ADVERTISEMENT
home / आपलं जग
शिक्षक दिन विशेष : आदर्श शिक्षकांमध्ये असतात हे गुण

शिक्षक दिन विशेष : आदर्श शिक्षकांमध्ये असतात हे गुण

सर्वात आधी आदरणीय डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना नमन ज्यांच्यामुळे शिक्षक दिन साजरा करण्यास सुरूवात झाली. ज्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आपल्या शिक्षक आणि गुरूवर्यांना देतो. ज्यांच्यामुळे शिक्षकांच्या पदाला एक वेगळी प्रतिभा आणि नवी परिभाषा मिळाली.

एका आदर्श शिक्षक तो असतो जो आपल्या शिक्षक पदासाठी स्वतःला समर्पित करतो. पाहूया आदर्श शिक्षकामध्ये खालील गुण असले पाहिजेत.

  • आदर्श शिक्षकाची शैक्षणिक योग्यता उत्तम असते. त्याची व्यावसायिक योग्यता पण श्रेष्ठ असते. त्याच व्यक्तित्व लोकांच्या हितासाठी असतं आणि आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण आत्मीयतेने वागतात. एका शिक्षकाला शैक्षणिक योग्यतेने परिपूर्ण असलं पाहिजे. कारण त्यांच्या शैक्षणिक योग्यतेवर त्यांचं ज्ञान निर्धारण अवलंबून असतं. त्यामुळे त्याच्या विषयातील संपूर्ण ज्ञान त्याला असलंच पाहिजे.
  • आदर्श शिक्षकाने आपल्या शिकवण्याच्या पदाला कधीही व्यावसायिक रूप देऊ नये. शिकवण्याप्रती आवड आणि पूर्ण निष्ठा असणे आवश्यक आहे. जर शिकवण्याला कमाईच साधन मानल्यास तो शिक्षक म्हणून योग्य ठरणार नाही.
  • प्रत्येक शिक्षक हा व्यवस्थित, शिस्तप्रिय आणि वेळेची किंमत असणारा असेल तर त्याला आदर्श म्हणणं योग्य ठरेल. कारण शाळेच्या प्रार्थनेतील उपस्थिती ते शाळा सुटेपर्यंत शिक्षक हे विद्यार्थ्यांसोबत असतात.
  • शिक्षकाने कुशल वक्ता असणं आवश्यक आहे. जो आपल्या मनातील गोष्ट विदयार्थ्यांपर्यंत योग्य आणि चांगल्या पद्धतीने पोचवू शकेल. योग्य शब्दांचा वापर करणंही अभिप्रेत असतं. कारण शिक्षकांना पाहूनच विद्यार्थी शिकत असतात आणि आचरणात आणत असतात.
  • आपल्या गोष्टी प्रवाहीपणे बोलण्यास शिक्षक समर्थ असणे गरजेचे आहे. जो लवकर लवकर पण बोलणार नाही आणि त्याची गोष्ट विद्यार्थ्यांना समजेल.
  • विद्यार्थ्यांप्रती प्रेम आणि सहानुभूती असण आवश्यक आहे. एका शिक्षकाचं काम फक्त शिकवण्यापुरतं मर्यादित नसून त्याला विद्यार्थ्यांबाबत आत्मीयता असणंही आवश्यक आहे. विद्यार्थी जे विचारतील त्याचं समाधानकारक उत्तर देणं, एखाद्या विद्यार्थ्याला काही खाजगी समस्या आल्यास ती जाणून घेणं व त्यावर तोडगा काढणं.
  • शिक्षकाच आरोग्य जर चांगलं असेल आणि तो मानसिकरित्या संयमी असेल तर तो विद्यार्थ्यांना चांगल शिकवू शकतो. कारण निरोगी शरीरातच निरोगी मेंदूचा निवास असतो. त्यामुळे शिक्षकाने शारीरिक आणि मानसिक रूपाने निरोगी असणं आवश्यक आहे.
  • एका चांगल्या शिक्षकामध्ये नेतृत्व शक्ती असली पाहिजे. त्याने आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीची जाण असली पाहिजे. एखाद्या विषयावरील चर्चा, शिस्त आणि विविध गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांना भाग घेण्यास त्याने प्रोत्साहन दिलं पाहिजे.
  • शिक्षकाने चारित्रिक रूपानेही दृढ असणं गरजेचं आहे. कारण शिक्षकांच्या चारित्र्याचा प्रभाव हा विद्यार्थ्यांवर पडत असतो. अध्यापकाने आपल्या विद्यार्थ्यांच्या समक्ष सदैव चांगल्या रूपात सादर व्हावे. कारण शिक्षकाच्या चुकीच्या किंवा अनैतिक आचरणाने विद्यार्थ्यांवर वाईट प्रभाव पडतो.
  • एक आदर्श शिक्षक म्हणून धैर्यवान असणंही गरजेचं आहे. मुलं शिकतात, हळूहळू शिकतात. त्यामुळे मुलांना काहीही शिकवताना ते प्रेमाने आणि हळूवारपणे शिकवता आले पाहिजे. कारण मुलं त्याच शिक्षकांना पसंत करतात जे त्यांच्यावर रागवत नाहीत आणि प्रेमाने त्यांना समजून घेतात.
  • शिक्षक जर खेळमेळीने वागणारे असले तर ते विद्यार्थ्यांमध्ये लगेच आवडीचे होतात. शिक्षण देताना थोडे हसू आणि थोडी शिस्त नक्कीच कामी येते. मुलांच्या प्रश्नांची उत्तर हसत आणि प्रेमाने देणं यामुळे मुलांची अभ्यासातील आवड नक्कीच वाढण्यास मदत होईल.
  • प्रत्येक शिक्षकांमध्ये आत्मसन्मान हा असलाच पाहिजे. एक चांगला आणि प्रभावशाली शिक्षक तोच असतो जो चुकीच्या गोष्टीपुढे झुकत नाही. खरेपणाने आपली बाजू मांडतो आणि आत्मसन्मान कायम राखतो.

एका शिक्षकाने नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी तत्पर असलं पाहिजे. कारण ज्ञान एक अशी गोष्ट आहे जी कधीही पूर्ण होत नाही. जर आपल्याला नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड असेल तर आपण आपल्या विद्यार्थ्यांनाही नवीन दुनियेशी जोडू शकाल. त्यामुळे जर तुम्ही शिक्षक बनू इच्छित असल्यास वरील गुण तुमच्यात नक्कीच असतील अशी आशा करतो.

03 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT