नवजात बाळाचा जन्म हा पालकांच्या जीवनामधील सर्वात आनंदी व उत्साहवर्धक क्षण असतो. नवजात बाळासोबत जीवन भावनिकदृष्ट्या व भौतिकदृष्ट्या आनंदमय होऊन जाते. पालकांच्या वेळापत्रकामध्ये बदल होतो आणि सर्वजण बाळाची आपुलकीने काळजी घेतात. स्थिर गतीने बाळांना नित्यक्रमामध्ये आणल्याने त्यांच्यासोबत पालकांना देखील मदत होते आणि ही गोष्ट बाळाच्या नैसर्गिक गरजांना जाणून घेत सुलभपणे साध्य करता येऊ शकते. याबाबत अधिक माहिती दिली आहे मॉम-इन-चिफच्या,संस्थापक, सुपरबॉटम्स,पल्लवी उटगी यांनी. बाळांना नित्यक्रमामध्ये आणू शकतील अशा काही गोष्टी पुढीलप्रमाणे:
अधिक वाचा – नवजात बाळांसाठी कांगारू केयरचे महत्त्व
झोप येण्यासाठी बाळाला स्वॅडलिंग करणे (कपड्यामध्ये बांधणे)
नुकतेच जन्माला आलेले बाळ आईचा गर्भ व उबदारपणाला चुकवते आणि बाहेरील नवीन विश्वामध्ये उबदारपणाचा शोध घेते. स्वॅडलिंग तंत्र नवजात बाळाला गर्भामध्ये मिळणारा उबदारपणा व आराम मिळण्यास मदत करते. स्वॅडलची निवड करताना मलमल सारख्या कापडाची निवड करा, जे अत्यंत कोमल व श्वास घेण्यास अनुकूल आहे. ते उपडी होण्यास सुरूवात करत नाही तोपर्यंत त्यांच्या सर्व वेळच्या झोपेदरम्यान स्वॅडलिंग करू शकता.
आरोग्यदायी डायपर-मुक्त नित्यक्रमाची निवड करा
आपल्यासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये दिवसातून किमान काही वेळ बाळांना डायपर्सपासून मुक्त ठेवणे आणि त्वचा कोमल राहण्यासाठी लंगोट/नॅपीज लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बाळ जागे असताना व खेळताना असे करणे उत्तम आहे. पॅडिंग व कोरडे असलेले लंगोट निवडा, ज्यामुळे बाळांना डायपर-मुक्त असताना आरामदायी वाटेल.
अधिक वाचा – नवजात बाळाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स
दिवसा हलके, श्वास घेण्यास अनुकूल कपडे
हवामानानुसार बाळाला कपडे घाला. ते बाळासाठी वजनाने हलके व आरामदायी असले पाहिजेत. दिवसा तापमान गरम असल्यामुळे बाळाला मलमल सारखे कोमल व श्वास घेण्यास अनुकूल असे झबले / हलके टी-शर्टस् घाला. बाळाला सकाळी लवकर व सायंकाळच्या वेळी सूर्यप्रकाशात घेऊन जा, ज्यामुळे त्यांना जीवनसत्त्व ड मिळेल.
बाळामध्ये इतर प्रकाश व दिवसा असलेल्या प्रकाशासंदर्भातील भावना निर्माण करा
खोलीमधील प्रकाशावर नियंत्रण ठेवत तुम्ही नवजात बाळाला दिवसा, रात्री व झोपेच्या वेळी असणा-या प्रकाशाची संकल्पना समजण्यामध्ये मदत करू शकता. सकाळच्या वेळी खिडक्यांवरील पडदे उघडा आणि बाळावर सूर्यप्रकाश पडू द्या. रात्री बाळाच्या झोपेच्या वेळी खोलीमधील प्रकाश मंद करा, अंगाई गीत गा आणि त्यांच्यासाठी आरामदायी व शांतमय झोपेचे वातावरण निर्माण करा.
अधिक वाचा – आईच्या दुधामुळे नवजात बालकांना मिळते परिपूर्ण सुदृढ सुरुवात
झोपण्यापूर्वी बाळाला फ्रेश डायपर लावा
रात्रीच्या वेळी बाळाला उबदार पाण्यामध्ये आंघोळ करून फ्रेश कपडे व फ्रेश डायपर लावण्याच्या नित्यक्रमामुळे बाळाला झोपेसाठी आरोग्यदायी वातावारण निर्माण होईल. बाळासाठी कापडी डायपरचा वापर करत असलात तर रात्रीच्या वेळी ते बदला, ज्यामुळे डायपर फ्रेश राहून रात्रभर ओलावा शोषून घेईल आणि बाळाला कोणत्याही त्रासाशिवाय उत्तम व पुरेशी झोप मिळेल.
तान्ह्या बाळांना नित्यक्रम आवडतो आणि शक्यतो आपण बाळांना शांत व आनंदी ठेवण्यासाठी त्यांच्या नित्यक्रमाचे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पालक म्हणून बाळाची काळजी घेताना दोघांनाही आरामदायी भावना मिळते. बाळांची वाढ होत असताना त्यांचा नित्यक्रम कमी कालावधीसाठी बदलतो, पण मुलभूत नित्यक्रमाची काळजी घेतल्याने त्या काळातही मदत होते. तसंच मुलभूत काळजी घेतली गेली की, बाळदेखील आनंदी राहते आणि बाळ आनंदी राहिल्याने त्याच्या पालकांनाही तितकाच आराम मिळतो.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक