ADVERTISEMENT
home / Festival
गुढीपाडव्याला तुमच्या जवळच्यांना द्या अशी ‘भेट’

गुढीपाडव्याला तुमच्या जवळच्यांना द्या अशी ‘भेट’

गुढीपाडवा म्हणजे आनंद आणि मांगल्याचा दिवस होय. आपल्याकडे गुढीपाडव्याचं महत्त्व फार मोठ्या प्रमाणावर आहे. गुढीपाडवाचा दिवस म्हणजे नवीन आशेसोबत नववर्षाचं स्वागत करणं आणि आपल्या कुटुंबियांसोबत तो साजरा करणं. एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणं. यंदा आणि मागच्या वर्षीही गुढीपाडव्याच्या आनंदावर काहीसं सावटच आहे. त्यामुळे यंदाही आपल्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना आपल्याला नववर्षाच्या निमित्ताने भेट देता येणार नाही. तुम्ही स्वतः त्यांना भेटू शकणार नाही. असं जर असलं तरी त्यांना तुम्ही ‘भेट’ म्हणजे गिफ्ट तर नक्कीच देऊ शकता.

आपल्याकडे खरंतर दिवाळीच्या पाडव्याला भेट देण्याचं प्रस्थ असतं. तेही लग्नानंतरचा पहिला पाडवा असेल तर जावयाला अगदी घरी बोलवून त्याच मानपान केलं जातं. पण काहीजण हौशीने गुढीपाडव्यालाही नवदांपत्याला बोलवून भेटवस्तू देतातच. यंदाही तुम्ही अशाच भेटवस्तू आपल्या जवळच्यांना नक्कीच देऊ शकता. फक्त त्या तुम्हाला ऑनलाईन पाठव्यावा लागतील. एवढं मात्र खरं. पाहूया तुम्हाला तुमच्या जवळच्यांना कोणते गिफ्ट्स देता येतील.

होम अप्लायंसेस Home Appliances

सणवाराच्या निमित्ताने आपल्याकडे बरेचदा होम अप्लायंसेस खरेदी केली जातात. म्हणजे त्या दिवसाची आठवणही राहते. आतातर आपण सगळे घरीच असल्याने किचनमधील सर्व सोयी सज्ज असणं ओघाने आलंच. तुम्ही लॉकडाऊन आणि कोरोनाचा विचार करून तुमच्या जवळच्यांना सुपमेकर, कॉफीमेकर, मायक्रोवेव्ह किंवा रोटीमेकर अशी अप्लायंस गिफ्ट करू शकता. या गोष्टींचा किचनमध्ये पूरेपूर वापर नक्कीच होईल.

इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स Electronic Gadegets

बाहेर कुठे जायचं नाही म्हटल्यावर घरच्याघरी मनोरंजन करणं हे आलंच. मग त्यासाठी तुम्ही एलसीडी टेलीव्हिजन सेट, म्युझिक सिस्टम, डीव्हीडी प्लेयर, ब्लूटूथ ईयर पॉड्स, आयपॅड, सारेगामा कारवा आणि किंडल अशा गिफ्ट्सचा विचार करू शकता.

ADVERTISEMENT

आयडॉल्स Idols

गुढीपाडव्याच्या शुभ दिवसाच्या निमित्ताने तुम्ही देवाची मूर्ती जी लाकडी किंवा चांदीतली असेल अशीही भेट म्हणून पाठवू शकता. आजकाल ऑनलाईन यासाठी बरेच ऑप्शन उपलब्ध आहेत. चांदीतली देवाच्या फ्रेम्स, कॉईन्स याचेही ऑप्शन्स आहेतच. तुमच्या बजेटप्रमाणे या गिफ्ट्सच सिलेक्शन तुम्ही करू शकता. एखादी मूर्ती जी होम डेकोरसाठी छान आणि शुभ असेल तीही निवडू शकता.

मिठाई Sweets

सणावाराच्या निमित्ताने मिठाई एकमेकांना भेट देणं हे आपल्याकडे होतंच. मग ते दिवाळी असो वा गणपती असो. सध्याच्या परिस्थितीमुळे आता तुम्हाला गिफ्ट म्हणून नातेवाईकांकडे मिठाई बॉक्सचा पर्याय निवडावा लागेल. कारण स्वतः जाऊन भेट घेणं तर दूरच राहिलं आहे. मिठाई आजकाल बरेच पर्याय पाहायला मिळतात. तुम्ही तुमच्या आवडीने त्यापैकी एक निवडू शकता. फूड डेलीव्हरी एप्सचा वापर तुम्हाला यासाठी करता येईल.

सुकामेवा Dryfruits

सुकामेवा हा आरोग्यासाठी नेहमीच चांगला असतो. त्यामुळे या नववर्षाला आरोग्यदायी भेट म्हणून सुकामेवा तुम्ही तुमच्या जवळच्यांना देऊ शकता. सुकामेव्यामध्ये अनेक प्रकारच्या हँपरचे पर्याय तुम्हाला मिळतील.

गिफ्ट कार्ड्स Gift Cards

जर तुम्हाला सणाच्या निमित्ताने गिफ्ट तर द्यायचं आहे पण काय द्यावं किंवा समोरच्याला नक्की काय आवडेल. याचा अंदाज नसेल तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे तो गिफ्ट कार्ड्सचा. तुमच्या बजेटप्रमाणे गिफ्ट कार्डची रक्क्म निवडा आणि समोरच्याला भेट द्या. ते त्यांच्या आवडीनुसार हवं ते गिफ्ट घेऊ शकतील. आजकाल तर कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स सगळ्याची गिफ्ट कार्ड्स आणि कूपन्स मिळतात. तरूणाईसाठी तर आयट्यून गिफ्ट कार्ड्स, गेमिंग स्टोर गिफ्ट कूपन्सचं ऑप्शनही उपलब्ध आहे.

ADVERTISEMENT

चॉकलेट्स Choclates

जेव्हा आपल्याला समोरच्यांना काय गिफ्ट द्यायचं हे समजत नसेल तर तेव्हा सर्वात सोपा पर्याय म्हणजे चॉकलेट्स. चॉकलेट्स बहुतेक सर्वांना आवडतातच. चॉकलेटमध्ये आजकाल शुगरफ्री चॉकलेट्सचा पर्यायही उपलब्ध असल्याने तुम्ही तीही गिफ्ट म्हणून देऊ शकता.

ग्रिटींग्ज आणि फुल Greetings and Flowers

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा फक्त मोबाईल किंवा एसएमएसद्वारे तुम्हाला द्यायच्या नसल्यास तुम्ही ग्रीटींग किंवा फुलांचा बुके तुमच्या जवळच्यांना पाठवू शकता. ऑनलाईन आजकाल ग्रीटींग किंवा फुले पाठवण्यासाठी अनेक गिफ्टींग वेबसाईट्स आहेत.

मग यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने हा पर्याय तुम्हीही नक्की निवडा आणि आपल्या जवळच्यांना अशी अनोखी भेट नक्की द्या.

06 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT