ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
long and thick hair

वापरा देशी पद्धत आणि मिळवा घनदाट केस, एका आठवड्यात होतील केस जाड

केस पातळ आणि निस्तेज असतील तर नक्कीच चांगले दिसत नाहीत. पण यासाठी तुम्ही अनेक उपाय करूनही काहीही त्याचा चांगला परिणाम होत नसेल तर तुम्ही काही देशी पद्धती वापरायला हव्यात. एका आठवड्यात तुम्हाला मजबूत आणि जाड, घनदाट केस हवे असतील तर तुम्ही आम्ही सांगितलेल्या काही पद्धतीचा अवलंब नक्की करा. काही दिवसांमध्येच तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल. बाजारात मिळणाऱ्या अनेक क्रिम्स, तेलापेक्षा याचा नक्कीच योग्य परिणाम तुम्हाला केसांवर दिसून येईल आणि हे बनविण्यासाठी अर्थात तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळही लागत नाही. केवळ 2 गोष्टींचा वापर करून तुम्हाला हे तेल तयार करायचे आहे आणि याचे वैशिष्ट्य म्हणजे हे तेल ऑर्गेनिक असून याचा कोणताही दुष्परिणाम केसांवर वा त्वचेवर होत नाही. 

केसांचा पातळपणा कमी करण्यासाठी 

केसांचा पातळपणा कमी करून केस अधिक घनदाट आणि जाड बनविण्यासाठी तुम्हाला नक्कीच या मॅजिकल तेलाची आवश्यकता आहे. हे तयार करणे अत्यंत सोपे आणि त्यासाठी तुम्हाला केवळ 10 मिनिट्स लागणार असून तुम्ही 2-3 महिन्यासाठी एकदाच हे तेल तयार करून ठेऊ शकता. हे तेल तुम्ही स्टोअर करून ठेऊ शकता आणि हे पटकन खराबही होत नाही. 

साहित्य 

  • 1 लिटर मोहरीचे तेल
  • 1 लहान कप मेथीचे दाणे 

तेल तयार करण्याची पद्धत 

ADVERTISEMENT
  • हे मॅजिकल तेल तयार करण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एका भांड्यामध्ये मोहरीचे तेल आणि मेथीचे दाणे मिक्स करून ठेऊन द्या
  • दुसऱ्या दिवशी सकाळी या दोन्ही मिक्स करून ठेवलेल्या गोष्टी मंद आचेवर साधारण 5-7 मिनिट्स उकळून घ्या 
  • मेथीचे दाणे काळे व्हायला लागल्यावर आंच बंद करा आणि तेल थंड करायला ठेवा
  • तेल थंड झाल्यावर गाळून हे एका कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि मग याचा वापर करा
  • आजही सर्वात प्रभावी, सोपा आणि हर्बल उपाय म्हणून तुम्हाला या देशी पद्धतीचा वापर करता येतो. हे तेल अतिशय शुद्ध असून तुम्हाला मजबूत केस मिळवून देण्यास मदत करते 

अशा प्रकारे करा या तेलाचा वापर 

  • हा तेलाचा उपयोग करण्यासाठी तुम्ही रात्रीच या तेलाचा वापर होऊ शकेल असा प्रयत्न करा. रात्री हे तेल लावा आणि मुळापासून केसांचे मालिश करा आणि मग कंगव्याने केस विंचरून केस बांधा. सकाळी उठल्यावर तुम्ही केसांना माईल्ड शँपू लावा आणि केस धुवा. याचा परिणाम लवकरच दिसू लागेल
  • रात्री तुम्ही या तेलाचा उपयोग करू शकला नाहीत तर शँपू करण्याच्या साधारण 1-2 तास आधी केसांना हे तेल लावा आणि मालिश करा. नंतर शँपू करा. चांगल्या आणि परिणामकारक रिझल्टसाठी सुरूवातील तुम्ही आठवड्यातून साधारण 3 वेळा या तेलाचा वापर करावा. नंतर तुम्ही दुसऱ्या आठवड्यात याचा वापर दोनवेळा करू शकता. 

आठवड्यात दिसतो परिणाम 

hair
  • मोहरीच्या तेलामुळे केसांना विटामिन्स आणि लोह मिळते. तर मेथीच्या दाण्यांमुळे प्रोटीन, फॉस्फोरस आणि ओमेगा – 3 फॅटी अॅसिड प्राप्त होते. ही सर्व तत्व केसांना पोषण देण्यासाठी आणि केसांची दुरुस्ती करण्यासाठी उपयोगी ठरतात. त्यामुळेच आठवडाभरात केस घनदाट होण्यास मदत मिळते. 
  • जसे प्रोटीन केसांना मजबूती मिळवून देते त्याप्रमाणे केसांची चमक परत आणण्यासाठीही याचा फायदा होतो. मेथीमध्ये निकोटिनिक नावाचे अॅसिड असते, जे स्काल्पचे स्वच्छता करण्यासाठी आणि स्काल्प व्यवस्थित मॉईस्चराईज करण्यासाठीही उपयोग होतो. 

कोंड्याचाही होतो निचरा 

मेथीच्या दाण्याने आणि मोहरीच्या तेलाने मिळून तयार करण्यात आलेल्या या हेअर ऑईल (hair oil) च्या वापराने तुमच्या केसातील कोंड्याचा निचरा होतो. केसांचा कोरडेपणा, पातळ केस आणि निस्तेज असल्यामुळे कोंड्याची समस्या नेहमी केसांमध्ये निर्माण होते. यामुळे डोक्याच्या त्वचेला श्वास घेणेही कठीण होते. कोंडा म्हणजे एका स्वरूपाचा फंगस असतो, जो केसांना मुळापासून कमजोर करतो. मेथी आणि मोहरीच्या तेलामध्ये अँटिफंगल आणि अँटिबॅक्टेरियल घटक असतात, जे फंगस मारण्यास मदत करतात. त्यामुळे केसांना अधिक मजबूती मिळते आणि केस घनदाट होण्यास फायदा होतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

11 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT