अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहलीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्याकडे गुड न्यूज असल्याची बातमी पोस्ट केली आहे. विराट आणि अनुष्काने लग्न केल्यानंतर त्यांच्याकडे आता गोड बातमी कधी असणार याची त्यांच्या चाहत्यांना आस लागली होती आणि आता अखेर ती गोड बातमी चाहत्यांना मिळाली असून काही वेळातच चाहत्यांनी आणि विराटच्या मित्रमैत्रिणींनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अनुष्काच्या मित्रमैत्रिणींनीही दोघांचं अभिनंदन केलं आहे. जानेवारी 2021 मध्ये विरूष्काच्या बाळाचा जन्म होणार असल्याचंही त्याने म्हटलं आहे.
जानेवारी होणार नव्या पाहुण्याचं आगमन
विराटने आज सकाळीच ही बातमी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केली आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे. 2017 साली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबंधनात अडकली. कोणतीही पूर्वकल्पना न देता अत्यंत अलिप्तपणे या दोघांनी लग्न केलं. विरुष्काचे हे लग्न कित्येक दिवस गॉसिपचा विषय होता. या कपलकडे कित्येकांचे लक्ष होते.त्यांच्या प्रत्येक गोष्टी त्यानंतर अगदी बारकाईने पाहिल्या जाऊ लागल्या. अनुष्काने लग्नानंतर zero नावाचा एकच चित्रपट शाहरुख खानसोबत केला. त्या चित्रपटानंतर तिने एकही चित्रपट तिने केला नाही किंवा तिचा आगामी प्रोजेक्ट लोकांना कळू शकला नाही. त्यामुळेच अनुष्का इतका गॅप का घेत आहे हे प्रेक्षकांना कळत नव्हतं. आता लॉकडाऊनमध्ये दोघांना एकमेकांसाठी चांगला वेळ देता आला. त्यामुळे आता विरूष्काच्या घरातही लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची ही गोड बातमी मिळाली आहे.
अभिनेता रणदीप हुड्डावर पार पडली मोठी शस्त्रक्रिया
चाहत्यांमध्ये उत्साह
विरूष्काच्या या गोड बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाची लहर पसरली आहे. गेल्या पाच महिन्यात कोरोनामुळे असलेला निरूत्साह आता अचानक उत्साहामध्ये बदलून गेला असल्यासारखं वाटत आहे. काही महिन्यांपूर्वीच हार्दिक पंड्याने नताशाशी लग्न केलं आणि त्यांनी याचवर्षी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर विरूष्का ही गोड बातमी कधी देणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. आता ही बातमी मिळाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. आता नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच विरूष्काकडे बाळ जन्माला येणार असून सगळेच आनंदी असल्याचं सांगण्यात येत आहे.
नागिन’फेम अभिनेत्री गरोदर असल्याच्या चर्चा, व्हिडिओ व्हायरल
यापूर्वी बरेचदा पसरली होती अफवा
याआधी बरेचदा अनुष्का गरोदर असल्याची अफवा पसरली होती. मात्र ज्यावेळी अनुष्काला ही गोष्ट विचारण्यात आली. तेव्हा ती म्हणाली की, मला माझ्या आयुष्यातील महत्वाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. एखादी अभिनेत्री कोणाला डेट करते तेव्हा ती लग्न कधी करते असे विचारले जाते.. आता लग्न केल्यानंतर लोकांना good news ची घाई असते. इतरांसारखे आम्हालाही आमचे आयुष्य जगू द्या. अशा गोष्टींचे स्पष्टीकरण द्यायला अगदी नकोसे वाटते. काय सांगायचे अजून .. असे म्हणत तिने या गोष्टीचे खंडन केले होते. मात्र आता विराटने स्वतः ही बातमी शेअर केल्यामुळे कोणतीही अफवा पसरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसंच या फोटोमध्येही अनुष्काच्या चेहऱ्यावरील चमक सर्व काही सांगून जात आहे. त्यामुळे आता त्यांच्या चाहत्यांनीही त्यांना पुढच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वडिलांच्या धमकीला घाबरून अभिनेत्रीने सोडले घर, केला आरोप
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा