बिग बॉस स्पर्धक आणि हरयाणाची क्वीन अशी ओळख असलेल्या सपना चौधरी हिने अचानक सगळ्या फॅन्सना धक्कादायक आनंदवार्ता दिली आहे. सपना चौधरी आई झाली असून तिने एका गोंडस मुलाला जन्म दिल्याचे समजत आहे. स्वत: सपनाने या संदर्भात कोणतीही माहिती दिली नसली तरी तिच्या फोटोवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.एका वृत्तपत्राने तिच्या कुटुंबियांशी केलेल्या बातचीतनंतरच सपना आई झाल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आता सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे की, सपना चौधरीच्या लग्नाची बातमी कुठेही आली नाही. तिने लग्न केले कधी, कोणाशी केले आणि ती आई झाली कधी ? हे सगळेच फार धक्कादायक आहे. पण या सगळ्यामध्ये आनंदाची गोष्ट हीच की सपनाच्या घरात एक नवा पाहुणा आला आहे.
पतौडी पॅलेसमध्ये स्पॅनिश शिकत आहे तैमूर, शेअर केले क्यूट फोटो
लग्नाची बातमी ठेवली लपून
संपूर्ण देशात गेल्या 6 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या घरी पाळणा हलला आहे. काहींनी या दिवसात लग्नही केली आहेत. पण सपना चौधरी हिच्या लग्नाची कोणतीही बातमी नसताना अचानक तिला बाळ झाले तरी कसे असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यामुळेच तिच्या कुटुंबियांशी काही मीडिया हाऊसने संपर्क साधल्यावर तिच्या लग्नाच्या बातमीवरुन पडदा उठला आहे. तिची आई नीलम चौधरी हिने दिलेल्या माहितीनुसार सपना चौधरी हिचा विवाह जानेवारी महिन्यात कोर्ट मॅरज पद्धतीने झाला. मुलाच्या नातेवाईकांमधील जवळची व्यक्ती गेल्यामुळे त्यांनी लग्नाचा उल्लेख किंवा मोठा उत्सव साजरा केला नाही. अत्यंत साध्या पद्धतीने हे लग्न करण्यात आले. आता सपना चौधरी हिने जानेवारीत लग्न केले हे कळले. पण हे लग्न कोणाशी केले ? असा प्रश्नही तिच्या अनेक फॅन्सना पडला आहे.
या महिन्याच्या शेवटी नेहा कक्कर अडकणार विवाहबंधनात, चर्चांना आलंय उधाण
या व्यक्तिशी केले लग्न
सपना चौधरी ही इंडस्ट्रीमधील असा चेहरा आहे जिची ओळख तिचा आवाज, तिचे नृत्य आणि तिची पर्सनॅलिटी आहे. ती कोणाशी लग्न करेल अशी उत्सुकता सगळ्यांनाच होती. तिच्या आईनेच दिलेल्या माहितीनुसार ती वीर साहू यासोबत विवाहबद्ध झाली आहे. वीर साहू हा अभिनेता, लेखक आणि मॉडेल आहे. पण सपनासोबत लग्न केल्याची कोणतीही पोस्ट त्याने यामध्ये टाकलेली नाही. त्यामुळे दोघांनीही आपली प्रोफाईल अगदी क्लिन ठेवली आहे. वीर साहू हा हरयाणाचा अभिनेता असून तो या इंडस्ट्रीतील अत्यंत नावाजलेला चेहरा आहे.
सिंघम’ फेम काजल अग्रवाल लवकरच करतेय लग्न
व्हिडिओमध्ये दिसून आला फरक
सपना चौधरी सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते. तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसत नसला तरी तिच्या चेहऱ्यामध्ये बराच फरक झालेला दिसत आहे. लुझ कपडे घातल्यामुळे ती प्रेग्नंट आहे की नाही असा अंदाज येत नसला तरी ती या फोटोमध्ये वेगळी दिसत आहे हे नक्की! दरम्यान, सपनाच्या आई होण्याच्या बातमीमुळे अनेकांनी तिला ट्रोल करायलाही सुरुवात केली होती. त्यामुळे वीरने लाईव्ह येत या संदर्भातील सगळी माहिती दिली आहे. आम्ही आमच्या मर्जीने लग्न केले आहे. त्यामध्ये काहीही गैर नाही. वीर आणि सपना एकत्र असल्याच्या बातम्या या आधीही येत होत्या. सपनाने वीरसोबत अनेक म्युझिक व्हिडिओ केले आहेत. ते चार वर्षांहून अधिक काळ रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
ट्रोलर्स कितीही ट्रोल करत असले तरी सपनाची गुडन्यूज तिच्या फॅन्सना जबरदस्त खुश करणारी आहे.