हल्ली जाड आयब्रोजचा ट्रेंड आहे. तुमचे आयब्रोज जितके जाड असतील तितके ते तुम्हाला चांगले दिसतात. पण आता सगळ्यांच्याच आयब्रोजचा आकार काही जाड नसतो. पण अशावेळी जर तुम्हाला जाड आयब्रोज करुन तुमचा लुक बदलायचा असेल तर तुम्ही अगदी झटपट आयब्रोज जाड करु शकता. आज आपण घरच्या घरी अगदी 5 मिनिटात आयब्रोज जाड कशा करायच्या ते पाहुया.
shutterstock
अशी करा सुरुवात
आता आपण इतक्या झटपट आयब्रोज जाड करणार आहोत म्हटल्यावर आपल्याला काही मेकअप प्रोडक्टची गरज आहे. हल्ली आयब्रोज फिल करण्यासाठी अनेक चांगले प्रोडक्ट बाजारात मिळतात.ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याला अगदी नॅचरल लुक देणारे आयब्रोज वाटतात. या शिवाय आयब्रोज फिल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयब्रोजच्या केसांच्या शेडप्रमाणे रंगही मिळतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आयब्रोजना काही जबरदस्ती काही लावले असे वाटत नाही. आयब्रोज फिल करण्यासाठी मिळणारे आयब्रोज फिलर हे ड्राय किंवा लिक्वी बेस असतात तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही त्यांचा वापर करु शकता.
या नॅचरल ड्रिंक्सने येईल तुमच्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो
Popxo ची पसंती या प्रोडक्टला
असे करता येतील तुमचे आयब्रोज जाड
- सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ करुन घ्यायचा आहे.
- जर तुम्ही चेहऱ्याला कोणता मेकअप बेस लावत असाल तर तो लावून घ्या.
- हातात एक लहानसा आरसा घ्या. जेणेकरुन तुम्हाला आयब्रोजचा आकार देताना नीट दिसेल.
- आयब्रोज नीट आयब्रोज ब्रश ने विंचरुन घ्या.
- तुमच्या आयब्रोजचा बाक तुम्हाला कसा हवा तो पाहा. उदा. जर तुमचे आयब्रोज धनुष्याकृती असतील तर तुम्हाला तुमच्या आयब्रोज जाड करताना तोच आकार ठेवत थोडी मार्जिन वाढवायची आहे.
- तुमच्या हेअर शेडप्रमाणे तुम्हाला पेन्सिल निवडायची आहे. त्या पेन्सिलने तुम्हाला आयब्रोजला मार्किंग करायचे आहे.
- जर तुम्हाला आयब्रोजचा आकार वाढवण्याची गरज वाटत नसेल तर तुम्ही थेट फिलर्सचा वापर करु शकता.
- पावडर फॉर्ममध्ये मिळणारे फिलर्स भरायला सोपे जातात. त्यामध्ये मिळणारा ब्रश तुम्हाला तुमच्या आयब्रोज वरुन फिरवायचा आहे.
- पॅलेटवरुन अगदी थोडेच फिलर्स घ्या. एकावेळी जास्त फिलर्स घेतल्यामुळे तुम्हाला ते लावण्यास अडथळे येऊ शकतात.
- या फिलर्समुळे तुम्हाला तुमचे आयब्रोज अगदी झटपट जाड झालेले दिसतील.
- ड्राय फिलर्सशिवाय आयब्रोज अधिक उठावदार करण्यासाठी आयब्रोजचा मस्कारासुद्धा मिळतो तुम्ही त्याचा वापर देखील करु शकता.
जाणून घ्या काय आहे फलाहाराचे महत्त्व
हे ही असू द्या लक्षात
shutterstock
*प्रत्येकाच्या आयब्रोजचा रंग वेगळा असतो. त्यानुसार तुम्हाला तुमचा रंग निवडायचा आहे.
*काळा रंग हा प्रत्येकालाच चांगला दिसतो असे नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या शेडप्रमाणेच याची निवड करा.
*आयब्रोज जाड करताना ते किती जाड करायचे ते देखील तुम्हाला माहीत हवे.
*खूप जाड आयब्रोजही अनेकदा चांगले दिसत नाही हे देखील लक्षात असू द्या.
*तुमचा चेहरा लहान असेल तर फार मोठे आयब्रोज करु नका.
*काहींचे आयब्रोज हे पुढच्या बाजूने फार लहान असतात. तुम्ही त्यांना जरा जरी मोठे केले तरी तुमच्या आयब्रोजचा आकार छान दिसेल.
*जर आयब्रोज पेन्सिलचा वापर करणार असाल तर तुम्हाला स्ट्रोक किती जाड मारायचे हे तुम्हाला कळायला हवे.