नव्वदीचा एक काळ असा होता जेव्हा गोविंदा आणि नीलम कोठारीच्या जोडीचे लाखो चाहते होते. गोविंदा आणि नीलमची जोडी चित्रपटांमधील हिट फॉर्म्युला ठरत होती. ज्यामुळे एकापाठोपाठ एक अशा जवळजवळ चौदा चित्रपटांमध्ये ही जोडी एकत्र झळकली होती. डान्स मूव्हज आणि विनोदी शैली प्रेक्षकांना खिळवून ठेवत असे. नीलमच्या चुलबुला चेहरा आणि सौंदर्यांचेही चाहते अनेक होते. आजही गोंविदा आणि त्याच्यासोबत हिट ठरलेली अभिनेत्री यांना एकत्र पाहणं चाहत्यांसाठी उत्सुकता वाढवणारं ठरतं. लग्नानंतर नीलम बॉलीवूडपासून दूर गेली. अधून मधून ती एखाद्या चित्रपटात दिसू लागली. गोविंदानेही आता चित्रपटांमध्ये काम करणं कमी केलेलं आहे. मात्र असं असलं गोविंदाला अनेक रिअॅलिटी शोजमध्ये आग्रहाने बोलावलं जातं. सहाजिकच गोंविदा ज्या शोमध्ये सहभागी होतं त्या शोमध्ये त्याचं एखादं हिट गाणं पुन्हा रिक्रिएट केलं जातं. या शोमध्ये त्याच्यासोबत जर त्याच्यासोबत हिट ठरलेली नीलम असेल तर मग तो परफॉर्मन्स सुपरहिट झालाच म्हणून समजा.
पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार गोविंदाचा परफॉर्मन्स
लॉकडाऊनमध्ये सध्या टिव्हीवरील मनोरंजन हाच प्रेक्षकांना मन शांत आनंदी ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे. अशात जर तुम्हाला पुन्हा तो नव्वदीचा काळ समोर उभा केला गेला तर प्रेक्षकांना आणखी काय हवं. तुम्हाला हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल पण खरंच तुमच्यासमोर पुन्हा एकदा गोविंदा आणि नीलम कोठारी यांची जोडी एक हिट परफॉर्मन्स घेऊन येणार आहे. या दोघांचे एक सुपरहिट गाणे होते ‘आप के आ जाने से’ याच गाण्याला पुन्हा रिक्रिएट केलं जाणार आहे. ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मध्ये गोविंदा आणि नीलम कोठारी नुकतेच सहभागी झाले होते. या रिअॅटिली शोमध्ये आता हा नव्वदीचा काळ पुन्हा प्रेक्षकांना दाखवला जाणार आहे. या शोचे परिक्षक, शिल्पा शेट्टी, अनुराग बासू आणि गीता कपूरही हा परफॉर्मन्स पाहून फारच उत्साही झालेले पाहायला मिळाले. नीलम कोठारीचे पती समीर सोनी यांनी या शानदार परफॉर्मन्सचा एक छोटा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यासोबत त्यांनी शेअर केलं आहे की, वीस वर्षांचा प्रतिक्षा संपली…
गोंविदा आणि नीलमची हिट जोडी पुन्हा एकत्र
एक असा काळ होता जेव्हा गोविंदा आणि नीलम एका पाठोपाठ एक हिट चित्रपट देत होते. गोविंदा नीलमच्या प्रेमात पुरता बुडाल्याची चर्चाही होती. मात्र गोविंदाचे नीलमवर एकतर्फी प्रेम होते. नीलमला गोविंदाविषयी असं काहीच वाटत नव्हतं. त्यामुळे त्याचं सूत त्या काळात जमू शकलं नाही. पण गोविंदा आता वीस वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या क्रशसोबत एकत्र परफॉर्मन्स करताना खूप खुश दिसत होता. त्यामुळे त्याने ही संधी मुळीच सोडली नाही. या जोडीने ऐंशी नव्वदचा काळ गाजवला होता. जवळजवळ चौदा चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. घराना, खुदगर्ज, सिंदूर, हत्या, लव्ह 86, दो कैदी, बिल्लू बादशाह, इल्जाम, ताकतवर, फर्ज की जंग, घर में राम गली में श्याम, दोस्त गरीब आणि जोरदार अशा अनेक चित्रपटांमध्ये ही जोडी हिट ठरली होती. आता पुन्हा या जोडीला छोट्या पडद्यावर का होईना एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी उत्कंठा वाढवणारं ठरणार आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
माधुरी दीक्षितच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण, मोठा मुलगा अरिन झाला पदवीधर
रणबीर आणि आलियाच्या ‘ब्रम्हास्त्र’चा आता निर्माता झाला अयान मुखर्जी
सकारात्मक विचार हाच एकमेव मार्ग – अभिनेता डॉक्टर आशिष गोखले