हिवाळा सुरू होताच घरोघरी गूळ घातलेला मस्त गरम गरम चहा बनवला जातो. चहाचं आणि हिवाळ्याचं एक निराळं नातं आहे. कारण हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी चहाचा चांगला आधार मिळतो. पण एवढंच नाही. हिवाळ्यात गुळाचा चहा पिणे हे एखाद्या एनर्जी बुस्टरपेक्षा नक्कीच कमी नाही. कारण साखरेपेक्षा गूळ आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गुळाचा चहा पिण्याचे फायदे (Gulacha Chaha Che Fayde) नक्कीच आहेत. गूळ खाणे हिवाळ्यात हिताचे असते कारण गुळ उष्ण असतो. शिवाय गुळात व्हिटॅमिन्स, लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम असे अनेक पोषक गुणधर्म असतात. यासाठी गूळाचे अनेक फायदे आहेत (Jaggery Benefits In Day To Day Life) यासोबतच जाणून घ्या गुळाच्या चहाचे फायदे (Benefits Of Jaggery Tea In Marathi ) आणि गुळाचा चहा बनवण्याची पद्धत (Jaggery Tea Recipe In Marathi).
गूळात अनेक प्रकारचे पोषक घटक असल्यामुळे गूळ खाणे अथवा गुळाचा चहा पिणे आरोग्यासाठी नक्कीच लाभदायक आहे. यासाठी जाणून घ्या गुळाच्या चहाचे फायदे
गुळामध्ये इतर पोषकमुल्यांसोबत झिंक आणि सेलेनियमही भरपूर असते. ज्यामुळे तुमचे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते. आजकाल प्रतिकार शक्ती मजबूत करण्याची खूप गरज आहे. कारण बाहेरील वातावरण चिंताजनक आणि निराशाजनक झालेले आहे. अशा काळात स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा उत्तम उपाय म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवणारे पदार्थ आहारात वाढवणे. गुळामुळे प्रतिकार शक्ती वाढत असल्यामुळे तुम्ही नियमित गुळाचा चहा यासाठी नक्कीच पिऊ शकता. यासाठी वाचा प्रतिकार शक्ती कमी आहे हे ओळखण्याची लक्षणे (Signs Of A Weak Immune System In Marathi).
हिवाळा सुरू झाला की जीवजंतूच्या पोषणासाठी चांगले वातावरण निर्माण होते. ज्याचा परिणाम तुम्हाला सर्दी, खोकला अथवा तापाचे इनफेक्शन होण्याचा धोका वाढतो. मात्र गूळ हा यावर एक उत्तम घरगुती उपाय आहे. कारण गुळात उष्णता आणि इतर पोषक घटक सर्दी, खोकला दूर करण्यास मदत करतात. यासाठीच या काळात गुळाचा चहा घेतला जातो. तसंच अनेक घरगुती उपायांमध्ये गुळाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. गुळामुळे तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने या आजारपणांना तोंड देणे सोपे जाते.
आजकाल वाढते वजन ही खूप मोठी समस्या झालेली आहे. चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि तुमचे वजन अनियंत्रित होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्हाला गोड पदार्थ आणि साखरेचे पदार्थ आहारातून कमी करावे लागतात. मात्र गुळ साखरेच्या मानाने शरीरासाठी उत्तम असल्यामुळे तुम्ही चहा अथवा इतर गोड पदार्थांमध्ये त्याचा वापर करू शकता. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात गुळाचा चहा नक्कीच समाविष्ट करू शकता. ज्यामुळे तुम्हाला गोडही खाता येईल आणि वजनही कमी होईल.
आहारात झालेले बदल तुमच्या शरीरावर कळत नकळत परिणाम करत असतात. जर तुमची पचनशक्ती कमजोर असेल तर त्यामुळे तुमच्या सतत पोटात दुखते अथवा पोट साफ होत नाही. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे इतर आजार वाढू लागतात. मात्र जर तुम्ही नियमित गुळाचा वापर आहारात केला तर तुमची पचनशक्ती मजबूत होण्यास मदत होते. यासाठी गुळाचा चहा घेणं फायद्याचं ठरेल.
गुळामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते. रक्त अशुद्ध असेल तर अनेक आजारपणे मागे लागू शकतात. यासाठी नैसर्गिक पद्धतीने रक्त शुद्ध ठेवण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. याचा तुमच्या आरोग्याप्रमाणेच त्वचा आणि केसांवरही चांगला परिणाम होतो. यासाठीच नियमित गूळ खाण्याचा अथवा गुळाचा चहा पिण्याचा सल्ला दिला जातो.
हिवाळा आला की थंडीमुळे शरीरातील तापमान थंड पडू लागते. ज्यामुळे थंडी वाजते आणि सर्दी, खोकला, ताप असे आजार होतात. निरोगी राहण्यासाठी या काळात शरीराला पुरेशी ऊर्जा आणि तापमान मिळायला हवे. गुळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. शिवाय गूळ उष्ण गुणधर्माचा आहे. त्यामुळे गूळ खाणे हिवाळ्यात शरीराराठी नक्कीच चांगले ठरते. यासाठीच हिवाळ्यात गुळापासून बनवलेले विविध पदार्थ तसेच गुळाचा चहा आवर्जून सेवन केला जातो. ज्यामुळे शरीर उष्ण राहते आणि थंडीपासून तुमचा बचाव होतो.
तुमच्या नेहमीच्या चहामध्ये जेव्हा तुम्ही गूळ मिसळता तेव्हा त्या चहाचे पोषणमुल्य दसपटीने वाढते. कारण गुळात भरपूर प्रमाणात अॅंटि ऑस्किडंट आहेत जे गुळाच्या चहातून तुमच्या शरीरात जातात. शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. अॅंटि ऑस्किडंट तुमच्या आरोग्याप्रमाणेच त्वचा आणि केसांसाठी उत्तम असतात.यामुळे तुमच्या शरीराचे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते.यासाठीच नेहमी गुळाचा चहा प्यायला हवा.
अॅनिमिया अथवा अशक्तपणा असलेल्या लोकांना शरीरात लोह वाढण्याची गरज असते. कारण हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे अशक्तपणा वाढतो. लोह हा हिमोग्लोबिनचा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्यामुळे रक्तपेशींना शरीरातील विविध भागांमध्ये ऑक्सिजनचा पूरवठा करता येतो. गुळामुळे शरीराला पुरेसे लोह मिळते. यासाठी जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल अथवा सतत थकल्यासारखे वाटत असेल तर नियमित गुळाचा चहा प्या. यासोबतच वाचा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय (How To Increase Hemoglobin In Marathi).
गूळाचा चहा बनवण्याची पद्धत वेगळी आहे. गुळाचा चहा बनवण्याची रेसिपी फॉलो करणं यासाठी गरजेची आहे कारण साखरेप्रमाणे गुळाचा चहा बनवला जात नाही. त्यामुळे ही पद्धत नीट वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसारच गुळाचा चहा बनवा.
साहित्य –
गूळाचा चहा करण्याची पद्धत –
एका चहाच्या भांड्यात पाणी उकळत ठेवा. त्यात कुटलेली वेलची आणि किसलेले आले टाका. पाण्याला उकळ आली की चहा पावडर टाका. चहा उकळल्यावर त्यात दूध मिसळा. चहाचे भांडे गॅसवरून उतरण्याआधी आवडीनुसार गूळ पावडर मिसळा. लक्षात ठेवा चहा उकळताना अथवा दूध उकळताना गूळ पावडर टाकू नका. नाहीतर त्यामुळे दूध फाटून चहा खराब होऊ शकतो. चहा कपमध्ये ओतल्यावरही तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ पावडर त्यामध्ये मिसळू शकता.
गुळाचा चहा वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी योग्य असतो. त्यामुळे चहाप्रेमी साखरेऐवजी गुळाचा चहा पिऊ शकतात. मात्र मधुमेही, आमवात असणाऱ्या गुळाचा चहा पिऊ नये.
गुळाचा चहा आरोग्यासाठी चांगला असतो. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढत नाही. मात्र गूळ उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे तो अतिप्रमाणात पोटात जाणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी चहा आवडतो म्हणून सतत गुळाचा चहा पिणे टाळावे.
गुळाचा चहा बनवताना पाणी आणि दूध उकळताना त्यामध्ये गूळ अथवा गूळ पावडर मिसळू नये. असं केल्यास तुमचा चहा फाटून खराब होऊ शकतो. यासाठी गॅसवरून चहा खाली उतरल्यावर वरून गूळ अथवा गूळ पावडर चहामध्ये मिसळा.