नाते म्हटले की, कधी गोड आणि कधी कडू असे आलेच. पण काहींच्या नात्यामध्ये अवघ्या काहीच कालावधीनंतर एकमेकांविषयी कंटाळा दिसू लागतो. जो नात्यासाठी अजिबात चांगला नाही. तुमचेही नाते कंटाळा या एका गोष्टीवर येऊन थांबले असेल तर ते नाते तुम्हाला रिबुट करायची आहे. आता हे नाते पुन्हा नवे आणि फ्रेश कसे करायचे असा विचार करत असाल तर तुम्हाला काही सोप्या गोष्टी करायला हव्यात जेणेकरुन तुमच्या नात्यात कंटाळा या शब्दाला जागा उरणार नाही आणि तुमचे नाते जास्तीत जास्त चांगले राहण्यास तुम्हाला मदत मिळेल.
संवाद साधा
हल्ली सगळेच फोनवर फार गुंग झालेले दिसतात. त्यांना फोनशिवाय अन्य काहीही चांगले वाटत नाही. एखादी महत्वाची व्यक्ती समोर असेल तरी अशी लोक समोर फोन घेऊन बसलेली असतात.त्यामुळे त्यांना कोणी फोनवरुन हटकले किंवा त्यांच्याशी बोलायला आले की, त्यांना नकोसे होते. एखादी खूप जवळची आणि खास व्यक्तीही अशावेळी खूप जणांना जणू नकोशी होऊन जाते. तुम्हालाही फोनचे असे वेड लागले असेल तर तुम्हाला तो लांब टाकून संवाद साधण्याची गरज आहे. थोडा वेळ तरी तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोललात तरी देखील तुम्हाला दोघांना नात्यात कंटाळा येणार नाही.
स्वत:ची चूक ओळखा
बरेचदा समोरच्याचा कंटाळा येणे यामध्ये आपलीही काहीतरी चूक नक्की असते. जर तुम्हाला असा कंटाळा तुमच्या जोडीदाराचा येत असेल तर तो कोणत्या कारणामुळे येतो ते ओळखा. खूप जणांना आपल्या कोणत्याही चुका दाखवल्या की, समोरची व्यक्ती नकोशी होऊन जाते. पण असे का होते ते ओळखण्यासाठी तुम्ही आधी आपण काय चुकलो हे देखील माहीत करुन घ्या. त्यामुळे नात्यात काय करायला हवे हे समजणे सोपे जाते. त्यामुळे दुसरा काय चुकला यापेक्षा मी काय चुकतो याकडे लक्ष द्या
अहंम सोडा
खूप जणांना ग ची बाधा असते. मी माझे… मला या शिवाय त्यांना काहीही दिसत नाही. मी अमुक गोष्ट केली तर ती योग्य पण समोरच्याने केली की अयोग्य असे समजणारी व्यक्ती कोणत्याही नात्यात असली तरी तिला समोरची व्यक्ती कधीही आवडत नाही. अशा व्यक्तीला आपल्या समोरच्या व्यक्तीचाही कंटाळा येऊ लागतो. ग ची बाधा तुम्हाला असेल तर तुमचा तो स्वभाव बदला. तुमच्या या स्वभावाचा समोरच्या जोडीदारालाही कंटाळा आलेला असतो. पण तुमच्यासोबत नाते चांगले राहावे यासाठी ती व्यक्ती तुम्हाला बोलत नाही इतका फरक असतो. तुमचा जोडीदार जर तुम्हाला काही बाबतीत दुर्लक्षित करत असेल तर तुम्हाला तो कधीही कंटाळू शकतो.
बंधने कमी करा
खूप जण नात्यात जोडीदारावर बंधन ठेवत असतात. बंधनामुळेही कधी कधी नाते नकोसे होऊ लागते. जर तुम्ही अशी बंधने घालत असाल तर त्या बंधनातून मुक्त होण्याचा समोरच्याचा मानस असतो. त्यामुळे अशी व्यक्ती जोडीदाराच्या कोणत्याही गोष्टीला कंटाळत असते. जोडीदाराला ही व्यक्ती आपल्या हाताखाली किंवा शब्दाबाहेर नाही असे वाटते पण हा तुमचा गैरसमज आहे असे काहीही नाही. ती व्यक्ती तुमच्या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग शोधत असते. यात काहीही शंका नाही.
आता नात्यात एकमेकांटा कंटाळा आला असेल तर तुम्ही आताच या गोष्टी बदला.