‘मराठमोळ्या लुक’ने जेनिलियाने सर्वांनाच घायाळ केले आहे. 

अधिक वाचा – मराठी अभिनेत्रींचा खास गणपती फेस्टिव्ह लुक, तुम्हीही करा अशी स्टाईल

हिरवा चुडा, केसात गजरा आणि लाल साडी

सध्या गणपतीचा उत्सव सगळीकडेच साजरा केला जात आहे. अगदी सामान्य महिलांपासून ते बऱ्याच अभिनेत्री साडीमध्ये दिसून येत आहेत. अशाच या उत्सवाच्या वातावरणात जेनिलियाने अगदी मराठमोळ्या लुकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आकर्षक अशा लाल रंगाची साडी, त्यावर केसात माळलेला गजरा, कानात मराठमोळ्या पद्धतीचे झुमके आणि हातात हिरवा चुडा आणि त्याला साजेसा मेकअप असा लुक जेनेलियाने केला आहे. इतकंच नाही तर त्याचे खास फोटोसेशनही तिने केले आहे. रितेशशी लग्न झाल्यानंतर जेनिलियाने अनेक मराठमोळ्या पद्धती समजून त्याचा स्वीकार केला आहे. तर रितेशनेदेखील जेनिलियाच्या सर्व पद्धतींचा स्वीकार केला आहे. त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांना अगदी आरतीपासून मराठी बोलण्यापर्यंत जेनेलिया सर्व शिकविते आणि तितकेच हिंदी, इंग्रजी या दोन्ही भाषांचेही ज्ञान देण्यात येत आहे. त्यामुळे रितेश जेनिलियाच्या मुलांचाही वेगळा फॅन फॉलोईंग आहे. त्यांना देण्यात येत असलेले संस्कार हे सर्वांनाच भावतात. इतकंच नाही तर त्यामुळेच रितेश – जेनिलियाची जोडी ही जगभरात सर्वांची आवडती जोडी आहे. 

अधिक वाचा – अभिनेता सिद्धार्थ खिरिद आणि अभिनेत्री पायल कबरे झळकले ‘तू गणराया’ या गाण्यात

अतिशय सुंदर दिसत आहे जेनिलिया

जेनिलियाने केलेल्या या लुकला अनेक लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. या साडी आणि मराठमोळ्या लुकमध्ये जेनिलिया खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. त्या सौंदर्यामध्ये भर घातली आहे ती तिच्या चेहऱ्यावरील हास्याने. अगदी दिलखुलास हास्य देत जेनिलियाचे हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्यामुळे या गणेशोत्सवातही तिचा अशा प्रसन्न चेहरा पाहून चाहत्यांनाही आनंद मिळत आहे. याशिवाय फोटोजना देण्यात आलेले कॅप्शनही लक्ष वेधून घेत आहे. एका कॅप्शनमध्ये तिने म्हटलंय की, ‘लोकांकडे पाहताना हृदयापासून पाहा’ तर दुसऱ्या फोटोत तिने साडीविषयी म्हटले आहे, ‘साडी तुम्हाला फिट कसं बसवायचं पाहत नाही तर इतरांपेक्षा वेगळं कसं दिसायचं हे दाखवते’ हे सर्व फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरूरकर (Tejas Nerurkar) याने काढले आहेत. जेनेलियाच्या चेहऱ्यावर आलेल्या किरणांनी या फोटोंची शोभा अधिक वाढवली असल्याचेही दिसून आले आहे. आता चाहत्यांना तिच्या पुढच्या फोटोसेशनबाबत नक्कीच उत्सुकता लागून राहिली आहे. इतकंच नाही तर आता जेनिलिया मोठ्या पडद्यावर कधी दिसणार असेही तिला बरेचदा विचारण्यात येत आहे. मात्र त्यासाठी कदाचित प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार हे नक्की!

अधिक वाचा – कविता कौशिकला नाही व्हायचं आई, कारण ऐकून व्हाल थक्क

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

15 Sep 2021

Read More

read more articles like this
good points logo

good points text