ADVERTISEMENT
home / Festival
गुढीपाडवा –  सोनं खरेदीसाठी योग्य संधी

गुढीपाडवा – सोनं खरेदीसाठी योग्य संधी

भारत देश हा संस्कृती आणि परंपरेचा देश आहे. जिथे विविध जाती आणि धर्माचे लोकं आनंदाने व एकोप्याने विविध सण एकत्र साजरे करतात. यापैकीच एक म्हणजे गुढीपाडवा हा महाराष्ट्रात तर उगादी हा दक्षिणेकडे साजरा केला जाणारा हिंदू नववर्षाचा सण होय. गुढीपाडव्याचं महत्त्व संपूर्ण देशात फार मोठ्या प्रमाणावर आहे. जेव्हा लोकं घरासमोर गुढी उभारतात, एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देतात. नवीन वर्षाची नवीन सुरूवात जी सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणि शांतता आणणारी असते.

गुढीपाडवा आणि सोन्याचं कनेक्शन

गुढीपाडव्याला लोकं ना फक्त घरासमोर गुढी उभारून नातेवाईकांना भेटतात तर या शुभ दिवशी अनेक जण महत्त्वपूर्ण खरेदीही करत असतात. जसं प्रोपर्टी, वाहन किंवा सोन खरेदी. या दिवशी खरेदी केल्यास ती लाभदायी ठरते, असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी आवर्जून लोकं खरेदी करतात. हेच लक्षात घेऊन बरेच जण सोन्याची खरेदी करतात. कारण पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सोनं खरेदी करणं हे शुभ आणि भरभराटीचं ठरतं. परिणामी या दिवशी सोन्याचे दर हे जरा चढेच असतात.

गुढीपाडवा आणि सोन्याच्या भेटवस्तू

सणावाराच्या दृष्टीने भेट म्हणूनही सोनं खरेदी केली जाते. सोन्याच्या छोट्या छोट्या वस्तू जसं कानातले, चेन, अंगठी आणि नाणी जवळच्या व्यक्तींना भेट दिली जातात. कारण सोनं हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आपल्या जवळच्यांच्या आयुष्यात भरभराट व्हावी म्हणून सोन्याच्या भेटवस्तू दिल्या जातात. सोन्यासोबतच गुढीपाडव्याला चांदी आणि प्लॅटीनमचीही खरेदी केली जाते. अनेक गृहिणी वर्षभर भिशी लावून गुढीपाडव्याच्या दिवशी खास सोन्याची खरेदी करतात. अनेक ज्वेलर्स गुढीपाडव्याच्या दिवशी खास सोन खरेदीवर ऑफर्स ठेवतात.

सोनं एक गुंतवणूक

आपल्याकडे सोनं खरेदी हा फक्त दागिन्यांपुरताच मर्यादित विषय आता राहिलेला नाहीतर ती एक गुंतवणूक मानली जाते. नववर्षाच्या पहिल्या दिवशी केली जाणारी ही गुंतवणूक वर्षभर भराभराट करणारी ठरेल. या विचाराने लोकं थोडं का होईना पण सोनं खरेदी करतात. कारण सोनं हा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. गुढीपाडवा हे फक्त निमित्त आहे सोनखरेदीसाठी. पण आता सोने खरेदी म्हणजे फक्त दागिने किंवा नाणी खरेदी नाही. आता तुम्ही सोनं हे गोल्ड ईटीएच्या रूपातही घेऊ शकता. जी एक उत्तम गुंतवणूक असून त्यामुळे टॅक्स बचतही होते.

ADVERTISEMENT

गोल्ड ETF (एक्सचेंज ट्रेंडेड फंड्स) मध्ये गुंतवणूक

तुम्ही यामध्ये गुतंवणूक करू शकता पण भारतात हे अजून इतकं लोकप्रिय नाही. पण आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांमध्ये हे फार लोकप्रिय आहे. 

गोल्ड एक्यूमलेशन प्लॅन (GAP)

या पद्धतीत व्यक्ती सोनं हे ऑनलाईन मोबाईल वॉलेट जसं पेटीएम, फोन पे आणि स्टॉक होल्डींग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोल्ड रश प्लॅन अंतर्गत खरेदी करू शकते. हे सोनं खरेदी करतानाही काही विकल्प समोर येतात. 

ADVERTISEMENT

भारत सरकारद्वारा जारी केलेले सांव्हरिन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक 

भारतात सोन्याला एका उत्पादक एसेटमध्ये बदलण्यासाठी सरकारने गोल्ड मॉनेटायजेशन स्कीम सादर केली होती. ज्यामध्ये बॅकेत लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यावर तुम्हाला व्याज कमावण्यात तुम्हाला मदत मिळते. कारण सोन भारतीय अर्थव्यवस्थेत गुंतवणूकीचा आणि परदेशी गुंतवणुकीच्या आऊटफ्लोचा मोठा भाग आहे. त्यामुळे गोल्ड बाँड स्कीम हे गुंतवणूकदारासाठी महत्त्वपूर्ण आहे. 

पण अशाप्रकारे सोन्यात गुंतवणूक करण्याआधी योग्य सल्ला घेऊन संपूर्ण प्रोसेस नक्की समजून घ्या. मग यंदा तुम्हीही गुढीपाडव्याच्या निमित्ताने ऑफलाईन किंवा ऑनलाईन सोने खरेदी करा आणि वर्षभर भरभराट होण्याला आमंत्रण द्या. 

You Might Also Like

ADVERTISEMENT

Gudi Padwa Wishes in English

07 Apr 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT