ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
get-rid-of-vomit-while-traveling

रोजच्या प्रवासात उलटी होत असेल तर वापरा सोप्या टिप्स

प्रवास करण्यासाठी तुम्हाला मनात जर भीती वाटत असेल की, तुम्हाला काही अंतर गेल्यावर उलटी होईल आणि प्रवासात त्रास होईल. अशी समस्या खरं तर अनेक जणांना असते. अगदी लहान मुलांनाच नाही तर मोठ्या माणसांनाही हा त्रास असतो. हा त्रास कमी करण्यासाठी अथवा प्रवासात उलटी होऊ नये असं वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे. म्हणजे नक्की काय करायचं हे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. काही जणांना तर लांबच्या प्रवासातच नाही तर अगदी रोजच्या प्रवासामध्येही हा त्रास होतो. त्यामुळे तुम्ही जर नेहमी प्रवासात घाबरत असाल तर असं अजिबात करू नका. तुम्ही रोज प्रवास करताना काय उपाय करायला हवेत हे घ्या जाणून. 

प्रवासाला निघताना खाऊ नका 

सर्वात पहिल्यांदा अनेक जण ही चूक करतात की, प्रवासाला निघताना पोटभर खातात. असे अजिबात करू नका. विशेषतः तेलकट, मसालेदार आणि अधिक वास असणारे असे अन्न तुम्ही भरपेट खाल्ल्यास पोटात ढवळते. त्यामुळे तुम्ही अजिबात प्रवासाला निघण्याआधी असे अन्न खाऊ नका. विशेषतः तुम्ही तेलकट अन्नाकडे दुर्लक्ष करा आणि मगच प्रवासाला निघा.

प्रवासात बाहेरच्या बाजूला बघत राहा

डोक्यात सतत एकच गोष्ट ठेवली तर त्रास होतो. विशेषतः आपल्याला उलटी होईल ही भीती सतत मनात राहिली तर तुम्हाला नक्कीच प्रवासात उलटी होते. त्यामुळे तुम्ही प्रवास करताना नेहमी खिडकीबाहेर कोणत्या वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत अथवा माणसांचं निरीक्षण याकडे अधिक लक्ष द्या. त्यामुळे तुमचं लक्ष उलटी होण्याकडून वेगळीकडे जाईल. लक्ष विचलित झाल्यामुळे तुम्हाला उलटी होणार नाही. तसंच सतत प्रवास करण्याआधी तुम्हाला गोळीही घ्यावी लागणार नाही. याशिवाय बाहेरची ताजी हवा मिळाल्याने तुम्हाला उलटीचा त्रास होत नाही. 

लिंबू

lemon
प्रवासात निघताना तुम्ही तुमच्यासह एक पिकलेले लिंबू पिशवीमध्ये घेऊन ठेवा. तुम्हाला जरा जरी उलटीसारखे वाटले तर तुम्ही लिंबू कापून त्याचा सुगंध घ्या. यामुळे तुम्हाला उलटीचा त्रास होणार नाही आणि तुम्हाला जर मळमळत असेल तर तुमची मळमळदेखील थांबविण्यासाठी याची मदत होईल. त्यामुळे तुम्हाला जर नेहमी त्रास होत असेल तर लिंबू हा यावरील एक चांगला आणि सोपा उपाय आहे. 

पुदीना

प्रवासादरम्यान तुम्हाला उलटीसारखे होत असेल तर तुम्ही पुदीना कँडी खाऊ शकता अथवा तुम्ही तुमच्या थर्मासमध्ये पुदीना चहा बनवून तुम्ही तो पिऊ शकता. पुदीना हा उलटीवरील उत्तम उपाय आहे. पुदीना पोटात गेल्यामुळे उलटी होत नाही. त्यामुळे तुम्हाला लांबच्या प्रवासासाठी जायचं असेल तर तुम्ही किमान पुदीना कँडी तुमच्याजवळ ठेवा. यामुळे त्रास होणार नाही. 

ADVERTISEMENT

आले

ginger

तुम्हाला कदाचित हे वाचून आश्चर्य वाटेल. पण तुम्हाला प्रवासात आलं चघळता आले तर नक्की तोंडात आल्याचा एक तुकडा ठेवा. यामुळे तुम्हाला अजिबात उलटीचा त्रास होणार नाही. आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे तुम्हाला अधिक फ्रेश ठेवायला मदत करतात. तसंच आले चघळण्यामुळे तुम्हाला मळमळ होण्याचा त्रास होत नाही. 

लवंग 

Lavang Oil Benefits In Marathi

लवंग तुम्ही भाजून त्याची पावडर करून घ्या. कोणत्याही हवाबंद डबीमध्ये तुम्ही ही पावडर भरा आणि प्रवासात निघताना ही पावडर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा. तुम्हाला जेव्हा उलटी होणार आहे असं वाटू लागेल तेव्हा साखर आणि चिमूटभर लवंग पावडर मिक्स करून तुम्ही तोंडात ठेवा. यामुळे तुम्हाला उलटी होणार नाही. तसंच तुमच्या जिभेलादेखील चांगली चव राहील. केवळ लवंगच नाही तर तुम्ही जिरे पावडरचादेखील उपयोग करून घेऊ शकता. 

तुळशीची पाने

तुम्हाला रोजच्या प्रवासातही अधिक काळ जर गाडीमध्ये बसता येत नसेल तर तुम्ही अशावेळी तुमच्यासह तुळशीची पाने बॅगमध्ये ठेवा. तुम्ही प्रवास करताना तुळशीचे पान चावत राहिल्यास, तुम्हाला अजिबात उलटीचा त्रास होत नाही. तसंच तुमच्या तोंडाला दुर्गंधही येण्यापासून तुम्ही दूर राहाता. तुळशीची पाने आपल्यासह घेऊन जाणे सोपे आहे. 

काळी मिरी

प्रवासादरम्यान तुम्ही काळी मिरी पावडर आणि लिंबू तुमच्यासह ठेवा. तुम्हाला उलटीसारखं वाटत असेल तर तुम्ही काळी मिरी पावडर लिंबावर पसरवा आणि चाखा. तुम्हाला यामुळे बरं वाटेल. तसंच मळमळ होत असेल तर थांबण्यास मदत मिळेल. 

ADVERTISEMENT

डोळे बंद करून झोपा 

प्रवास करताना सहसा डोकं दुखतं आणि डोळेही दुखतात. त्यामुळे तुम्ही डोळे बंद करून झोपल्यास, तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही प्रवासात डोळे बंद करून झोपा यामुळे तुम्हाला उलटीचा त्रास होणार नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

03 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT