पावसाळ्यात आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं कारण चिखल माती, ओलाव्यातून जीवजंतू मोठ्या प्रमाणावर पसरले जातात. जर वैयक्तिक स्वच्छता राखली तर इनफेक्शन होण्याचा धोका टाळता येतो. लहान मुलं शाळा, कोचिंग क्लास, हॉबी क्लास, मैदानी खेळ यासाठी बाहेर जातात. याच वेळी त्यांच्या हाताद्वारे इनफेक्शन त्यांच्या जवळ येतं. ज्यामुळे पावसाळ्यात लहान मुलं आजारी पडण्याचं प्रमाण सध्या वाढलं आहे. मग यावर उपाय काय, तर मुलांना घरी आल्यावर अथवा एखादा पदार्थ खाण्यापूर्वी नीट हात स्वच्छ करण्यास सांगणे. कोरोनामुळे आजकाल सर्वांनाच हात सतत धुण्याची सवय लागली आहे. मात्र मुलं हात धुताना या चुका करत असतील तर त्याचा हवा तसा फायदा होणार नाही. यासाठी जाणून घ्या कोणत्या चुका मुलांनी हात धुताना करू नयेत. त्यासोबतच वाचा या आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi, प्रतिकार शक्ती कमी आहे हे ओळखण्याची लक्षणे (Signs Of A Weak Immune System In Marathi), आयुष्य अधिक सुखकर करणाऱ्या क्लिनिंग हॅक्स (Best Cleaning Hacks In Marathi)
हॅंडवॉशशिवाय हात धुणे
तुम्ही मुलांना घरी आल्यावर अथवा खाण्यापूर्वी हात धुण्यास सांगितलं की, मुलं साबण अथवा हॅंडवॉश न लावताच पटकन हात धुवून येतात. याचं कारण मुलं खूप चंचल असतात. ज्यामुळे त्यांना एखादी गोष्ट पटकन करून मोकळं व्हायचं असतं. कधी कधी एखादा आवडीचा पदार्थ खाण्यासाठी ते अशी चूक करू शकतात. पण ही छोटी चूक त्यांना खूप महागात पडू शकते. कारण साबण अथवा हॅंडवॉशशिवाय, साध्या पाण्याने हात धुतल्यावर हातावरील जंतू नष्ट होत नाहीत.
हात धुण्याची घाई करणे
मुलांकडून बऱ्याचदा ही चूक घडते. कारण मुलं नेहमीच खूप घाईत असतात. त्यांना पटकन हात धुवायचे असतता. मात्र असे हात धुताना जरी साबण अथवा हॅंडवॉश वापरला तरी त्याचा काहीच फायदा होत नाही. कारण जंतू नष्ट होण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही. यासाठी तुमच्या मुलांना कमीत कमी तीस सेंकद हात धुण्याचं महत्त्व पटवून द्या. यासाठी मुलांना त्याचं एखादं आवडतं गाणं हात अथवा एक ते तीस आकडे मोजत हात धुण्याची सवय लावा.
हात धुतल्यावर इतर गोष्टींना हात लावणे
मुलं नेहमी असतं करतात की हात स्वच्छ धुतात आणि मग ते पुसण्यााधीच नळ, वॉश बेसिन, दरवाजा अशा गोष्टींना हात लावतात. बाहेर गेल्यावर तर मुलं कोणत्याही घाणेरड्या वस्तूलाही सहज हात लावतात. ज्यामुळे हात धुतल्याचा काही फायदा होत नाही. यासाठी त्यांना हात धुतल्यावर ते नीट पुसण्याचे आणि इतर गोष्टींना पटकन हात न लावण्याचे कारण समजवा. ज्यामुळे ती ही चूक करणार नाहीत.
हात नीट स्वच्छ न करणं
मुलं तीस सेंकद हात धुतात मात्र त्यांना ते कसे धुवावे हे माहित नसतं. फक्त किती वेळ हात धुवायचे हे त्यांना माहीत असतं त्यामुळे नकळत ती ही चूक करत असतात. यासाठी मुलांना हात कसे धुवावे हे नीट समजवा. बोटं, बोटांच्यामधील भाग, तळहात, तळहाताच्या मागील भाग चोळून आणि तीस सेंकद हातातवर हात रगडून स्वच्छ केला तर हात व्यवस्थित स्वच्छ होतो.
तुमच्या मुलांना तुम्ही वेळीच स्वच्छतेचं महत्त्व आणि हात धुण्याची योग्य पद्धत शिकवली तर त्यांच्याकडून या चुका नक्कीच होणार नाहीत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक