हिवाळ्यात फिरायला जाण्याचे म्हणजेच वेकेशनचे प्लॅन जोरात सुरू होतात. मित्र मंडळी आणि फॅमिली पिकनिकसोबत सोलो ट्रिपही अनेक जण प्लॅन करतात. या काळात ट्रेक अथवा उंच हवेच्या ठिकाणी जाण्याची एक वेगळीच मजा असते. मात्र जर यंदाच्या हिवाळी वेकेशनमध्ये तुम्ही ट्रेकवर जायचा प्लॅन करत असाल तर त्याआधी काहील गोष्टींची व्यवस्थित तयारी करा. कारण हिवाळ्यात ट्रेकवर अथवा थंड हवेच्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला थंडीपासून बचाव करण्यासाठी काही टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरतील.
भारतात ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहेत ही ठिकाणं (India Best Trekking In Marathi)
हिवाळी ट्रेकवर जाताना…
हिवाळ्यात ट्रेकवर अथवा उंच ठिकाणी फिरायला जाणार असाल तर त्याआधी या गोष्टींची काळजी जरूर घ्या.
जास्तीचे कपडे
ट्रेकसाठी डोंगर माथ्यावर गेल्यावर हिवाळ्यात सर्वात जास्त गारवा असतो. अशा थंडीपासून वाचण्यासाठी तुम्हाला जास्तीचे गरम कपडे नक्कीच लागू शकतात. तेव्हा तुमच्या ट्रेकिंग सॅकमध्ये तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतील असे कपडे घ्यायला विसरू नका. थर्मल्स, ग्लोव्ह्ज, कानटोपी, जॅकेट, जीन्स असे कपडे सोबत असतील तर तुम्ही ट्रेकचा आनंद मनसोक्त घेऊ शकता.
महाराष्ट्राची शान असलेले महाराष्ट्रातील किल्ले (List Of Forts In Maharashtra In Marathi)
ट्रेकिंगची वेळ
ट्रेकिंग करणं हा एक अदभुत अनुभव असतो. ट्रेकिंगचा रस्ता जरी छोटा असला तरी तो थरारक अनुभव आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने अनुभवायला हवा. उन्हाळ्यात ट्रेक करणं हिवाळ्याच्या मानाने सोपं असतं. मात्र हिवाळ्यात डोंगरमाथ्यावरील नजारा आणि धुकं आणि ढगांच्या सहवासात शिखर चढण्याची मजाच वेगळी आहे. यासाठी लक्षात ठेवा हिवाळ्यात लवकर दिवस उगवतो आणि रात्रही लवकर होते. त्यामुळे त्यानुसार तुमचा ट्रेक प्लॅन करा.
सुरक्षेची साधने
हिवाळा असो वा कोणताही ऋतू ट्रेक करताना तुमच्या जवळ सुरक्षेची साधनं असायलाच हवीत. जर तुम्ही बर्फाळ डोंगरावर ट्रेकसाठी जाणार असाल तर तुमच्यासोबत ट्रायल मॅप, पॉकेट नाइफ, हॅंड वॉर्मिंग पॅकेट, होकायंत्र, प्रथमोपचार किट, स्लीपिंग बॅग, मोबाईल फोन, चार्जर, पॉवर बॅंक आणि पुरेसे खाण्याचे साहित्य, पाणी असायला हवेच.
100+ Trekking Quotes In Marathi | Travel Quotes In Marathi
वातावरणाचा अंदाज
थंड हवेच्या ठिकाणी डोंगरमाथ्यावर जाताना तुम्हाला हवामानाचा अंदाज घेता यायला हवा. कारण तुम्ही ट्रेक करणार आहात त्या काळात हवेचा वेग कसा असेल, तुम्ही किती वेळ ट्रेक करणार आणि तिथले वातावरण दिवसा आणि रात्री कसे असेल यावरून तुमचा ट्रेक सुखकारक होऊ शकतो. अंदाज न घेता कधीच कोणत्याही नवीन ठिकाणी ट्रेक करू नका.
अनुभवी ट्रेकर्सचे मार्गदर्शन
ट्रेकचा खरा आनंद घ्यायचा असेल तर पहिल्यांदा नवीन ठिकाणी जाताना तुम्ही एखाद्या अनुभवी ट्रेकरसोबत अथवा ट्रेकच्या ग्रुपसोबत जायला हवं.