ADVERTISEMENT
home / सौंदर्य
Hair Spa Benefits In Marathi | घरीच पार्लरप्रमाणे ‘हेअर स्पा’ कसा कराल

Hair Spa Benefits In Marathi | घरीच पार्लरप्रमाणे ‘हेअर स्पा’ कसा कराल

आजकाल जीवनशैलीतील बदल आणि वाढते प्रदूषण याचा विपरित परिणाम तुमच्या केसांवर दिसू लागतो. यामुळे तुमचे केस निस्तेज आणि कोरडे दिसू लागतात. नियमित ‘हेअर स्पा’ केल्याने तुमच्या केसांचे योग्य पोषण होते. मात्र यासाठी सतत पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ आणि पैसै दोन्ही गोष्टी खर्च करावे लागतात. कधी कधी पार्लरमध्ये केल्या जाणाऱ्या निरनिराळ्या हेअर ट्रिटमेंट (Hair Treatment) मुळे केसांमधील नैसर्गिक चमक कमी होऊ लागते. सतत पार्लरमध्ये अशा हेअर ट्रिटमेंट करण्यापेक्षा घरीच केसांची काळजी घेतल्यास केसांवर चांगला परिणाम दिसू शकतो. अगदी एखाद्या खास प्रसंगासाठी तुम्ही पार्लरमध्ये ‘हेअर-स्पा’ (Hair Spa) नक्कीच करू शकता. पण घरी नियमित केलेल्या हेअर स्पाचा तुम्हाला फायदाच होऊ शकतो.

हेअर स्पा चे फायदे
हेअर स्पा चे फायदे

हेअर स्पा म्हणजे नेमकं काय ?(What Is Hair Spa)

हेअर स्पा हा एक केसांवर केला जाणार असा उपचार आहे ज्यामुळे तुमच्या केसांना योग्य पोषण मिळतं. केसांना फ्रेश लुक देण्यासाठी आणि केसांच्या अनेक समस्या दूर ठेवण्यासाठी नियमित हेअर स्पा करणं फार गरजेचं आहे. हेअर स्पा मुळे केस तजेलदार आणि चमकदार दिसू लागतात. बऱ्याचजणी केस सुंदर दिसावेत यासाठी केसांना कलर करतात. मात्र केसांच्या आरोग्यासाठी हे केमिकलयुक्त हेअर कलर हानिकारक असतात. अनेकजणींना सतत निरनिराळा लुक हवा असतो. मग त्या मेकओव्हरसाठी नवनवीन हेअरस्टाईल करतात. यासाठी केसांवर वारंवार हेअर स्ट्रेटनर अथवा हेअर कर्लरचा वापर केला जातो. कधीतरी हेअरस्टाईल करण्यासाठी अशा प्रॉडक्टचा वापर करण्यास काहीच हरकत नाही. पण सतत असे स्टाईलिंग प्रॉडक्ट्स वापरल्याने तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे केसांचे नुकसान होऊ नये यासाठी नियमित केसांना हेअर स्पा करण्याची गरज असते. तुमचे केस कोणत्या प्रकारचे आहेत यावरून तुमच्या केसांवर कोणता हेअर स्पा करणं योग्य आहे ते ठरवावं लागतं. केसांचे योग्य पोषण करण्यासाठी घरीच हेअर स्पा करणं फार गरजेचं आहे.

Also Read About केसांची निगा राखण्यासाठी टिप्स

Hair Spa Information In Marathi
Hair Spa Information In Marathi

हेअर स्पा कसा कराल? (How To Do Hair Spa)

घरीच पार्लरप्रमाणे हेअर स्पा करता येऊ शकतो. यासाठी काही महत्वाच्या स्टेप्स लक्षात ठेवा ज्यामुळे तुम्हाला घरीच तुमच्या केसांचे पोषण करता येऊ शकेल. हेअर स्पा करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या केसांना शॅंम्पू करा. शॅंपूने केस स्वच्छ केल्यावर केसांवर हेअर मास्कच्या मदतीने दहा ते वीस मिनीटे मसाज करा. त्यानंतर केसांना पाच मिनीटे स्टीम देऊन केस काही मिनीटे झाकुन ठेवा. ज्यामुळे तुमच्या केसांमधील कोरडेपणा कमी होईल. काही मिनीटांनी केस पुन्हा स्वच्छ करा. ज्यामुळे तुमचे केस मऊ,मुलायम आणि चमकदार दिसू लागतील. एकदा हेअर स्पा केल्यावर लगेच तुमचे निस्तेज केस चमकदार दिसतील तर असे मुळीच नाही. चांगल्या परिणामासाठी तुम्हाला नियमित हेअर स्पा करणं गरजेचं आहे.

ADVERTISEMENT
हेअर स्पा कसा करायचा
हेअर स्पा कसा करायचा

Also Read Different Haircuts According to Face Shape In Marathi

हेअर स्पा चे फायदे (Benefits Of Hair Spa In Marathi)

नियमित हेअर स्पा करण्याचे खूप चांगले फायदे होतात.

1.हेअर स्पा केल्यामुळे तुमच्या केसांची योग्य वाढ होते. केसांच्या वाढीसोबतच तुमचे केस चमकदार आणि घनदाट दिसू लागतात.

2. केस वरून चांगले दिसत असले तरी त्यांच्या मुळांमध्ये अस्वच्छता असू शकते. मात्र हेअर स्पा केल्यामुळे तुमच्या केसांची मुळे स्वच्छ होतात.

ADVERTISEMENT

3. आजकाल अनेकींना केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या सतावत असते. हेअर स्पा मुळे तुमच्या केसांची त्वचा कंडीशनर होते. केसांमधील धुळ आणि प्रदूषण कमी झाल्यामुळे कोंडा होण्याची समस्याही हळूहळू कमी होते.

4. तरूण मुलींमध्ये केस गळण्याची समस्या देखील फार मोठ्या प्रमाणावर दिसून येते. नियमित हेअर स्पा केल्यामुळे तुमचे केस कमी गळू लागतात.

5.नियमित हेअर स्पा केल्यामुळे केसांना ऑक्सिजनचा पुरवठा होतो. ज्यामुळे केस हायड्रेट राहतात. हेअर स्पा मुळे केस मऊ आणि मुलायम होतात.

6. जर तुम्ही वारंवार केस ट्रिम करता पण तरीही तुमच्या केसांना फाटे फुटत असतील तर तुमच्या केसांना हेअप स्पाची गरज आहे. कारण हेअर स्पा मुळे तुमचे केस कोरडे पडत नाहीत त्यामुळे त्यांना फाटे फुटण्याची समस्या कमी होते.

ADVERTISEMENT

7. तुम्ही योग्य आहार नाही घेतला तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या केसांवर दिसू लागतो. मऊ आणि तजेलदार केस हवे असतील तर संतुलित आहार घ्या आणि नियमित हेअर स्पा करा.

8. जर तुम्ही केस धुतल्यावरही तुमचे केस तेलकट दिसत असतील तर तुमच्या केसांमधील तेलाचे योग्य नियंत्रण करणं गरजेचं आहे. यासाठी हेअर स्पा एक उत्तम उपाय असू शकतो.

9.  जर तुम्ही दगदग झाल्याने अथवा थकवा आल्याने तणावग्रस्त झाला असाल तर हेअर स्पा अवश्य करा. कारण हेअर स्पा करताना केसा जाणारा हेअर मसाज तुमच्यासाठी अगदी वरदान ठरू शकतो. या हेअर मसाजमुळे तुमच्या

केसांच्या मुळांमधील रक्ताभिसरण चांगले होते. ज्यामुळे त्वरीत फ्रेश दिसू लागता.

ADVERTISEMENT

10. पहिल्यांदा  हेअर स्पा केल्यावर त्याचा परिणाम लगेच दिसत नाही. मात्र नियमित हेअर स्पा केल्याचा चांगला परिणाम दिसू लागतो. कारण हा चांगला परिणाम पुढे दीर्घकाळ टिकू शकतो. हेअर स्पा मुळे तुमच्या केसांची मुळे मजबूत होतात आणि तुमच्या केसांचे आरोग्य सुधारते.

अंडाकृती आकाराच्या चेहर्‍याबद्दल देखील वाचा

घरी ‘हेअर स्पा’ कसा कराल (Hair Spa At Home In Marathi)

‘स्पा’ला प्राचीन संस्कृतीचा आधार आहे. कारण अगदी प्राचीन काळातील रोमन आणि ग्रीक संस्कृतीमध्ये या ‘स्पा’ची पाळेमुळे रुजलेली आहेत. त्या काळी राजा-महाराजांच्या स्नानासाठी अर्थात ‘स्पा’साठी सुंगधित पाण्याचा वापर केला जायचा.

त्यामुळे तुम्हाला घरच्या घरी परिणामकारक हेअर स्पा करायचा असेल तर या प्रमुख स्टेप्स लक्षात ठेवा.

ADVERTISEMENT

1. मसाज (Massage) : यासाठी नारळाचे तेल अथवा ऑलिव्ह ऑईल कोमट होईपर्यंत गरम करा. हे तेल केसांच्या मुळांना लावून थोडावेळ केसांच्या मुळांना मसाज करा. यामुळे केसांच्या त्वचेखालील रक्ताभिसरण सुधारते  आणि केसांची वाढ होते.

2. स्टीम (Steam) : एक जाड टर्कीशचा टॉवेल घ्या तो गरम पाण्यात बुडवून चांगला पिळुन घ्या. गरम वाफाळता टॉवेल तुमच्या केसांवर गुंडाळा. ज्यामुळे तुमच्या केसांना लावलेलं तेल केसांच्या मुळांमध्ये मुरेल आणि केसांचे योग्य पोषण होईल.

3.शॅंपू  (Shampoo) : केसांना स्टीम दिल्यावर केसांना पुन्हा शॅंपू करा. केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करण्याऐवजी थंड पाणी वापरा. कारण गरम पाण्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते.

4. कंडिशनर (Conditioner) : केस शॅंपू केल्यावर ते कंडिशनर करायला मुळीच विसरू नका. केमिकल कंडिशनर ऐवजा तुम्ही घरगुती कंडिशनरचा वापर करू शकता.

ADVERTISEMENT

5. हेअर मास्क (Hair Mask): केसांच्या योग्य पोषणासाठी केसांना हेअर मास्क लावणं खूप गरजेचं आहे. बाजारात अनेक प्रकारचे हेअर मास्क उपलब्ध असतात. मात्र घरीच हेअर स्पा करताना तुम्ही काही घरगुती हेअर मास्कदेखील वापरू शकता. हा हेअर मास्क केसांना लावल्यावर वीस मिनीटांनी केस पुन्हा शॅंपू करा.

हेअर मास्क घरीच कसा तयार कराल? (How To Make Hair Mask At Home)

घरात उपलब्ध असलेल्या गोष्टी वापरून तुम्ही घरीच हेअर मास्क तयार करू शकता.

1. ऑलिव्ह ऑईल हेअर स्पा

हेअर स्पा कसा करायचा
हेअर स्पा कसा करायचा

ऑलिव्ह ऑईलमध्ये अॅंटी ऑक्सिडंट (antioxidants) घटक असतात. ज्यामुळे तुमच्या केसांचे योग्य पोषण होते.

1. ऑलिव्ह ऑईल बोटांच्या मदतीने केसांच्या मुळांना लावा

ADVERTISEMENT

2. दहा ते पंधरा मिनीटं केसांमध्ये हळूवार बोटे फिरवून मसाज करा

3. गरम पाण्यात टॉवेल बुडवा आणि तो घट्ट पिळुन घ्या आणि केसांवर कमीतकमी दहा ते वीस मिनीटं गुंडाळा

4. सल्फेट फ्री शॅंपूने हेअर वॉश घ्या.

आठवड्यातून दोनदा तुम्ही हा हेअर स्पा करू शकता.

ADVERTISEMENT

2. अंड्याचा हेअर स्पा

नारळाचे तेल आणि अंडे हे केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असते. कारण अंड्यामध्ये प्रोटीन आणि नारळाच्या तेलामुळे तुमचे केस मऊ होतात.

1. एका भांड्यात नारळाचे तेल घ्या त्यात एक अंडे मिळळून मिश्रण एकत्र करा.

2. एका अंड्यासाठी दोन ते तीन चमचे नारळाचे तेल तुम्ही घेऊ शकता.

3. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावून केस बांधून ठेवा. काही मिनीटांनी केस शॅंपूने स्वच्छ करा.

ADVERTISEMENT

यामुळे तुमच्या केसांना नैसर्गिक चमक येईल आणि केस मऊ होतील.

3. अवोकॅडो हेअर स्पा

Hair Spa Benefits In Marathi
Hair Spa Benefits In Marathi

अवोकॅडोमुळे तुमच्या केसांची वाढ चांगली होते. अवोकॅडोमध्ये नैसर्गिक तेल असते ज्यामुळे तुमचे केस चमकदार दिसू लागतात.

1. एक पिकलेले अवोकॅडो घ्या. त्यातील बी काढून टाका आणि त्यातील गरामध्ये मध मिक्स करा.

2. या पेस्टला केसांच्या मुळांमध्ये एखाद्या मास्कप्रमाणे लावा.

ADVERTISEMENT

3.गरम पाण्यात टॉवेल बुडवा आणि तो घट्ट पिळूनदहा-पंधरा मिनीटे केसांवर  गुंडाळा

4. टॉवेल काढून केस वीस मिनीटे मोकळे सोडा

5. वीस मिनीटांनी केसांना शॅंपू करा.

तुम्ही एकदा हा हेअर स्पा केला तर दरवेळी तुम्हाला हा हेअर स्पा करण्याची ईच्छा होईल.

ADVERTISEMENT

4. केळ्याचा हेअर स्पा

Hair Spa At Home In Marathi
Hair Spa At Home In Marathi

केळ्यामध्ये  भरपूर पोटॅशियम, नैसर्गिक तेल आणि व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम दिसू शकतात.

2.केस आणि केसांच्या मुळांना हा हेअर मास्क लावा.

3. केसांवर गरम पाण्यात बुडवला टॉवेल घट्ट पिळून गुंडाळा

4.वीस मिनीटांनी केसांना शॅंपू करा

ADVERTISEMENT

आठवड्यातून दोनदा असा हेअर स्पा केल्यास तुमचे केस घनदाट आणि सतेज दिसू लागतील.

5. मेथीच्या दाण्यांचा हेअर स्पा

Hair Spa Benefits In Marathi
Hair Spa Benefits In Marathi

मेथीच्या दाण्यांचा हेअर स्पा करण्यासाठी तुम्हाला अर्था कप मेथीचे दाणे, एक चमचा मध आणि दोन चमचे दहीचा वापर करू शकता.

1.हेअर मास्क तयार करण्यासाठी मेथीचे दाणे रात्रभर कोमट पाण्यात भिजत ठेवा.

2. सकाळी ते वाटून त्यात दही आणि मध मिसळा.

ADVERTISEMENT

3. केसांच्या मुळांना हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा.

4. गरम पाण्यात टॉवेल बुडवून तो पिळून घ्या आणि दहा ते पंधरा मिनीटे डोक्याला गुंडाळा. दहा ते पंधरा मिनीटांनी केसांना शॅंपू करा.

6. दूध आणि मधाचा हेअर स्पा

Hair Spa At Home In Marathi
Hair Spa At Home In Marathi

दूधामुळे केसांना मऊपणा येतो शिवाय त्यामुळे केस लवकर तुटत नाही. मऊ आणि मधामुळे केस चमकदार होतात.

1. एक कप कच्च्या दुधामध्ये दोन चमचे मध मिसळून मिश्रण चांगले मिक्स करा.

ADVERTISEMENT

2. केसांवर हा मास्क लावा आणि दहा ते पंधरा मिनीटे तसेच ठेवा.

3. गरम पाण्यात बुडवलेला टॉवेल पिळून केसांवर लावा आणि दहा ते मिनीटे केसांवर गुंडाळा

4. काही मिनीटांनी केसांना शॅंपू करा.

हा हेअर मास्क आठवड्यातून दोन ते तीन लावा.

ADVERTISEMENT

7. काकडीचा हेअर स्पा

हेअर स्पा चे फायदे
हेअर स्पा चे फायदे

केस आणि चेहऱ्यावर केमिकल प्रॉडक्ट्स लावण्यापेक्षा घरातील नैसर्गिक प्रॉडक्ट्स वापरणं नेहमीच चांगलं. कारण त्यामुळे केस आणि त्वचेचे नुकसान होत नाही.

1. काकडी सोलून त्याचे  बारीक तुकडे करा.

2. काकडीचे तुकडे मिस्करमध्ये  वाटून त्यामध्ये दोन चमचे ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि केसांच्या मुळानां हे मिश्रण लावा.

आठवड्यातून दोनदा तुम्ही हा हेअर मास्क लावू शकता.

ADVERTISEMENT

8. कोरफडीचा हेअर स्पा

hair spa at home Aloe

कोरफडीमुळे केस चमकदार आणि मऊ होतात. या मास्कमुळे तुमचे केस कमी गळणे कमी होईल शिवाय लिंबाच्या वापरामुळे केसांमध्ये कोंडा देखील कमी होईल.

1. कोरफड जेल आणि लिंंबाचा रस एकत्र करा

2. या पेस्टला केसांच्या मुळांमध्ये व्यवस्थित लावा

3. जेल सुकल्यावर कोमट पाण्यामध्ये टॉवेल बुडवून केसांना गुंडाळा. काही मिनीटांनी केस शॅंपू करून धुवून टाका.

ADVERTISEMENT

घरच्या घरी केस कंडीशनर कसा लावाल (Home Made Hair Conditioner)

हेअर मास्कप्रमाणे केअर कंडीशनरदेखील तुम्ही घरीच तयार करू शकता.

1. चहापावडर आणि लिंबूरस पाण्यात मिसळून तुम्ही घरीच हेअर कंडीशनर तयार करू शकता.

2. बीटची पेस्ट आणि गुळवेलची पावडर एकत्र करून घरीच केसांसाठी कंडीशनर तयार करता येऊ शकतो.

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

ADVERTISEMENT

पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय

#DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय

केसगळती रोखण्यासाठी फायदेशीर आहेत ‘हे’ अँटी हेअर फॉल शॅम्पू

Home Remedies For Hair Growth In Marathi

ADVERTISEMENT
25 Feb 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT