काही महिलांचे केस इतके कोरडे (Dry Hair) असतात की, त्यांच्या केसांवर कोणत्याही शँपू, क्रिम अथवा ब्युटी ट्रीटमेंटचा उपयोग होत नाही. त्यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या अथवा केसगळतीची समस्या जास्त प्रमाणात होताना दिसते. जन्मापासूनच केस कोरडे असतील तर त्यावर उपचार करून केसांमध्ये सुधारणा करता येऊ शकते. पण प्रदूषण आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे केस खराब होत असतील आणि केसांमध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी झाले असेल तर केस अधिक कोरडे होऊ लागतात. तुमच्या केसांना योग्य प्रमाणात प्रोटीन मिळायला हवं असेल तर तुम्ही बाजारातील उत्पादने वापरण्यापेक्षा घरातील उत्तम गोष्ट वापरावी. ती म्हणजे नारळाचे दूध. यामध्ये प्रोटीनचे चांगले प्रमाण असून मॉईस्चराईजिंग गुणही असतात ज्यामुळे केसातील कोरडेपणा दूर होण्यास मदत मिळते. याचा कसा उपयोग करावा आणि नारळाच्या दुधाने केसांना अधिक कसे पोषण मिळते ते आपण जाणून घेऊया.
कोकोनट मिल्क हेअर पॅक (Coconut Milk Hair Pack)
साहित्य
- 1 कप नारळाचे दूध
- 1 मोठा चमचा मध
- 1 मोठा चमचा ऑलिव्ह ऑईल
बनविण्याची पद्धत
- नारळाच्या दुधाचा हा हेअरपॅक घरीच तयार करता येतो. यासाठी तुम्ही एक ताजा नारळ घ्या आणि खोबऱ्याचे लहान लहान तुकडे करा आणि मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करा
- त्यानंतर त्यातून दूध काढून गाळून घ्या
- या नारळाच्या दुधात मध आणि ऑलिव्ह ऑईल व्यवस्थित मिक्स करा
- आता हे दूध तुम्ही स्काल्पपासून अगदी आतपर्यंत केसांना पूर्ण लावा
- अर्धा तास तसंच ठेवा आणि त्यानंतर केस धुवा
कसे लावावे हेअर पॅक (How to use hair mask)
- नारळाच्या दुधाचा हा हेअर पॅक लावायच्या आधी तुम्ही केस शँपूने व्यवस्थित धुवा आणि सुकवून घ्या
- त्यानंतर स्काल्पचा मसाज करत हे नारळाचे दूध तुम्ही लावायला सुरूवात करा
- त्यानंतर केसांच्या लांबीनुसार पूर्ण नारळाच्या दुधाचा हा हेअर पॅक लावा
- केस अधिक मोठे असतील तर तुम्ही साहित्य अधिक घ्या आणि मोठे केस तुम्ही त्या मिश्रणात बुडवा
- त्यानंतर केसांना शॉवर कॅप लावा
- अर्ध्या तासानंतर केस थंड पाण्याने धुवा
- आठवड्यातून कमीत कमी एक वेळा ही प्रोटीन ट्रिटमेंट तुम्ही करा. याचा तुम्हाला फायदा मिळेल
केसांसाठी कोकोनट मिल्क अर्थात नारळाच्या दुधाचे फायदे (Benefits of coconut milk for hair)
केसांचा कोरडेपणा दूर करण्यासह प्रोटीन ट्रिटमेंट म्हणून याचा उपयोग होतो. याशिवाय नारळाच्या दुधाचे अनेक फायदे आहेत
- केसांमधील गेलेली चमक परत आणण्यासाठीही नारळाच्या दुधाचा होतो उपयोग. केस अधिक चमकदार आणि मऊ मुलायम दिसून येतात
- तुम्हाला केसांमध्ये कोंड्याची समस्या असेल तर नारळाचे दूध वापरल्याने ही समस्या दूर होण्यास मदत मिळते
- तुमचे केस अगदीच पातळ असतील आणि तुम्हाला घनदाट केस हवे असतील तर तुम्ही घरगुती उपाय म्हणून नारळाच्या दुधाचा नियमित वापर करावा
नारळाच्या दुधाने केसांना कशाप्रकारे तुम्ही पोषण देऊ शकता हे आम्ही तुम्हाला सांगितले आहे. तुम्ही नक्कीच याचा वापर करून पाहा आणि आम्हाला कळवायला विसरू नका. अशाच टिप्स आणि माहिती मिळविण्यासाठी तुम्ही marathi.popxo.com वर नक्की क्लिक करा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक