ADVERTISEMENT
home / मनोरंजन
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक दुसऱ्यांदा होणार आईबाबा

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक दुसऱ्यांदा होणार आईबाबा

Happy New Year Wishes In Marathi | नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा….जगभरात सध्या ख्रिसमस आणि नववर्षाचा आनंद साजरा केला जात आहे. घरोघरी नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. नाताळ ते नववर्षासाठी अनेकजणांकडे खास पार्टीचं आयोजन केलं जातंय. तर काही जण नववर्षाचे स्वागत करण्यासाठी वेकेशनवर गेले आहेत. सेलिब्रेशनच्या या धामधुमीमध्ये एका सेलिब्रेटीच्या घरातील गोड बातमी नुकतीच उघड झाली आहे. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक पुन्हा एकदा आईबाबा होणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. हार्दिकच्या घरी ख्रिसमसचं सेलिब्रेशन करण्यात आलं त्या दरम्यान शेअर करण्यात आलेल्या फोटोजमध्ये नताशा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचं दिसून आलं. ज्यामुळे सोशल मीडियावर ख्रिसमससोबतच या गोड बातमीसाठीही या सेलिब्रेटी कपलवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.

Bigg Boss Marathi: माऊली… विशाल निकम झाला सीझनचा विजेता

हार्दिक आणि नताशासाठी खास आहे नववर्ष

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक या ख्रिसमस पार्टीत नेहमीपेक्षा जास्त आनंदी दिसत होते. शिवाय त्यांनी यंदा नाताळ त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत अगदी धुमधडाक्यात साजरा केला.   त्यांच्या घरी पुन्हा एकदा लवकरच छोटा आणि गोंडस पाहुणा येणार आहे हे त्यांनी शेअर केलेल्या फोटोजमधून स्पष्ट जाणवत होते. नताशा तिच्या बेबी बम्पसोबत लाल रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचे तेज झळकत होते. त्यामुळे आता एव्हाना ही गोष्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. अनेकांनी हार्दिक आणि नताशाला शुभेच्छा देण्यास सुरूवात केली आहे तर काहींनी खरंच नताशा प्रेग्नंट आहे का अशा प्रश्नांची सतबत्ती कंमेट बॉक्समध्ये सुरू केली आहे. हार्दिक पांड्या आणि नताशाने याबाबत अजूनही कोणता खुलासा केलेला नसल्यामुळे चाहत्यांना त्यांच्या उत्तरांची उत्कंठा लागली आहे.

भारती सिंहला हवी आहे बेबी गर्ल, मजेशीर पद्धतीने शेअर केल्या भावना

ADVERTISEMENT

हार्दिक पांड्या आणि नताशाची लव्हस्टोरी

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांनी मागच्या वर्षी कोरोनाच्या काळात 2020 च्या मे महिन्यात लग्न केलं. लॉकडाऊनमध्ये त्या दोघांनी लग्नाचा घाट घातला होता. लग्नानंतर जुलै 2020 मध्ये त्यांचे पहिले बाळ अगस्तचा जन्म झाला. लग्नाआधी अनेक दिवस ते रिलेशनशिपमध्ये होते. लग्नाआधीच नताशा प्रेग्नंट असल्यामुळे दोघांनी लग्न आणि मुलगा झाल्याची बातमी लागोपाठी दिली होती. ज्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. आता अगस्तला दीड वर्ष होत नाही तोच नताशा- हार्दिकने पुन्हा आईबाबा होण्याचा निर्णय घेतलेला दिसत आहे. अजूनही हार्दिक आणि नताशाने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नसल्यामुळे ही अफवा आहे की सत्य यावर सध्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. काही असलं तरी त्यामुळे पुढचं येणारं वर्ष या सेलिब्रेटी कपलच्या आयुष्यातील आनंद द्विगुणित करेल असंच दिसून येत आहे. 

Year Ender 2021: यावर्षी हे मराठी कलाकार झाले आई-बाबा

27 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT