ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
hair-mistakes-that-make-you-look-older-in-marathi

या चुकांमुळे केस होतात लवकर पांढरे, दिसू लागता म्हातारे

फेस फ्लॅटरिंग हेअरकट पासून ते अगदी ट्रेंडी स्टाईल आणि टाईमलेस कलरिंगपर्यंत अशा अनेक पद्धती आहेत ज्या तुम्ही सलॉनमध्ये जाऊन करून अधिक तरूण दिसू शकता. असं असूनही अनेक महिला आपल्या केसांची काळजी घेत नाहीत आणि त्यामुळे या होणाऱ्या चुका तुम्हाला लवकर म्हातारे दाखवतात. हो खरं आहे प्रिमॅच्युअर एजिंग (Premature Aging) ही एक साधारण समस्या आहे, जी अनेकदा महिलांना होत असते. त्वचेची काळजी असो अथवा केसांची काळजी असेल आपल्याला नेहमी याकडे लक्ष द्यायला हवे. आपण स्वतःची काळजी घेत नाही आणि अनेक उत्पादनांचा वापर करतो. त्यामुळेच केस वेळेआधी पांढरे होतात. काही कॉमन हेअर केअर चुका (Hair Care Mistakes) आहेत, ज्यामुळे आपले केस पांढरे होतात, याबाबत अधिक माहिती.  

डाय अथवा कलर्सचा वापर 

आपल्या केसांच्या बाबतीत आपण सर्वात मोठी चूक ही करतो की, पांढरे केस लपविण्यासाठी डाय अथवा हेअर कलर करणे सुरू करतो. केसांना कलर केल्याने अथवा डाय केल्याने केस अधिक कोरडे, निस्तेज होतात आणि अधिक खराब होतात. तसंच पहिल्यापेक्षा अधिक पांढरे होतात. 

गरजेपेक्षा जास्त उत्पादनांचा वापर 

आपण आपल्या केसांवर अनेक पद्धतीच्या शँपू, कंडिशनर आणि हेअर सीरमचा वापर करत असतो. पण आपल्याला कळतही नाही की आपण किती वेळा शँपू, कंडिशनर बदलले आहे. त्यामुळे असे विविध हेअर केअर उत्पादन वापरल्यानंतर केस खराब होतात. तुम्हाला काळजी घ्यायला हवी की, केसांना अधिक उत्पादने लाऊ नयेत. कारण केसांसाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांमुळे केसांमध्ये पांढरेपणा लवकर निर्माण होतो आणि केस तुटूही लागतात. 

हिटिंग उत्पादनांचा वापर 

केसांना ब्लो ड्राय करणे आणि त्यामध्ये अनेक पद्धतीचे ड्रायर्स आणि हिट प्रॉडक्टस हे स्टाईलिंगसाठी वापरण्यात येते. यामुळे केस लवकर पांढरे व्हायला सुरूवात होते. स्टायलिंग टूल्सचा वापर करण्यामुळे दुहेरी केसांची समस्या अधिक वाढते आणि केस अधिक कोरडे आणि निस्तेज ठरतात. त्यामुळे स्टायलिंग टूल्सचा वापर कमी करा आणि वापर करण्यापूर्वी केसांमध्ये तुम्ही चांगल्या दर्जाचे डीप कंडिशनिंग ट्रिटमेंटचा वापर करा. 

ADVERTISEMENT

हेअर केअर सप्लिमेंट्सचा वापर करू नका 

जसजसे आपले वय वाढते, तसतसा केसांमध्ये बदल दिसून येऊ लागतो. आपले डाएट आणि आपल्या लाईफस्टाईलमध्येही खूपच बदल होतात. ज्यामुळे बऱ्याचदा आपल्या केसांना अधिक सपोर्टची गरज भासते. बायोटिन आणि हेअर सप्लिमेंट्स आपल्या हेअर फॉलिकल्सना अधिक मजबूत करतात. पण याचा अधिक वापर करणे योग्य नाही. यामुळे केस लवकर पांढरे होतात. 

हायड्रेशनची कमतरता 

वाढत्या वयासह आपण सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे आपण आपल्या केसांचे टेक्स्चर आणि रंग विसरतो. कारण वयासह केस कोरडे होणे आणि केसांना हानी पोहचणे हे अत्यंत सामान्य आहे. त्यामुळे कोणत्याही उत्पादनांचा वापर करण्यापूर्वी हायड्रेशचे प्रमाण अधिक आहे की नाही अथवा केसांना नैसर्गिक तेल मिळू शकते की नाही याचा वापर व्हायला हवा. तसंच यामुळे आपल्या केसांचा कोरडेपणा दूर होतोय की नाही हेदेखील जाणून घ्यायला हवे. यामुळे केस लवकर पांढरे होत नाहीत. 

तुम्हीदेखील या चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा. वयापेक्षा लवकर मोठे दिसायचे नसेल आणि केस पांढरे दिसायला नको असतील तर तुम्ही नक्कीच हे वाचायला हवे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
06 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT