ADVERTISEMENT
home / Care
तेलकट स्काल्पसाठी असे असावे हेअर रुटीन (Hair Care For Oily Scalp In Marathi)

तेलकट स्काल्पसाठी असे असावे हेअर रुटीन (Hair Care For Oily Scalp In Marathi)

केसांच्या समस्येपैकी एक समस्या म्हणजे स्काल्प तेलकट होणे. जर तुमची स्काल्प तेलकट असेल तर केस गळणे, कोंडा होणे, केस तुटणे अशा अनेक समस्या होऊ लागतात.  शिवाय वातावरण बदलानुसार केसही वेगळे दिसू लागतात. तेलकट स्काल्प असलेले केस कधीच चांगले दिसत नाही. धुतल्यानंतर अवघ्या काहीच तासात ते पुन्हा चपटे दिसू लागतात. अशा केसांवर कोणतेही प्रयोग केले तर मग तर ते काही तासातच तेलकट होतात. असे केस कधीही सिल्की वाटत नाही. केस कितीही लांब असले तरी देखील ते अनाकर्षक दिसू लागतात. तुमचाही स्काल्प असाच तेलकट असेल तर तुम्ही केसांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.असा तेलकट स्काल्पसाठी केसाचे एक रुटीन आम्ही तयार केले आहे. ज्यामुळे तेलकट केसांच्या समस्या कमी होतील.

केसांसाठी उपयुक्त ठरते ऑलिव्ह ऑईल, जाणून घ्या फायदे (Olive Oil For Hair In Marathi)

सतत विंचरु नका केस

सतत विंचरु नका केस

Instagram

ADVERTISEMENT

केस मोठे असले की, ते सारखे विंचरले जात नाही. पण काही जणांना केस सतत विंचरण्याची सवय असते. तेलकट स्काल्प असणाऱ्यांसाठी ही सवय फारच घातक ठरते. कारण सतत केस विंचरल्यामुळे केसांच्या छिद्रांमधून सतत तेल झिरपत राहतं. त्यामुळे तुमचे केस चांगले विंचरले जातात हे खरे असले तरी केसांवर त्यामुळे सतत तेल येत राहते. त्यामुळे शक्यतो तुम्ही केस सतत विंचरु नका. दिवसातून दोन वेळा केस विंचरणे हे तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी पुरेसे आहे.

केसांना वापरा सल्फेट फ्री शॅम्पू

सल्फेट फ्री शॅम्पू

Instagram

शॅम्पूची निवड ही देखील केसांसाठी महत्वाची असते. केस तेलकट झालेत म्हणून सतत शॅम्पू करणेही योग्य नाही. त्यामुळे केसांच्या अन्य समस्या निर्माण होऊ शकतात. त्या ऐवजी जर तुम्ही योग्य शॅम्पू निवडला तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा होईल. शॅम्पूमध्ये असलेले तेलाचे घटक टाळा. कारण त्यामुळे केस मऊ होतात हे खरे असले तरी तुमच्या स्काल्पवर तेल अधिक साचते. त्यामुळे शॅम्पू हा केसांना स्वच्छ करेल आणि स्काल्प कोरडी करेल अशा घटकांनी युक्त असावा.

ADVERTISEMENT

एका रात्रीत होईल केसांमध्ये फरक, वापरा हा हेअरमास्क

केसांना हेअरस्टाईल टाळा

केसांना हेअरस्टाईल करायला प्रत्येक महिलेला आवडते. पण केसांची हेअरस्टाईल करण्यासाठी जर तुम्ही मशीन्सचा म्हणजेच हिटचा प्रयोग करत असाल तर असा प्रयोग करणे टाळा. कारण केसांना सतत गरमचा वापर झाल्यामुळे केसांवर एक प्रमाणे तेल साचते. केस चिकट दिसू लागतात. केसांची कितीही काळजी घेऊन जरी तुम्ही याचा उपयोग केला तरी देखील त्याच्या वापरामुळे हिट तयार होते आणि त्यामुळे केस लवकर तेलकट होतात. 

केसांना येऊ देऊ नका घाम

जर तुम्हाला घाम येत असेल तर असा घाम येणे तुमच्या केसांसाठी अजिबात चांगले नाही. केसांना घाम आल्यामुळेही केस सतत तेलकट होत राहतात. केसांवर हा घाम सारखा येत असेल तर तुम्ही तो घाम टिपून घ्या. केस मोकळे सोडून जितका घाम आला असेल तो सुकवून घ्या. घाम येत असेल आणि तुम्ही जर केस बांधून ठेवत असाल तर केस मोकळे करुन केस वाळवून घ्या. केस धुतल्यानंतरही असा घाम येतो. त्यामुळे हेअर ब्लो ड्राय करुन मगच तुम्ही केस विंचरा  म्हणजे केसांवर तेल येणार नाही.

कंडिशनर टाळा

कंडिशनर टाळा

ADVERTISEMENT

Instagram

शॅम्पूच्या वापरानंतर कंडिशनरचा वापर करणे हे केसांसाठी चांगले असले तरी देखील ज्यांचे स्काल्प तेलकट असेल अशांसाठी कंडिशनरचा वापर जास्त करणेही चांगले नाही. केसांसाठी जर तुम्ही प्रत्येक वॉशनंतर कंडिशनर वापरत असाल तर याचा वापर टाळा. महिन्यातून एकदा किंवा केस अगदीच कोरडे झाले असतील अशावेळी कंडिशनरचा वापर करा. अन्यथा केसांसाठी कंडिशनरचा वापर टाळा. 

अशा पद्धतीने स्काल्प तेलकट होऊ द्यायचा नसेल तर केसांची अश काळजी घ्या. 

जाणून घ्या केसांसाठी व्हिटॅमिन ट्रिटमेंट नक्की का केली जाते

ADVERTISEMENT
22 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT