ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
#Lucky2020 : आनंदी मनाने करा 2019ला गुडबाय

#Lucky2020 : आनंदी मनाने करा 2019ला गुडबाय

सरत्या वर्षाला निरोप देऊन (Good Bye 2019) आपण नवं वर्ष 2020 चं जल्लोषात स्वागत करणार आहोत. नवा उत्साह,  नव्या अनुभवांसाठी आपण सज्ज झालेले आहोत. 2019 मध्ये केलेल्या चुका 2020 मध्ये आर्वजून टाळायच्या आहेत, हा संकल्प दरवर्षी प्रमाणे यंदाही आपल्यापैकी अनेकांनी मनात पक्का केला असेलच. तरीही नवीन वर्ष अधिकाधिक चांगलं जावं, यासाठी 2019ला आनंदी मनानं गुडबाय करताना आणि 2020 मध्ये एंट्री करण्यापूर्वी काही गोष्टींची खूणगाठ आपण बांधून ठेवायला हवी. 2019 संपण्यासाठी काही तास शिल्लक आहेत, काही गोष्टी अपूर्ण राहिल्या असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्की करावा. 

(Featured Image Courtesy – Instagram)

1. संवाद साधा आणि नाती जपा  

निरनिराळ्या मोबाइल अ‍ॅप्समुळे हल्ली प्रत्यक्ष भेटून होणारा संवाद हरवला असल्याचंच दिसत आहे. ऑनलाइन सोयीसुविधांमुळे माणसांमधलं अंतर वाढत जात आहे. यामुळे मित्रमैत्रिणी-कुटुंबीयांमध्ये संवादच होत नाही. ‘तु फक्त वेळ सांग आपण भेटूच’,’तु प्लान कर ना यार मी पक्का येणार’ असं फक्त म्हटलं जातं, पण प्रत्यक्षात या चर्चा हवेतच विरून जातात. नवीन वर्षात मोबाइलवरील संवाद कमी करून आपल्या आई-वडील, मित्रमैत्रिणी आणि खास व्यक्तिसाठी वेळ काढून प्रत्यक्ष संवाद साधा. त्यांच्यासोबत चर्चा करा. यामुळे नात्यातील दुरावा नक्कीच कमी होईल. 

ADVERTISEMENT

2. ‘मी टाईम’चे वेळापत्रक तयार करा  

इतरांप्रमाणे स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. ऑफिसचे टार्गेट, करिअर, जबाबदारींच्या ओझ्यात आपलं स्वतःकडे दुर्लक्ष होतं. नवीन वर्षात ‘मी टाईम’चे वेळापत्रक तयार करा आणि त्याचं पालनदेखील करा. स्वतःचे छंद, स्वतःचे आरोग्य, आवडीनिवडी जोपासण्याचा पुरेपुर प्रयत्न करा. वर्षभरात तुम्हाला आरोग्यासाठी ठरूनही वेळ देता आला नसेल तर याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. ब्लड टेस्ट, बॉडी चेकअप ज्या काही गोष्टी राहून गेल्या असतील त्यासाठी वेळ काढा.

(वाचा : New Year 2020 : सुट्यांचं कॅलेंडर पाहिलं का, आताच करा फिरायचं प्लानिंग)

3. सामाजिक जाणीव 

ADVERTISEMENT

आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, समाजाप्रतिची आपली काही कर्तव्य आपण पार पाडली पाहिजेत. समाजातील गरजू माणसे, अनाथ मुलांची, वयोवृद्धांची भेट घ्यावी. त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला जशी शक्य आहे तशी मदत त्यांना करा. सामाजिक बांधिलकी जपून जे सुख-समाधान मिळतं त्याची तुलना अन्य कशाशीही होऊ शकत नाही. 

4. चुकीच्या सवयी सोडवा

तुमच्या एखाद्या सवयीमुळे कुटुंबीयांना किंवा स्वतःलाही त्रास होत असल्यास,  ती सवय सोडण्याचा प्रयत्न करा. वर्षाच्या शेवटी वाईट सवयी सोडण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही. 

5. आज कुछ तुफानी करते है!

ADVERTISEMENT

प्रत्येक महिन्यात नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. वैयक्तिक वाढ व्हावी अशी ईच्छा असल्यास विशेषतः ज्या गोष्टींची तुम्हाला अतिशय भीती वाटते. त्यांना प्राधान्य देऊन आपली भीती दूर करण्याचा प्रयत्न करा. नव्या अनुभवामुळे तुमचं मन अधिक मोकळे होण्यास मदत होईल, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये कुतुहलताही निर्माण होईल. वर्षाच्या शेवटच्या दिवशी मनातील एखादी भीती दूर पळवून लावा.

(वाचा : न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी ‘या’ पाच जागा आहेत बेस्ट)

6. वेळेचं पालन करा 

प्रत्येक वेळेस घाई-गोंधळ करून काम करणं टाळा. वेळेचं पालन न केल्यानं तुमचंच नुकसान होते. एखाद्या ठिकाणी वेळेच्या आधी पोहोचण्याची शिस्त लावून घ्या. तसंच एखादं कार्य वेळेपूर्वीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 

ADVERTISEMENT

7. इतरांच्या भावनांचा आदर करा

आयुष्यातील खास व्यक्ती तुमच्यासाठी वेळ काढत असेल. तर तिच्या/त्याच्या भावनांचा आदर करायला शिका. स्वतःच्या वेळेप्रमाणेच तिचा/त्याचाही वेळ बहुमूल्यच असतो. ज्या प्रमाणे त्यांच्या प्रत्येक वागण्यातून तुम्ही त्यांच्यासाठी किती खास आहेत, याची जाणीव होते. तसंच ते देखील स्पेशल आहेत, याची जाणीव त्यांना करून द्या. कारण वेळ निघून गेल्यानंतर कोणतेही प्रयत्न निरर्थकच ठरतात. 

(वाचा : Valentines Day 2020 : ‘व्हॅलेंटाइन्स डे’साठी शुभेच्छा संदेश)

हे देखील वाचा :

ADVERTISEMENT

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

30 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT