लाईफस्टाईल

Happy Guru Purnima Quotes, Message, Status In Marathi – गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Leenal GawadeLeenal Gawade  |  Jun 8, 2021
Guru Purnima Quotes In Marathi

‘गुरुने दिला ज्ञानरुपी वसा… आम्ही चालवू हा पुढे वारसा’ गुरुचे अस्तित्व प्रत्येकाच्या आयुष्यात दिशादर्शकाचे काम करते. आई ही सगळ्यांचीच सर्वप्रथम गुरु. तिच्याकडूनच लहानपणी अनेक गोष्टींचे बाळकडू पाजले जाते. समाजात वावरण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचे ज्ञान ही आईरुपी गुरु आपल्याला देते. त्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शक रुपाने आपल्याला वेगवेगळ्या गुरुंचे मार्गदर्शन लाभते. अशा या गुरुंना वंदण्यासाठी त्यांनी दिलेल्या ज्ञानाचे ऋण व्यक्त करण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ साजरी केली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. भारतात फार पुरातन काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे म्हणतात. गुरुपौर्णिमेची संपूर्ण माहिती शाळेत अनेकांना दिली जाते. या खास दिवशी तुमच्या गुरुंना तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (happy guru purnima quotes in marathi), गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश (guru purnima message in marathi), गुरूपौर्णिमा स्टेटस (guru purnima status in marathi), गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा (guru purnima wishes in marathi) पाठवून तुम्ही तुमच्या गुरुंना तुमचे त्यांच्या जीवनातील स्थान दाखवून देण्यासाठी आम्ही काही खास शुभेच्छा संदेश निवडले आहेत. जे तुम्ही तुमच्या आयुष्यातील सगळ्या गुरुंना पाठवू शकता.

गुरुपौर्णिमेसाठी सुविचार (Guru Purnima Quotes In Marathi)

Guru Purnima Quotes In Marathi

Guru Purnima Quotes In Marathi

काही विचार हे आपल्याला प्रेरित करतात. गुरुपौर्णिमेच्या या दिवशी तुम्ही गुरुपौर्णिमा कोट्स मराठी (Guru Purnima Marathi Quotes) पाठवा आणि आपल्या गुरुंचे ऋण शब्दातून व्यक्त करा.

 • जो बनवतो प्रत्येकाला मानव,
  जो करतो खऱ्या-खोट्याची ओळख,
  देशाच्या अशा निर्मात्यांना आमचा कोटी-कोटी प्रणाम!
 • ज्याच्या मनात गुरुंविषयी सन्मान असतो,
  त्यांच्या पायाशी सारे जग असते, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • जेव्हा सगळे रस्ते बंद पडतात, तेव्हा नवा रस्ता दाखवतो गुरु,
  पुस्तकांमधील ज्ञान नाही तर आयुष्याचा पाठ पढवतात गुरु,
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • तोच गुरु श्रेष्ठ ज्याच्या प्रेरणेने,
  एखाद्याचे चरित्र बदलते,
  मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीत
  रंगत बदलते, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 • ज्ञान, संस्कार, मार्गदर्शन यांसारख्या गोष्टीतून
  ज्यांनी केला आपल्या शिष्यावर खोलवर परिणाम
  ज्यांनी आपल्याकडील विद्या नि:स्वार्थ अपर्ण केली
  अशा गुरुंना माझ्या कोटी कोटी प्रणाम!
 • गुरु आहे सावली, गुरु आहे आधार
  गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार,
  गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात,
  शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात,गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • गुरु दाखवतात यशाचा मार्ग,या मार्गावर चालून मिळवा
  यश संपन्न आयुष्य, अशा माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
  देता आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट,
  घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञान, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा! – ग.दि. माडगुळकर
 • होते गुरु म्हणून आयुष्याला आले कळून
  चांगले होण्यासाठी सोबत हवा नेहमीच एक गुरु
 • गुरुचा भेदभाव करु नका,
  गुरुपासून दूर राहू नका,
  गुरुविना माणूस हा डोळ्यातून वाहणार
  पाणी आहे, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • सर्वोत्कृष्ट गुरु हा पुस्तकातून नव्हे तर मनापासून शिकवतात, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • एखादा गुरु हा मेणबत्तीसारखा असतो, जो इतरांचा मार्ग प्रकाशण्यासाठी स्वत: जळत राहतो
 • गुरुचा उद्देश्य स्वत:च्या  प्रतिमेमध्ये शिष्य निर्माण करु शिकणाऱ्या शिष्याचा विकार करणे
 • गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा,
  गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य
  गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती,
  गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य
  गुरु म्हणजे आदर्श आणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतिक
  आपणा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!

जीवन जगताना मानसिक समाधान देतील हे आध्यात्मिक सुविचार

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (Guru Purnima Wishes In Marathi)

Guru Purnima Wishes In Marathi

Guru Purnima Wishes In Marathi

आपल्या गुरुंवरील जसे गौतम बुद्ध यांना अनेक जण गुरूस्थानी मानतात आणि बुद्धपौर्णिमेसाठी शुभेच्छा पाठवून गुरूंवरील प्रेम व्यक्त करतात. तसंच टीचर्स डे ला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतात. आम्ही गुरूस्थानी असणाऱ्यांना पाठवण्यासाठी खास गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा तुमच्यासाठी निवडून संकलित केल्या आहेत. 

 • गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे,
  ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • अक्षर ज्ञान नाही, तर गुरुने शिकवले जीवनाचे ज्ञान,
  गुरुमंत्र आत्मसात केला, तर भवसागर ही कराल पार, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • आई-वडिलांनी जन्म दिला, पण गुरुने शिकवली जगण्याची कला,
  ज्ञान, चरित्र आणि संस्कारांची शिकवण आम्हाला मिळाली आहे,
  अशा आमच्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • आधी गुरुसी वंदावे,
  मग साधन साधावे,
  गुरु म्हणजे माय बापं
  नाम घेता हरतील पापं,
  गुरुपौर्णिेमेच्या शुभेच्छा!
 • शांतिचा पाठ पठवून, अज्ञानाचा मिटवला अंध:कार,
  गुरुने शिकवले आम्हाला, कसा मिळवावा रागावर प्रेमाचा विजय,
  अशा माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • विनयफलं सुश्रूषा गुरुसुश्रूषाफलं श्रूतं ज्ञानम|
  ज्ञानस्य फलं विरति: विरति फलं चाश्रवनिरोध:|
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण,
  लाख रुपये कमावून सुद्धा, तुम्ही आहात त्याहून अनमोल,
  गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 • आई माझी गुरु, आई माझी कल्पतरु,
  माझ्या प्रिय आईला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,
  शहाणे करुन सोडी, सकळं जना,
  तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • गुरुविण कोण दाखविल
  वाट हा आयुष्याचा पथ हा दुर्गम,
  अवघड डोंगर घाट, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • योग्य काय अयोग्य काय ते तुम्ही शिकवता,
  खोटे काय खरे काय ते नीट समजावता,
  जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता,
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • गुरु म्हणजे परिस आणि शिष्य म्हणजे लोखंड,
  लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना,
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • गुरु  आणि शिष्य जगात दोनच वर्ण,
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • हिऱ्याला पैलू पाडतो तो गुरु,
  जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु,
  जीवनातला खरा आनंद  शोधायला शिकवतो  तो गुरु,
  आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश (Guru Purnima Message In Marathi)

Guru Purnima Message In Marathi

Guru Purnima Message In Marathi

गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही काही खास संदेश शोधत असाल तर तुमचा शोध थांबवा कारण मेसेज स्वरुपात पाठवता येतील असे खास गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश खास तुमच्यासाठी निवडले आहेत.

 •   ज्यांनी मला घडवलं या
  जगात लढायला शिकवलं, जगायला शिकवलं,
  अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे,
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 •  गुरु जगाची माऊली, सुखाची सावली,
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • आई वडील प्रथम गुरु,
  त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरु,
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास देणाऱ्या
  विश्वातील सर्व गुरुंना वंदना
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • गुरु हा संतकुळीचा राजा,
  गुरु हा प्राणविसावा माझा,
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • होतो गुरु चरणाचे दर्शन,
  मिळे आनंदाचे अंदन,
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा,
  आणि एकच चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा,
  गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
 • गुरु आहेत सगळ्यात महान,
  जे देतात सगळ्यांना ज्ञान,
  या गुरुपौर्णिमेला करुया त्यांना प्रणाम
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • गुरुने दिला ज्ञानरुपी वसा,
  आम्ही चालवू हा पुढे वारसा,
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • गुरुशिवाय ज्ञान नाही,
  ज्ञानशिवाय आत्मा नाही,
  ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म,
  सगळी आहे गुरुची देन,
  शुभ गुरु पौर्णिमा!
 • तुजविण न मिळे ज्ञान, ज्ञानविण जगी न होई सन्मान,
  जीवन भवसागर तराया, चला वंदुया गुरुराया,
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा! 
 • सतत पाठीराख्या राहणाऱ्या
  ज्वलंत ज्योतिसारख्या तेवणाऱ्या
  आणि अचूक मार्गदर्शन करणाऱ्या
  गुरुला वंदन करतो,
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड
  ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान,
  गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा,
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • शिकवता शिकवत आपणास आकाशाला
  गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे
  आपले शिक्षक.. माझ्या सगळ्या शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो,
  कारण माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो,
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरूपौर्णिमा स्टेटस (Guru Purnima Status In Marathi)

Guru Purnima Status In Marathi

Guru Purnima Status In Marathi

सगळ्यांनाच मेसेज करणं शक्य नसेल किंवा घाई गडबडीत एखाद्याचे नाव आपल्या लक्षात राहिले नाही तर आपल्या गुरुला शुभेच्छा पोहोचणार नाही. अशावेळी तुमचे स्टेटस हे तुमच्या सगळ्या गुरुंपर्यंत पोहोचवण्यासाठी फारच उत्तम आहेत. म्हणूनच काही निवड गुरुपौर्णिमा स्टेटस

 • आज गुरुचरणी ठेवूनी माथा वंदितो मी तुम्हा, सदा असू द्या आशीर्वाद तुमचा
 • गुरुंनी घडवले मला म्हणून मिळाली आयुष्याला दिशा, गुरुचरणी त्या नमन माझा
 • तुमच्या शिकवणीमुळेच मला मिळाली योग्य दिशा, सदैव तुमचा हात पाठीशी हवा
 • गुरुचा आशीर्वाद,गुरुचा सहवास,
  गुरुंच्या चरणी अश प्रार्थना की जगाचा विकास व्हावा,
  तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • गुरु तू मनाचा,
  गुरु तू जीवनाचा
  हिंमत जगायला दिली,
  म्हणून अर्थ लागला जीवनाला,
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • गुरु ही यशाची पहिली आणि शेवटची किल्ली,गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • गुरुविना मार्ग नाही, गुरु विना ज्ञान नाही, गुरुविना माझे अस्तित्वच नाही,गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • गुरु ज्ञानाचे मंदिर
  गुरु आत्मा परमेश्वर,
  गुरु जीवनाचा आधार,
  गुरु यशाचे द्वार,
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • गुरुंचा महिमा कसा वर्णावा
  शब्द पडती अपुरे तयासाठी
  किती केली पराकाष्ठा
  कमीच असे त्या गुरुंसाठी
  गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • गुरु माझ्या जीवनाचा आधार
  त्यांच्यामुळेच माझे स्वप्न झाले साकार,
  गुरुंच्या आज्ञेचा करु स्वीकार,
  त्यांच्या विना नाही जगण्याला आकार
 • वाईट काळात जो आधार बनतो,
  जगात तीच व्यक्ती आपली असते,
  लोकांना इतरांवर प्रेम असते,
  पण आमच्यासाठी आमचा गुरुच श्रेष्ठ आहे, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • गुरु ज्ञानाचा वृश्र अगाध,
  सावलीत सुगंध संस्कारांना,
  शब्दात कशी वर्णू महिमा,
  नतमस्तक मी सर्व गुरुवर्यांना,गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • चुका तर सगळेच त्यांच्या आयुष्यात करतात,
  पण त्या सुधारण्यासाठी आयुष्यात काही खास लोक असतात,
  तेच आपल्याला आयुष्याचा मार्ग दाखवणारे खरे गुरु असतात, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • रुजवले माझ्या मनात ज्याने संस्काराचे बीज,
  घडवली मूर्ती त्याने अशा गुरुला आज आपण वंदन करु, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
 • तु्म्ही दाखवली वाट ज्ञानाची,
  तुम्ही दाखवली वाट भक्तीची,
  तुम्ही दाखवली वाट मुक्तीची,
  गुरुमाऊली तुम्ही आम्हा सर्वांची, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

गुरूपौर्णिमा शायरी मराठी (Guru Purnima Shayari In Marathi)

Guru Purnima Shayari In Marathi

Guru Purnima Shayari In Marathi

गुरूंचे माहात्म्य सांगण्यासाठी अनेक वेळा शायरीही रचण्यात आली आहे. अशा गुरूंसाठी लिहीलेल्या शायरी (Guru Purnima Shayari In Marathi) तुमच्यासाठी शेअर करत आहोत. 

 • अक्षर हे फक्त ज्ञान नाही, गुरूने शिकवलं जीवन ज्ञान 
  गुरूमंत्र आत्मसात करा आणि भवसागर पार करा
  गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 
 • अक्षरं आपल्याला शिकवतात, शब्दांचा अर्थ सांगतात
  कधी प्रेमाने तर कधी ओरडून, जीवन जगणं शिकवतात
  हॅपी गुरूपौर्णिमा 
 • गुरूंचा महिना अपार आहे 
  गुरू उद्याचं अनुमान करतात 
  आणि शिष्याचं भविष्य घडवतात 
  गुरूपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
 • गुरूंच्या चरणी बसून, जीवन जाणा
  एकाग्र मनाने मिळेल ज्ञान
  चंचल मनाने मिळेल अज्ञान 
  गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा
 • गुरू आहे गंगा ज्ञानाची, करेल पापाचा नाश
  ब्रम्हा विष्णू महेश समान, तुटेल भाव पाश
  गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 • गुरू जणू पारस समान आहे 
  जो लोखंडाला सुवर्णात बदलतो
  शिष्य आणि गुरू जगात केवळ दोनच वर्ण आहेत 
  शुभ गुरू पौर्णिमा 
 • गुरूंचा महिमा अपरंपार 
  गुरूविन काय आहे शिष्याचा आधार 
  गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा 
 • संस्कारांच्या पायावर आहे गुरूची धार 
  नीर-क्षीर सम शिष्याने करावा आचार विचार 
  शुभ गुरू पौर्णिमा शुभेच्छा 
 • मातीपासून मूर्ती बनते, सद्गुरू फुंकती प्राण
  अपूर्णालाही करेल पूर्ण गुरू असा आहे महिमा
  गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
 • गुरूकडे भेदभाव ठेवू नका 
  गुरूंपासून राहू नका दूर
  कारण गुरूंशिवाय नाही पूर्ण जीवन
  गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा खूप खूप 

Read More – 

Guru Purnima in Hindi