26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण त्याची लोकशाहीची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आणली गेली. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून प्रजेची सुरुवात झाली म्हणून हा प्रजात्ताक दिन आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेकांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व अद्याप माहीत नाही. जर तुम्हाला याचे महत्व लोकांना जाणवून द्यायचे असेल तर तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Republic Day Wishes In Marathi) संदेश पाठवू शकता आणि या दिवसाचे महत्व अधोरेखित करु शकता. देशभक्ती जागृत करण्यासाठी देशभक्तीपर चित्रपट ही तुम्ही पाहू शकता. 2022 सालातील प्रजासत्ताक दिनालाही तुमच्या जवळच्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (republic day wishes in marathi) नक्की द्या.
Republic Day Quotes In Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- स्वतंत्र्यता घेण्याचे नाही तर देण्याचे नाव आहे – नेताजी शुभाष चंद्र बोस
- चुका करण्याची मुभा आपल्याला नसेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले नाही – महात्मा गांधी
- या.. आपण सगळ्यांनी मिळून शांति, सद्भाव आणि प्रेमाने यात्रा सुरु करुया – अटल बिहारी वाजपेयी
- हम पहले और आखिर में सिर्फ भारतीय हैं – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- नागरिकता देशाच्या सेवेसाठी वाहून घेतली पाहिजे – पंडीत जवाहरलाल नेहरु
- न्याय आणि व्यवस्था हे राजकारणाचे महत्वाचे भाग आहेत. यापैकी एकही भागाला दुखापत झाली तरी औषध हे करावेच लागते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- नव्या संविधानांतर्गत काही चुकीचे होत असेल तर याचा असा अर्थ नाही की संविधान चुकीचे आहे.. यामध्ये माणसाचे काहीतरी चुकत आहे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- प्रजासत्ताकचा अर्थ एक राष्ट्र, एक भाषा आणि एक झेंडा – एलेग्जेंडर हेनरी
- कोणत्याही राष्ट्राची संस्कृती ही तेथील लोकांच्या आत्मा आणि मनात वसलेली असते – महात्मा गांधीचे अनमोल विचार
- सहिष्णुता आणि स्वतंत्रता हा प्रजासत्ताकाचा मजबूत पाया आहे – फ्रैंक लॉयड राइट
Read More Inspiring Republic Day Quotes in English
Happy Republic Day Wishes In Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश
- पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
- देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वत:ला विचारा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
- आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगला इतिहास दिला आहे… तुम्ही तो इतिहास कायम जागा ठेवा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
- आपल्या देशात विविधता आहे आणि ती तशीच कायम टिकवून राहावे. देशातील सलोखा वाढावा. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- परिवर्तनाचे नेतृत्व करा आणि देशातील शांतता टिकवून ठेवा.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022.
- आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत… मला आशा आहे की, हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
- गर्वाने बोला भारतीय आहे मी…. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 2022 !
- उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
- बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो. समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
- देश विविध रंगाचा,ढंगाचा.. विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- चला आपल्या देशाच्या वीर जवानांना आठवूया, त्यांनी दिलेल्या बलिदानाला आठवूया, सलाम सर्व वीरांना. प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश
- ना हिंदू, ना मुसलमान फक्त माणूस बना माणूस. मानवता हाच धर्म माना. वंदे मातरम, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
देशभक्तीपर गीते ज्यांनी केला जातो ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा
Republic Day Message In Marathi | प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश
- देशभक्ती ही क्षुल्लक कारणासाठी मरण्याचा हक्क आहे…प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
- स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश ..आम्ही सारे एक. .. जरी नाना जाती नाना वेष…
- गांधी का सपना सत्य बना… तभी तो देश गणतंत्र बना
- या भारतमातेला कोटी वंदन करुया… तिच्या रक्षणासाठी अगदी काहीही करुया
- सीमेवर शिपाई रक्षा करतात देशाची… आपण रक्षा करुया या देशाची संविधानाची
- गणतंत्र दिवस म्हणजे काय ते माहीत नसेल तर आजच जाणून घ्या कारण याच दिवसामुळे देशात बदल घडला
- तुम्ही तुमचा वाढदिवस विसरला तरी चालेल… पण तुम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी कधीच विसरु नका.
- देशाचे संविधान म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही… त्याचा मान ठेवा…
- देशात प्रेम नांदायला हवे हिंसा नाही… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- तुमच्या मनात तिरंगा असेल तर तुम्हाला कशाचीही भीती नाही…
- चला तिरंगा पुन्हा लहरूया, आपल्या देशासाठी गाऊया, आज आहे प्रजासत्ताक दिन, चला आनंद साजरा करूया.
- वीरांच्या बलिदानाची ही कहाणी आहे, आईच्या वीरगती मिळालेल्या पुत्रांची निशाणी आहे. प्रजासत्त्का दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
- हे जगा नको विचारूस मला माझी कहाणी, माझी तर ओळख आहे, मी आहे एक हिंदुस्तानी. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश.
Republic Day Status In Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या स्टेटस
स्वातंत्र्य दिन शुभेच्छां प्रमाणेच आपण प्रजासत्ताक दिनालाही आवर्जून स्टेटस ठेवतोच. मग खास प्रजासत्ताक दिनाला ठेवा हे व्हॉटसअॅप स्टेटस (Status For Republic Day In Marathi).
- आम्हाला आमच्या देशाच्या संविधानाचा अभिमान आहे…. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
- भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!
- मुक्त आमुचे आकाश सारे…झुलती हिरवी राने वने…स्वैर उडती पक्षी नभी…आनंद आज उरी नांदे !!
- रंग बलिदानाचा… रंग शांततेचा…रंग मातीच्या नात्याचा
- या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग…वंदन करुया तयांसी आज
- खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल जेव्हा संविधान कागदावर न राहता त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल. आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- भारताला सलाम! जिथे प्रत्येक अंकुर त्याच्या खरा रंगांमध्ये,जेथे प्रत्येक दिवस एकतेचा उत्सव साजरा करतात,प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
- प्रजासत्ताक तुझा, माझा आणि आपल्या लोकशाहीचा
- प्रजासत्ताक दिनी ठरवूया मनी…. देशासाठी करु काहीतरी..
- आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत की, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या भारत मातेचे संरक्षण करु !!
- प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!
- तनी मनी बहरु दे नवा जोश…होऊ दे पुलकीत रोम रोम… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
- घे तिरंगा हाती..नभी लहरु दे उंच… जयघोष मुखी… जय भारत… जय हिंद… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- वाऱ्यामुळे नाही…सैनिकांच्या जोशामुळे लहरतोय हा तिरंगा… असाच टिकून राहू दे त्यातील जोश
- प्रजासत्ताक दिन आणि संविधान दिनाच्या शुभेच्छा!
- झेंडा उँचा रहे हमारा….प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
- देश विविधतेचा.. देश माझा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
- देशात शांती आणि समृद्धी टिकून राहू दे… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- असंख्यांनी केले तुझ्यासाठी बलिदान…गाऊ त्या भारतमातेचे गुणगान
- देश विविधता जाणणाऱ्या एकात्मतेचा… प्रजासत्ताक दिन चिरायू होवो
- देशभक्तांच्या बलिदानामुळे आपण स्वतंत्र झालो, कोणी विचारेल कोण आहात तुम्ही, गर्वाने सांगा आम्ही भारतीय आहोत. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022
- मुकुट हिमालय, हृद्यात तिरंगा, सर्व पुण्य, कला आणि रत्न लुटवण्यासाठी भारत माता आली आहे. भारत माता की जय, प्रजासत्ताक दिन शुभेच्छा.
- धर्माच्या नावावर नाहीतर मानवतेच्या नावावर, हाच आहे देशाचा धर्म. फक्त जगा देशाच्या नावावर. प्रजासत्ताक दिन शुभेच्छा, प्रजासत्ताक दिन हार्दिक शुभेच्छा.
Republic Day Poem In Marathi | प्रजासत्ताक दिनासाठी देशभक्तिपर कविता
1. मातृभूमी ही अजिंक्य.. विश्वात साऱ्या वंद्य संस्कृती ,
कण कण मातीचा बोले हर्षे, विश्वास प्रेम इथे नांदती
संपन्न इतिहास अन, युवकात प्रखर राष्ट्रप्रेम जागृती
हर मनात हृदयात अन, हुंकार एकमेव जय भारती || (सचिन कुलकर्णी)
2. असा भारत हवाय … जिथे सगळ्यांची जास भारतीय असेल
धर्म देश प्रेम उच्च नीच भेदभाव सीमा पार असेल
नातं असेल भारतीयत्वाचा…
सुख शांती समाधान मिळेल
शत्रूचा थरकाप उडवील.. एवढी विचारांना धार असेल
प्रत्येक भारतीयाचा अन्यायावर होणारा वार असेल
जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात भारताविषयीचा आदर असेल
3. पोहायचे असेल तर समुद्रात पोहा
नदी नाल्यात पोहण्यात काय अर्थ आहे
प्रेम करायचे असेल तर देशावर करा
कारण लोकं फसवतील पण देश तुम्हाला कधीही फसवणार नाही
4. स्फूर्ती देतिल हेच आमुचे राम कृष्ण हनुमान
व्यासादिक मुनिवरे गाइला
संत महंते पावन केला
प्रताप शिवबाने गाजविला
सुखसमृध्दिनिधान
चिंतनि इतिहासाच्या दिसती
असंख्य नरवीरांच्या ज्योती
गाता स्वतंत्रतेची किर्ती
घडवू नव संतान
धर्मासाठी जीवन जगणे
समष्टिमध्ये विलीन होणे
सीमोल्लंघन दुसरे कसले
यासाठी बलिदान
5. झेंडा आमुचा प्रिया देशाचा
फडकत वरी महान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम
लढले गांधी याच्याकरिता
टिळक, नेहरू लढली जनता
समरधूरंधर वीर खरोखर
अर्पुनि गेले प्राण
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम
भारतमाता आमुची माता
आम्ही गातो या जयगीता
हिमालयाच्या उंच शिरावर
फडकत राही निशाण
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम
या देशाची पवित्र माती
जूळती आमुच्या मधली नाती
एक नाद गर्जतो भारता
तुझा आम्हा अभिमान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम
गगनावरी आणि सागरतिरि
सळसळ करिती लाटा लहरी
जय भारत जय, जय भारत जय, गाता ती जयगान
करितो आम्ही प्रणाम याला
करितो आम्ही प्रणाम
6. घडतोय बदल
चढतेय वीटेवर वीट
मिटतेय गुलामी
आपण होतोय धीट
उठत आहेत प्रश्न
कुरवाळतोय शंका
अन्यायाविरुद्ध
कुणी वाजवतोय डंका
पसरतेय महिती
हक्कासाठी भांडतोय
उलट सुलट का होईनात
आपण विचार मांडतोय
घडवितोय देश आपला
अंतराळी इतिहास
उद्याच्या चैतन्यावर
दृढ होतोय विश्वास
कोपर्यातल्या झोपडीमध्ये
प्रगतीची इच्छा दिसतेय
पुस्तकाच्या बाजारातही
आशेची पालवी रुजतेय
भारतीय असण्याचा वाटे
मनापासून अभिमान
बलाढ्य सुंदर समृद्ध स्वतंत्र
माझा भारत देश महान
7. बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो॥
हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो॥१॥
वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन
हा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥
हातात हात घालून ह्रदयास ह्रदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥३॥
करि दिव्य पताका घेऊ प्रियभारतगीते गाऊं
विश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो॥४॥
या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो॥५॥
ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल
जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो॥६॥
8. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
9. या आपण नतमस्तक होऊ ज्यांच्यामुळे हा दिवस आपण पाहतो आहे
नशीबवान आहे हे रक्त जे देशाच्या कामी आलं आहे
10. सलाम करा या तिरंग्याला
जी तुमची शान आहे…
मान नेहमी वर उंच ठेवा
जो पर्यंत प्राण आहे…
जय हिन्द, जय भारत
हे संदेश पाठवून तुम्ही तुमचा आजचा दिवस साजरा करु शकता. देशभक्तीपर गाणी ऐकून तुमच्यामधील देशाविषयीचे प्रेम जागृत करु शकता. तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
You May Also Like