ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
काचेचे कुक टॉप वापरत असाल तर माहीत हव्यात या गोष्टी

काचेचे कुक टॉप वापरत असाल तर माहीत हव्यात या गोष्टी

सुसज्ज सुविधांनी युक्त असे घर प्रत्येकाला हवे असते. अशा घरामध्ये अनेक साय-फाय, लेटेस्ट आणि दिसायला सुंदर गोष्टी घरात असाव्यात असे सगळ्यांना वाटते. पण कधी कधी घरात अशा काही गोष्टींची खरेदी आपण करतो की त्यामुळे काही अपघात होण्याची शक्यता असते. विशेषत: किचनमध्ये अशा काही गोष्टींची आपण खरेदी करतो की, त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. किचनमधील कुकटॉपमध्ये आता बरीच व्हरायटी पाहायला मिळते. त्यामधील काचेचे कुकटॉप तुम्ही वापरत असाल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे हे फारच गरजेचे असते. काचेचे कुकटॉप यांची योग्य माहिती नसेल तर अशा काचा फुटण्याची शक्यता असते.

एकदा किचनमध्ये काम करत असताना तवा खूप तापला होता.याचा अंदाज आला नाही. चपात्या शेकताना अचानक एक मोठा आवाज आला. काचेचे तुकडे सारे घरभर पसरलेले होते. इतकी मोठी काच असताना देखील ती फुटली. काच फुटल्यानंतर दोन मिनिटांसाठी काय झाले ते कळलेच नाही. पण त्यामुळे मोठा धक्का बसला. गॅस शेगडीवरील काच अशा पद्धतीने फुटू शकते. यावर काही काळासाठी विश्वासच बसत नव्हता. पण ही काच फुटली. तुमच्याकडेही अशा काचा असतील तर तुम्ही आताच काही गोष्टींची काळजी ही घ्यायला हवी.

अतिस्वच्छता ही बिघडवू शकते मानसिक आरोग्य

काचेचे कुकटॉप असेल तर अशी घ्या काळजी

काचेचे कुकटॉप

ADVERTISEMENT

Instagram

काचेचे कुकटॉप हे पटकन फुटत नसले तरी देखील त्यावर कोणतीही गरम गोष्ट ठेवणे टाळा.  त्यामुळे ती काच तडकण्याची शक्यता असते. 

  • काचेचे कुकटॉप अति तापू देऊ नका. कारण ते जर अति तापले तर ते अचानक तडकण्याची शक्यता जास्त असते.
  •  काचेचे कुकटॉप गरम होत असेल तर किचनमध्ये व्हेटिंलेशनची योग्य अशी सोय करुन घ्या. त्यामुळे तो थंड होण्यापर्यंत वाट पहा. त्यानंतरच त्यामध्ये दुसरे काहीतरी करा. म्हणजे तुमचे कुक टॉप फुटणार नाही 
  • तुमची कुकटॉप किती बर्नरचा आहे ही माहिती देखील तुम्हाला असायला हवी. कारण त्यानुसार तुम्हाला त्याचा वापर करता यायला हवा.  कारण कमी बर्नरवाला गॅस असेल तर तो जास्त काम करताना पटकन तापतो.
  • कुकटॉप हा नेहमी थोडा हवेशीर ठिकाणी असावा. हा कुकटॉप हवेशीर ठिकाणी असेल तर ग्लास जास्त तापत नाही 

    पावसाळ्यात माशांचा त्रास होत असेल तर सोपे उपाय

कुकटॉप निवडताना

जर तुमच्या घरात लोकांचे येेजाणे जास्त असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. स्वयंपाकघरातील गॅस निवडताना तुम्हाला स्टेनलेस स्टीलचा गॅस निवडता आला तर फारच उत्तम कारण असे कुकटॉप असा त्रास देत नाहीत. त्यामुळे कुकटॉप निवडताना तुम्ही स्टेनलेस स्टीलचे कुकटॉप निवडा. कारण खूप जणांकडे सतत जेवणाचे कार्यक्रम असतात अशावेळी असे फॅन्सी कुकटॉप काहीच कामी येत नाही. 

आता काचेचे कुकटॉप वापरत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या. 

ADVERTISEMENT

असं बनवा तुमचं स्वयंपाकघर इको फ्रेंडली, फॉलो करा या टिप्स

05 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT