गेल्या काही महिन्यांपासून कोरोना काळ आणि लॉकडाऊन यामध्ये अनेक चांगल्या बातम्याही ऐकायला येत आहेत. अनेक सेलिब्रिटींनी लग्न केली तर अनेकांनी आपल्या घरी गुड न्यूज असल्याचे शेअर केले. आता यामध्ये अजून एका अभिनेत्रीचे नाव सामील झाले आहे. ‘तू सूरज, मैं सांझ पियाजी’ मालिकेतील अभिनेत्री कंगना शर्मा गरोदर असल्याचे तिने आपल्या सोशल मीडियावरून सांगितले आहे. कंगना शर्माने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अतिशय सुंदर दिसत असून तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची एक चमकही दिसून येत आहे. ही गोड बातमी शेअर केल्यानंतर अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अजून एका अभिनेत्याची ‘गुड न्यूज’ची घोषणा, दुसऱ्यांदा होणार बाबा
कंगना शर्माचा फोटो झाला व्हायरल
कंगना शर्मा गरोदर असून तिने शेअर केलेला फोटो हा आनंद देणाराच आहे. यामध्ये कंगना साधारण 7-8 महिन्यांची गरोदर असावी असे वाटत आहे. तर हा फोटो शेअर करताना कंगनाने आपल्या भावनाही शेअर केल्या आहेत. ‘येणारे बाळ हे प्रेम अधिक घट्ट बनवते, दिवस लहान बनवते, रात्री मोठ्या बनवते, बँकेची गणितं बदलते, घर अधिक आनंदी बनवते, कपडे अधिक लहान बनवते, भूतकाळ विसरायला लावते आणि भविष्यकाळ अधिक सुंदर करते’. तिच्या या भावना नक्कीच प्रत्येकाला या आनंदाशी जोडणाऱ्या आहेत. कोणत्याही आईची भावना हीच असते. कारण आई होण्यापेक्षा मोठी भावना नक्कीच कोणतीही नाही. अगदी कितीही मोठी सेलिब्रिटी असली तरीही आई होणं ही अत्यंत आनंदी भावना प्रत्येकाची सारखीच असते. त्यामुळे ही भावना शब्दात मांडली की साहजिकच सर्वांना आनंद होतो.
Good News: अभिनेत्री पूजा बॅनर्जी होणार आई, लॉकडाऊनमध्येच केलं लग्न
आधीही फोटो शेअर केला होता
याआधी पण कंगनाने एक पिवळ्या कुरती आणि लाल दुपट्ट्यामधील फोटो शेअर केला होता. मात्र त्यामध्ये तिने आपण गरोदर असल्याचे सांगितले नव्हते. पण तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि चमक ती गरोदर असल्याचे दाखवून देत होता. त्यावेळी तिला अनेक अशा कमेंट्सही आल्या होत्या. मात्र त्यावेळी तिने कोणतीही घोषणा केली नव्हती. तर तिने हा खास फोटो पोस्ट करत आपण गरोदर असल्याचे सांगितले आहे. कंगनाने आतापर्यंत तू सूरज, मैं सांझ पियाजी मध्ये काम केले आहे. इन्स्टाग्रामवर ती नेहमीच आपले फोटो शेअर करत असते आणि तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. यामध्ये तिने ‘मीरा मित्तल’ ही भूमिका साकारली असून तिच्या या भूमिकेसाठी तिचे खूपच कौतुक झाले आहे. दरम्यान आता गरोदरपणामुळे कंगना कोणत्याही मालिकेत काम करत नसून ती आपला गरोदरपणाचा काळ आनंदात घालवत आहे.
कंगनाशिवाय नुकतेच टीजे सिद्धू, पूजा बॅनर्जी या टीव्हीवरील अभिनेत्री तर करिना कपूर खान यांनी आपल्या या गुड न्यूज शेअर केल्या आहेत. तर टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानीही गरोदर असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र अनिताने याबाबत अजून कोणतेही वक्तव्य अथवा घोषणा केलेली नाही. आता यांचे चाहते घरी नक्की कोणता पाहुणा येणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत हे नक्की!
कपिल शर्माने शेअर केला मजेशीर व्हिडिओ, असा घालावा मास्क
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक