ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
‘टिप टिप पानी बरसा’ गाण्यातून गोविंदाचा कमबॅक, चाहत्यांनी दिल्या या प्रतिक्रिया

‘टिप टिप पानी बरसा’ गाण्यातून गोविंदाचा कमबॅक, चाहत्यांनी दिल्या या प्रतिक्रिया

नव्वदचे दशक अभिनय, डान्स आणि विनोदबुद्धीने गाजवणारा अभिनेता गोविंदा कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. गोविंदाचे आजही अनेक चाहते आहेत. पूर्वी गोविंदाचा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याबद्दल उत्सुकता वाढत असे. या चित्रपटात त्याचा नेमका कोणता अवतार दिसणार अशी चाहत्यांना उत्कंठा असे. ज्यामुळे नव्वदच्या काळी चित्रपटगृहात गोविंदाचे चित्रपट अक्षरशः धुमाकूळ घालत असत. मात्र गेली अनेक वर्षे गोविंदा चित्रपटसृष्टीपासून काहिसा दूरावला होता. मात्र आता पुन्हा एकदा त्याची जादू चाहत्यांवर चालणार आहे. कारण गोविंदाचे एक नवं कोरं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ज्यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कंमेट्सचा पाऊस पाडला आहे.

मराठी चित्रपट पुन्हा नव्याने उभे राहण्याची नांदी “जयंती” पासून

गोविंदाचा कमबॅक

गोविंदाने हे गाणं त्याच्या सोशल मीडिया अकाउंट गोविंदा रॉयल्सवर स्वतःच प्रदर्शित केलं आहे. चित्रपटात काम करणं बंद केलं असलं तरी चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी गोविंदाने सोशल मीडियाचा आधार घेतलेला आहे. या गाण्याचे बोल आहेत टिप टिप पानी बरसा…या गाण्यात गोविंदाने फक्त परफॉर्म केलेलं नाही तर चक्क हे गाणं स्वतः गायलं देखील आहे. गाण्याचा पॅटर्न क्लासिक स्टाईल असून हे गाणं पाहून चाहत्यांना नव्वदचा काळ नक्कीच आठवू शकतो.

शिल्पा ठाकरेचा नवा चित्रपट ‘A फक्त तूच’

ADVERTISEMENT

काय म्हणाला गोविंदा…

गोविंदा या गाण्यातून अनेक वर्षानंतर प्रेक्षकांसमोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबद्दल गोविंदाने शेअर केलं आहे की, “मी माझ्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. असे चाहते जे नेहमीच मला प्रेम आणि आर्शीवाद देतात. वैश्विक महामारीमुळे सध्या ऑनलाईन युझर्सचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे माझ्या मते चाहत्यांपर्यंत पोहचण्याचा सोशस मीडिया हाच एक उत्तम मार्ग आहे. ज्यामुळे आता माझे चाहते मला कुठेही, कधीही आणि कोणत्याही डिव्हाइसवर पाहू शकतात”. काही आठवड्यापूर्वीच एका शोमध्ये गोविंदाने या गाण्याची हिंट चाहत्यांना दिली होती. गोविंदाचे जबरदस्त डान्स मूव्हजस आणि हटके स्टाईल पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक होते. त्यामुळे चाहत्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी गोविंदाने या गाण्यातून सर्वांसमोर पुनरागमन केलेले आहे. या गाण्यावर चाहत्यांनी मनमोकळेपणे कंमेट्स दिलेल्या आहेत. बॉलीवूड किंग ऑफ डान्स, किंग इज बॅक, बॉस सिर्फ बॉसही होता है अशा प्रकारच्या या प्रतिक्रिया आहेत. 

भारती सिंहचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण, 15 किलो वजन केलं कमी

16 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT