दूध पिणं हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतं. आयुर्वेदात तर दुधाला पोषक आणि परिपूर्ण आहार मानलं जातं. तान्ह्या बाळाला देखील आईच्या स्तनपानासोबत जन्मानंतर सहा महिन्यानंतर सर्वात आधी गाईचं दूध पाजलं जातं. गाईच्या दुधात सर्वात जास्त कॅल्शिअम आणि पोषक तत्त्व असतात. पण आजकाल बाजारात मिळणारं दूध हे प्रक्रिया केलेलं आणि भेसळयुक्त असण्यासाठी शक्यता असते. शिवाय बाजारात मिळणारे पॅक्ड दूध हे जर्सी अथवा इतर परदेशी प्रजातींच्या गाईंचे असते. या गाई जास्त प्रमाणात दूध देतात त्यामुळे दूध विक्री करणाऱ्या कंपन्या या गाईंचे दूध विकतात. मात्र या दुधातून शरीराचे हवे तसे पोषण होतेच असे नाही. यासाठी तज्ञ्ज गीर म्हणजेच देशी गाईचे दूध प्यावे असा सल्ला देतात. आजकाल गीर गाईचे दूध अथवा देशी गाईचे दूध A2 कॅटेगरी तर इतर गाईंचे दूध हे A1 कॅटेगरीत विकत मिळते.
Table of Contents
गीर गाय ही भारतातील सर्वात जुनी गाईची प्रजात आहे. गीर गाईचे दूध हे अमृतासमान आहे कारण आजवर करण्यात आलेल्या अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की, गीर गाईच्या दुधामुळे अनेक आरोग्य समस्या दूर होऊ शकतात. कारण या दुधात विविध प्रकारचे प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, एमिनो अॅसिड, उत्तम फॅट्स, खनिजे, नायट्रोजन, फॉस्फरस, कॉपर, लोह, आयोडिन, फ्लोरिन, झिंक, सिलिकॉन, सेलेनिअम, मॅग्नेशिअम हे घटक असतात. ज्याचा शरीर आणि आरोग्यावर चांगला परिणाम होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गीर गायीच्या दुधातून मिळते व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन D (Vitamin D Benefits In Marathi) जे हाडांच्या मजबूतीसाठी खूप गरजेचे असते. यासाठीच जाणून घ्या गीर गाय दुधाचे फायदे (gir cow milk benefits in marathi)
गीर गाय दुधाचे फायदे (Gir Cow Milk Benefits In Marathi)
गीर गाय ही भारतातील गायीची एक जुनी प्रजाती असून या गायीचे दूध आरोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरते. या गायीच्या दुधामुळे अनेक आजार बरे होतात. यासाठी जाणून घ्या गीर गाय दुधाचे फायदे
रोग प्रतिकार शक्ती वाढते (Boost Immune System)
गीर गाईच्या दुधामध्ये चांगले प्रोबायोटिक्स असतात. ज्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते. अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की जे लोक गीर गाईचं कच्चं दूध अथवा धारोष्ण म्हणजे गाईच्या स्ननातून दूध काढल्यानंतर लगेत ते पितात. त्यांची रोग प्रतिकार शक्ती आयुष्यभर चांगली राहते. अशा लोकांना कधीच कोणत्याही आजाराचे इनफेक्शन सहज होत नाही. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लहान मुलांनादेखील गीर गाईचे दूध देणे फायदेशीर ठरेल. तसंच वाचा गायीचे तूप खाण्याचे फायदे (Tup Khanyache Fayde).
हाडे मजबूत होतात (Bones Become Stronger)
गाईचे दूध हे हाडांसाठी नेहमीच चांगले असते. कारण गीर गाईच्या दुधात सर्वात जास्त कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम असतात. ज्याचा हाडांची मजबूती आणि विकास होण्यासाठी फायदा होतो. जर लहान मुलांना गीर गाईचे दूध दिले तर त्यांच्या हाडांची वाढ चांगल्या प्रकारे होते. शिवाय वृद्ध आणि आजारी लोकांनी गाईचे दूध नियमित घेतल्यास त्यांच्या हाडांची झालेली झीज लवकर भरून निघते आणि हाडांचे विकार लवकर होत नाहीत. यासाठी लहान असो वा मोठी घरातील प्रत्येकाने गीर गाईचे दूध प्यायला हवे.
कर्करोगापासून संरक्षण होते (Prevent From Cancer)
कर्करोग हा एक अतिशय गंभीर विकार असून आजकाल बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना याचा धोका असू शकतो. मात्र काही संशोधनात असं आढळून आलं आहे की, गीर या देशी गाईच्या दुधामुळे कर्करोगापासून संरक्षण मिळू शकते. कारण दुधामध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे कर्करोग होण्यापासून संरक्षण मिळू शकते. गीर गाईच्या दुधामुळे पोटाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग, हाडांचा कर्करोग होण्याचा धोका टाळता येतो. मात्र याबाबत तज्ञ्जांचा सल्ला अवश्य घ्यावा.
पचनशक्ती सुधारते (Digestive Improvement)
गीर गाईचे दूध हे पचायला हलके असते. यासाठीच लहान बाळाला सहा महिन्यानंतर गाईचे दूध दिले जाते. कारण आईच्या दुधानंतर हा असा एक पदार्थ असतो जो बाळाच्या नाजूक पोटाला सहज सहन होतो. गाईच्या दुधात व्हिटॅमिन बी 12 असते. व्हिटॅमिनमुळे दूध पचण्यास हलके जाते. शिवाय यामुळे तुमच्या शरीरातील व्हिटॅमिनची गरज भागवली जाते. यासाठीच गीर गाईचे दूध पिण्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते.
केसांसाठी उत्तम (Good For Hair Growth)
गीर गाईच्या दुधामुळे तुमच्या केसांचे चांगले पोषण होते. कारण ज्या लोकांना केस मोठ्या प्रमाणावर गळण्याचा त्रास होत असतो त्यांच्या शरीराला व्हिटॅमिन डीची गरज असते. गीर गाईच्या दुधातून व्हिटॅमिन डी आणि झिंक या केसांचे पोषण चांगले करणाऱ्या दोन्ही घटकांची गरज भागवली जाते. ज्याचा परिणाम केस गळणे थांबते आणि केसांचे उत्तम पोषण झाल्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात.
डोळ्यांचे आरोग्य (Good For Eye Health)
गीर गाईचे दूध पिणे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठीदेखील लाभदायक ठरू शकते. कारण गीर गाईच्या दुधात व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी गरजेचे असते. गीर गाईचे दूध पिण्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे व्हिटॅमिन ए मिळते. ज्यामुळे रातआंधळेपणा, मोतीबिंदू, कमी दिसणे, धुसर दिसणे, डोळे लालसर होणे अशा डोळ्यांच्या अनेक समस्या दूर राहतात.
ह्रदय समस्यांपासून संरक्षण होते (Prevent From Heart-Related Diseases)
गीर गाईचे दूध पिणे ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगले ठरते. कारण या दुधातून तुमच्या शरीराला चांगल्या फॅट्सचा पूरवठा होतो. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यास ह्रदय समस्या निर्माण होतात. मात्र गीर गाईच्या दुधामुळे तुमच्या शरीराला चांगले फॅट्स मिळतात. जे शरीराच्या पोषणासाठी गरजेचे असतात. सहाजिकच यामुळे ह्रदय विकार होण्याचा धोका टाळता येतो.
शरीराचा दाह कमी होतो (Reducing Inflammation)
अनेक आरोग्य समस्या अथवा संक्रमणामध्ये शरीरावर दुष्परिणाम होताना दिसतात. जसे की काही आरोग्य समस्यांमुळे शरीराचा दाह आणि जळजळ होते. अशा वेळी गीर गाईचे दूध पिणे फायदेशीर ठरू शकते. कारण या दुधामध्ये अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. गीर गाईचे दबध अथवा तूप आहारातून घेतल्यास शरीराला थंडावा मिळतो आणि जळजळ, दाह कमी होण्यास मदत मिळते. यासाठी आजारपणातून बरे होण्यासाठी हळदीचे दूध, केशराचे दूध देण्याची पद्धत आहे. यासोबतच जाणून घ्या बहुगुणी आहे नारळाचे दूध,असा करा वापर.
गीर गाय दुधाचे फायदे बाबत काही प्रश्न – FAQ’s
1. गीर गाईचे दूध महाग का असते ?
गीर गाईच्या दुधाची किंमत अनेक ठिकाणी वेगवेगळी असू शकते. शहरील भागात या दुधाची किंमत इतर दुधापेक्षा महाग असण्याचं कारण म्हणजे हे दूध इतर दुधापेक्षा जास्त पोषक आहे आणि कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे कमी पुरवठ्याअभावी त्याची किंमत जास्त असू शकते.
2. गीर गाईचे दूध लहान मुलांसाठी योग्य आहे का ?
गीर गाय ही देशी गाय आहे. त्यामुळे गाईचे दूध लहान मुलांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. कारण या गाईचे दूध पचायला हलके असते आणि या दुधामुळे लहान मुलांची प्रतिकार शक्ती मजबूत होते.
3. गीर गाईच्या दुधाचे काही दुष्परिणाम आहेत का ?
गीर गाईचे दूध हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत पोषक आणि शरीरासाठी उत्तम असते. मात्र कोणतीही गोष्ट प्रमाणाच्या बाहेर खाऊ नये. त्यानुसार जास्त प्रमाणात दूध पिणे त्रासदायक ठरू शकते. शिवाय ज्या लोकांना दुधाची अॅलर्जी आहे अशा लोकांना या दुधाचे दुष्परिणाम जाणवू शकतात.