ADVERTISEMENT
home / फॅशन
Hairstyle Trends top bun trend is back

ट्रेंडमध्ये आहे टॉप बन, सेलिब्रेटीप्रमाणे करा स्टाईल

बॉलीवूड सेलिब्रेटीपासून ते अगदी कॉलेजला जाणाऱ्या मुलींपर्यंत सध्या कोणती हेअरस्टाईल सर्वात जास्त ट्रेंडमध्ये असेल तर ती आहे टॉप बन… मुळात ही हेअर स्टाईल खूप जुनी आहे आणि सहज करण्यासारखी आहे. घरी असताना केस मोकळे सोडायचा कंटाळा आला की आपला हात सहज वळतो आणि केसांचा टॉप बन तयार होतो. पण सध्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये टॉप बन पुन्हा पाहायला मिळत आहे. ब्युटी आणि फॅशनचे ट्रेंड सतत बदलत असतात. त्यामुळे सध्या ट्रेंडमध्ये असलेली फॅशन करण्यात सर्वांना रस असतो. आजकाल अनेक सेलिब्रेटी टॉप बन हेअर स्टाईलमध्ये वावरताना दिसत आहेत. सहाजिकच त्यामुळे या स्टाईलची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ट्राय करा हे काही सेलिब्रेटी लुक्स

या सेलिब्रेटीप्रमाणे करा टॉप बन हेअरस्टाईल

सेलिब्रेटीप्रमाणे स्टायलिश दिसावं असं प्रत्येकाला वाटत असतं यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत हे काही सेलिब्रेटीस्टाईल टॉप बन ट्रेंड्स

दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोणचा तर टॉप बन ही आवडती हेअर स्टाईल आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती टॉप बन हेअर स्टाईल कॅरी करताना दिसते. फॅशनेबल दीपिका पादुकोणसारखी स्टाईल करायला कोणाला नाही आवडणार म्हणूनच सध्या टॉप बन पुन्हा ट्रेंडमध्ये आहे.

अनन्या पांडे

बॉलीवूडची नवतारका अनन्या पांडेलाही टॉप बन हेअर स्टाईल आवडते असं वाटतं. तिचा हा लुक पाहून कोणीही असंच म्हणेल. जर तुमची उंची कमी असेल अथवा तुम्ही खूप बारीक असाल तर तुमच्यावर टॉप बन हेअर स्टाईल अधिक खुलून दिसेल. वेस्टर्न लुकवर हिलसोबत टॉप बन कॅरी केला तर तुमचा लुक सर्वात हटके आणि स्टायलिश दिसेल.

ADVERTISEMENT

DIY: प्रत्येक कार्यक्रमासाठी करा 31 सोप्या हेअरस्टाईल्स (Simple Hairstyle In Marathi)

सोनम कपूर

सोनम कपूर नेहमीच वेगवेगळ्या स्टाईल आणि लुकमध्ये सर्वांसमोर येत असते. मात्र तिचा हा टॉप बन लुक तुम्हाला नक्कीच आवडेल. सहज फॅमिली अथवा फ्रेंडसोबत लंचला जाण्यासाठी अथवा पिकनिकसाठी हा लुक तुम्ही नक्कीच करू शकता. 

अशी करा लहान केसांची हेअर स्टाईल (Hairstyles For Short Hair)

करिष्मा कपूर

करिश्मा कपूर प्रमाणे हेअर स्टाईल करण्यासाठी तुम्हाला फार कष्ट घेण्याची गरज नाही. तुमच्याजवळ हवा फक्त हेअर ब्रश, हेअर पिन्स आणि सेटिंग स्प्रे… कारण या सिंपल हेअर टूल्सचा वापर करून तुम्ही स्वतःच तुमचा टॉप बन लुक करू शकता आणि दिसू शकता सेलिब्रेटीप्रमाणे स्टायलिश

ADVERTISEMENT

वेस्टर्नवेअरवर करता येतील अशा वेस्टर्न हेअरस्टाईल- Hairstyles For Western Wear In Marathi

डेझी शाह

पार्टीवेअर लुक करायचा असेल तर एखाद्या गाऊनसोबत डेझी शाहसारखा लुक करा आणि दिसा अधिक ग्लॅमरस… यासाठी सर्वात आधी तुमचे केस मोकळे सोडवून घ्या त्यानंतर टॉप बन बांधायच्या जागी एक हाय पोनीटेल बांधा आणि केसांचे दोन भाग करून केस त्या पोनीटेलभोवती गुंडाळून घ्या. हेअर पिन्सनी बन फिक्स करा आणि सेटिंग स्प्रे ने हेअर स्टाईल सेट करा. 

06 Oct 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT